कल्याण : केडीएमसीत दररोज सरासरी कोरोनाचे तब्बल 900 रुग्ण आढळून येत आहेत (School Open In Titwala). रुग्ण संख्या पाहता केडीएमसीत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, टिटवाळ्यात चक्क शाळाच भरली. शाळेत मोठ्या संख्यने विद्यार्थी होते. या प्रकरणी कायदेशीर करावाई केली जाईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. या शाळेत एखादा कोरोना रुग्ण आढळून आल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आहे (Kalyan-Dombivali Corona Hotspot School Open In Titwala).
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसात जवळपास दहा हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. काही दिवसांपासून 800 ते 900 रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका क्षेत्रात काही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, रुग्ण संख्या वाढत असल्याने आत्ता केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी नवे निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत.
सगळ्यांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. तरी सुद्धा अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती नियम मोडून स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकताना दिसून आले आहे. असाच एक प्रकार टिटवाळ्यात समोर आला आहे.
टिटवाळा येथील मांडा परिसरात रविंद्र विद्यालयात गेल्या दोन दिवसांपासून शाळा भरविली जात आहे. पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जात आहे. ज्या पालकांकडून फी भरली जात नाही. त्या विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवले जात आहे. एकीकडे केडीएमसीचे निर्बंध दुसरीकडे शाळा प्रशासनाने शाळा भरवली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्कही नव्हते.
ज्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला यादव यांच्याकडे ‘टीव्ही-9 मराठी’ने विचारणा केली असता त्यांनी शाळा बंदच आहे, असा बनाव केला. शाळा भरली जात नाही असे सांगितले (Kalyan-Dombivali Corona Hotspot School Open In Titwala).
या प्रकरणात टिटवाळ्यातील शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी शाळा आणि महापालिका प्रशासनावर टिकास्त्र सोडले आहे. केडीएमसीत रुग्ण वाढत असताना तरीही शाळा भरविली जात आहे. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारकडून निर्बंध लावले जातात. त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. याप्रकरणी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांचे म्हणणे आहे की, शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
घराबाहेर पडण्यापूर्वी वयाचा विचार करा, ‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग https://t.co/usWFkwjGNg #covidindia | #MaharashtraFightsCorona | #SolapurCorona
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
Kalyan-Dombivali Corona Hotspot School Open In Titwala
संबंधित बातम्या :
बापरे! सोलापुरात 31 ते 50 वयोगटातील लोकांना कोरोनाची सर्वाधिक लागण; वाचा, काय आहे आकडा
Maharashtra Night Curfew मोठी बातमी : राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
KDMC Corona Update | कल्याण डोंबिवलीमध्ये शनिवार, रविवारी बंद; जाणून घ्या नवे नियम