…तर आम्ही थेट रस्त्यावर उतरु, उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

उल्हास नदी पात्रात गेल्या तीन दिवसापासून 'मी कल्याणकर' या संस्थेकडून प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे (Kalyan NCP support Nitin Nikam protest)

...तर आम्ही थेट रस्त्यावर उतरु, उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

ठाणे : उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदी पात्रात आंदोलन करणाऱ्यांची प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. दखल न घेणाऱ्या अधिकारी वर्गाचा निषेध करीत वेळ प्रसंगी रस्त्यावरुन उतरुन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे (Kalyan NCP support Nitin Nikam protest).

उल्हास नदी पात्रात गेल्या तीन दिवसापासून ‘मी कल्याणकर’ या संस्थेकडून प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या काही वर्षापासून वारंवार मागणी करुन नदीचे प्रदूषण रोखले जात नाही. नाल्यांचे सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. यासाठी समाजिक कार्यकर्ते नितिन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी शुक्रवारी (12 फेब्रुवारी) उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन संपर्क साधला. लवकर तोडगा निघणार असे आश्वासन आंदोलन करणाऱ्यांना दिला (Kalyan NCP support Nitin Nikam protest).

“आंदोलन करणाऱ्यांची प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. दखल न घेतल्यास राष्ट्रवादी रस्त्यावरुन उतरुन आंदोलनास तीव्र स्वरुप दिले जाईल. या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“सोमवारी शहर अभिंयत्या आणि आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाईल. अन्यथा कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे”, असं जगन्नाथ शिंदे यांनी सांगितलं.

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कर्जतपासून कल्याण मोहने बंधाऱ्यापर्यंत प्रदूषित आहे. या नदीच्या पात्रात सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषित झाल्याने सांडपाण्यामुळे नदीच्या पात्रात जलपर्णी साचली आहे. ही जलपर्णी पाणी शोषते. या पाण्याला घाण वास येतो.

नदी पात्रत मोहने, गाळेगाव आणि म्हारळ येथील नाल्याचे सांडपाणी सोडले जात आहे. हे नाले बंद करण्यात यावे. नदीचे प्रदूषण रोखले जावे, यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी गेल्या तीन दिवसांपासून नदीपात्रत आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनात माजी नगरसेवक उमेश बारेगावकर, कैलास शिंदे हेही सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : आधी राज ठाकरेंच्या शब्दाखातर आंदोलन सोडलं, नदीच्या स्वच्छतेसाठी कल्याणकराचं पुन्हा आंदोलनाचं हत्यार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI