VIDEO : कल्याणमध्ये पेट्रोल पंप पाण्याखाली, 100 लोक अडकले

कल्याणजवळील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 लोक अडकल्याची भिती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

00 people stuck in kalyan petrol pump, VIDEO : कल्याणमध्ये पेट्रोल पंप पाण्याखाली, 100 लोक अडकले" width="600" height="395">

ठाणे : मुंबईसह महाराष्ट्रात सध्या धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. यामुळे उल्हास नदीला पाणीपातळीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईसह नवी मुंबईतील सततच्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. याचा फटका कल्याणजवळील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 लोक अडकल्याची भिती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. तर त्याच्या बाजूलाच असलेल्या दोन हॉटेलमध्येही काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गाड्याही पाण्याखाली गेल्याचेही दिसत आहे. दरम्यान या ठिकाणच्या रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.

पिकनिकसाठी रिसोर्टला गेलेले 40 लोक अडकले

तर दुसरीकडे अंबरनाथच्या शांतीसागर रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी गेलेले 40 लोक अडकले आहे. या ठिकाणी अडकलेल्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी हाक दिली आहे.

दरम्यान या लोकांच्या बचावासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आर्मी आणि एयर फोर्सची मदत मागितल्याची कल्याण तहसीलदारांनी माहिती दिली आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले

मुसळधार पावसामुळे कर्जत/खोपोली ते बदलापूर लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. तर या पावसाची फटका महालक्ष्मी एक्सप्रेलाही याचा बसला आहे. बदलापूर येथे रेल्वे ट्रॅकवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बदलापूर ते वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलीस प्रशासनापासून इतर सामाजिक संस्थांना मदत करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *