AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…

कल्याणच्या आडीवली परिसरात अर्जुन काळपांडे उर्फ 'पेंद्या भाई'ची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेत त्याची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्य आरोपी अविनाश झा आणि साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. जुना वाद आणि बदला हे हत्येमागचे प्रमुख कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्...
कल्याणमध्ये मध्यरात्री धक्कादायक घटना
| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 11:31 AM
Share

कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत अर्जुनची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या रक्तरंजित गुन्ह्यामुळे नागिरकांमध्ये अतीशय दहशतीचे वातावरण असून ते मुठीत जीव धरून जगत आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून मुख्य आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अर्जुन काळपांडे आणि अविनाश झा तसेच गौरव उर्फ ‘बॉम्बे’ यांच्यात जुन्या वादातून बाचाबाची झाली होती. हा वाद पुढे वाढत गेल्यानंतर आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांनी अर्जुनवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

केले तब्बल 12-13 वार

हल्ल्यादरम्यान आरोपींनी धारदार शस्त्राने अर्जुनवर तब्बल 12 ते 13 वार केले. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अर्जुनसोबत असलेल्या त्याच्या मैत्रिणीवरही वार करण्यात आले असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता ‘पेंद्या भाई’

दरम्यान, अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ याचा यापूर्वी कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड परिसरातील चौकात झालेल्या संदीप राठोड हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होता. या प्रकरणात तो सुमारे दोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मात्र याच जुन्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अर्जुनची हत्या करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण या हत्येचं नेमकं कारण काय, ते अद्याप स्पष्ट समजलेलं नाही. पोलिसांकडून या घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे.

या हत्याकाडांप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अविनाश झा आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा