AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72 वर्षानंतर आरक्षणाने अनुसूचित जाती प्रवर्गाचा सरपंच, कान्हळगावातील ऐतिहासिक घटना

भंडाऱ्यातील कान्हळगावमध्ये 72 वर्षानंतर अनुसूचीत जाती प्रवर्गातील व्यक्ती संरपच झाली आहे. Kanhalgaon Gram Panchayat

72 वर्षानंतर आरक्षणाने अनुसूचित जाती प्रवर्गाचा सरपंच, कान्हळगावातील ऐतिहासिक घटना
कान्हळगाव ग्रामपंचायत
| Updated on: Feb 15, 2021 | 3:35 PM
Share

भंडारा: महाराष्ट्रातील 14 हजार 232 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया सुरु आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका अनेक गोष्टींमुळे चर्चेत आल्या. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव-सिरसोली ग्रामपंचायतीमध्ये ऐतिहासिक घटना घडली आहे. कान्हळगाव-सिरसोली ग्रामपंचायतीच्या निर्मिती नंतरच प्रथमच तब्बल 72 वर्षानी अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तीला सरपंचपदावर संधी मिळाली आहे. कान्हळगाव-सिरसोली गावचे जागेश्वर मेश्राम सरपंचपदी विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक क्षणाची नोंद कान्हळगाव ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. (Kanhalgaon Gram Panchayat Schedule Cast Category Person Jogeshwar Meshram elected as Sarpanch)

72 वर्षानंतर अनुसूचीत जाती प्रवर्गाला आरक्षण

कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जागेश्वर मेश्राम हे एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आले. मात्र, आरक्षण नसल्याने आजपर्यंत त्या गावात अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती सरपंच होवू शकली नाही. त्यासाठी तब्बल 72 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. आरक्षणानेच ही प्रतीक्षा संपवली आहे. त्यामुळे जागेश्वर मेश्राम सरपंचपदी बिनविरोध निवडून आले.

ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार गावकरी

जोगेश्वर मेश्राम गावचे सरपंच झाले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदर कान्हळगाव-सिरसोली गावचे ग्रामस्थ होते. गुलाल उधळून जागेश्वर मेश्राम यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे. कान्हळगाव ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत पिंपळगाव व सिरसोली या तीन गावात मिळून बनलेली होती. 2 नोव्हेंबर 1948 ग्रामपंचायत कान्हळगाव स्थापना झाली. 1948 ते 2019 या दरम्यान 11 जण कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर विराजमान झाले. यात तीन महिला तर आठ पुरुष सरपंचाचा समावेश आहे.

1948 ते 2021 या 72 वर्षाच्या कालखंडात अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील एकही व्यक्ती कान्हळगावात सरपंच झालेला नव्हता. आरक्षणामुळे सात दशकानंतर पहील्यांदाच जागेश्वर मेश्राम यांच्या रूपाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्ती कान्हळगावचे प्रथम नागरिक म्हणून गावाचे नेतृत्व करणार आहेत. गावातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र घेऊन विकासाची काम करणार असल्याच जोगेश्वर मेश्राम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सरपंचाची निवड सदस्यांतूनच, गोंधळ नको: हसन मुश्रीफ

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निव

(Kanhalgaon Gram Panchayat Schedule Cast Category Person Jogeshwar Meshram elected as Sarpanch)

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.