AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठलाच्या नावाने दरोडा ! जितेंद्र आव्हाड का संतापले ?

महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. त्यांच्या या आरोपांना सरकारकडून काय उत्तर दिलं जातं ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विठ्ठलाच्या नावाने दरोडा ! जितेंद्र आव्हाड का संतापले ?
| Updated on: Jun 18, 2024 | 9:38 AM
Share

विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी या दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. लहान-मोठे, थोर, वृद्ध नागरिक, श्रीमंत-गरीब असा काही भेदभाव न उरलता सर्वजण फक्त विठू-माऊलीच्या भेटीच्या आशेने उत्साहात सहभागी झालेले दिसतात. वारीतीली या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारतर्फे महाआरोग्य शिबीरं आयोजित करण्यात आली आहे. मात्र याच मुद्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण ही शिबीरं नसून विठ्ठलाच्या नावाने दरोडा आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांनी एक भलमोठ्ठ ट्विट करत संपूर्ण लेखाजोगाच मांडला आहे. दे देते भगवान को धोका , इन्सान को क्या छोडेंगे असे लिहीत त्यांनी या पोस्टमधून चांगलेच सुनावले आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट ?

विठ्ठलाच्या नावाने दरोडा

दे देते भगवान को धोका इन्सान को क्या छोडेंगे

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आय़ोजित करण्यात आली आहेत. वारकऱ्यांसाठी 2 कोटी 40 लाखांची औषधे खरेदी केली जाणार आहत. तर आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वारकरी की कंत्राटदार, महाआरोग्य शिबीर कोणासाठी ?

पंढरपूर येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखाल होत असतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, गेल्या वर्षापासून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात महाआरोग्य शिबिराचे आय़ोजन केले जाते. त्यासाठी राज्य शासन आर्थिक तरतूद करतो. यंदा तीन ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी 9 कोटी 44 लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये 2 कोटी 40 लाख रुपयांच्या औषधींचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तैनात 4 हजार 320 मनुष्यबळाच्या जेवणाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये केला जाणार आहे. जो इतर खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाआरोग्य शिबिरासाठी मंडप, सीसीटीव्ही, साहित्य, वाहतूक यासाठी एकूण ९ कोटी ४४ लाख रुपये खर्च राज्य सरकारने मंजूर केला आहे. तीन ठिकाणी तीन दिवसांसाठी हे आरोग्य शिबिर होणार आहे. तेथे वारकऱ्यांना मोफत उपचार व औषधी पुरविली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाला राज्य सरकारचे अवर सचिव अ. भि. मोरे यांनी मंजुरी दिली आहे. यात एकूण खर्च 9 कोटी 40 होणार असून, वारकऱ्यांच्या वाट्याला मात्र केवळ २ कोटी ४० लाखांची औषधी येणार आहेत. उर्वरित ७ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

जेवणावर होणार 3 कोटींचा खर्च

महाआरोग्य शिबिर तीन ठिकाणी होणार असून, ते तीन दिवस असते. त्यापैकी पहिले महाआरोग्य शिबिर वाखरीत, दुसरे तीन रस्ता आणि तिसरे गोपाळपूर येथे असेल. यासाठी आरोग्य विभागाकडून विशेषज्ञ डॉक्टर, फिजिशियन, फार्मासिस्ट, असे मिळून प्रत्येक शिबिरासाठी १४४० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या तीन दिवसांच्या खानपानासाठी तब्बल ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजे औषधे २ कोटी ४० लाखांची आणि खानपान ३ कोटींचा.

महाआरोग्य शिबिराचे अंदाजित खर्च

मंडप – ९० लाख

बैठक व्यवस्था, फर्निचर, खुर्ची – १२ लाख

स्वच्छतागृह व्यवस्था – १५ लाख

डॉक्टर, नर्सेस अल्पोपहार, भोजन खर्च – ३ कोटी

जागा भाडे खर्च – ६ लाख

सीसीटीव्ही, डिजिटल स्क्रीन – १५ लाख

निवास व्यवस्था – १ कोटी ८० लाख

सतरा ठिकाणी उपचार केंद्रांचा खर्च – २० लाख

आकस्मिक खर्च, केसपेपर, इंटरनेट, वॉकीटॉकी – ३५ लाख

वीज कनेक्शन, वीज बिल – ६ लाख

वाहतूक व्यवस्था अन् इंधन खर्च – १० लाख

आरोग्य दूत इंधन खर्च – १० लाख

औषध व औषधी साहित्य सामग्री – २ काेटी ४० लाख

एकूण खर्च – ९ कोटी ४४ लाख

असा संपूर्ण हिशोब मांडून आव्हाड यांनी राज्य सरकारवर महाघोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांना सरकारकडून काय उत्तर दिलं जातं ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.