AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अन्…, खरात प्रकरणात आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

अशोक खरात याचे एक -एक कारनामे आता समोर येत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता अशोक खरात याच्यासंदर्भात आव्हाडांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अन्..., खरात प्रकरणात आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट
Jitendra AwhadImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 9:43 PM
Share

सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. नाशिकच्या या भोंदू बाबाचे एक -एक कारणामे आता समोर येत आहेत. दरम्यान या प्रकणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अशोक खरात याने 2017 मध्ये एका पत्रकाराचा खून केला होता. एका वर्तमान पत्रात त्यासंदर्भात 10 अर्टिकल देखील छापून आले होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे, एवढंच नाही तर पोलिसांनी या प्रकरणात खरात याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणत्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे, असा गौप्यस्फोट देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी असा दावा देखील केला आहे की, सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला होता. हे मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे. 38 आमदारांची यादी आहे.  कॅमेरासमोर खरातला ठेवा, देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला धक्का लावण्यासाठी अनेक आमदार त्या ठिकाणी लाईन लावून बसले होते. ते ज्या आर्थी एवढी कारवाई करत आहे, त्या आर्थी त्यांना हे सर्व माहीत आहे, असं यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जेफरी एफ्स्टीनच्या फाईल जगाला कळू नये, म्हणून आता इराणचं युद्ध सुरू आहे. या सर्व प्रकरणामुळेच जेफरी एफ्स्टीनची हत्या झाली होती. तशीच भीती मला आता अशोक खरातबद्दल देखील वाटत आहे, त्यामुळे त्याला वाचवा असंही यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंनी काय म्हटलं?

अशोक खरात शुद्धीकरणाच्या नावाने महिलांना जाळ्यात फसवायचा, माझ्याकडे 58 नाही तर 250 प्रकरणं आहेत. त्याने अनेक उद्योगपतिंना फसवले आहे. अनेक राजकारणी लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. आम्ही त्याला पाणी दिलं, असंही काही जण म्हणाले.  मात्र ते आम्ही मंदिराच्या विकासासाठी दिलं होतं. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले तेव्हाच हे सगळं समोर आलं होतं.  खरात प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरु होता.  पण नंतर मुंबईतील सहाव्या मजल्यावरून आदेश गेला आणि प्रकरण बाहेर आलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल