Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karuna Sharma : ‘करुण शर्मा नको, मला करुणा धनंजय मुंडे म्हणा’, निकालानंतर पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? या प्रश्नावर करुणा शर्मा म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे. आज धनंजय मुंडेंच्या स्वत:च्या मुलाकडे रोजगार नाही. एक रुपयाची प्रॉपर्टी नाही. वाल्मिक कराडकडे 4 हजार करोडची प्रॉपर्टी निघते. मंत्र्याची मुलगी असून माझी मुलगी टॅक्सी, रिक्षामध्ये फिरते"

Karuna Sharma : 'करुण शर्मा नको, मला करुणा धनंजय मुंडे म्हणा', निकालानंतर पहिली प्रतिक्रिया
Karuna Sharma-dhanajay munde
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 1:49 PM

“पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केलं आहे. करुण शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा. हा माझा अधिकार आहे, मी लढा दिला आहे. मी मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा” अशी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली. “तीन वर्षापासून मी लढाई लढत आहे. 33 महिन्यापासून मी खूप कष्ट घेतलेत. मी न्यायाधीश, न्यायालय आणि माझी वकील गणेश कोल्हे यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी एक रुपया न घेता माझा खटला लढला. बीडपासून मुंबईत ते येत होते. खटला दाखल केला, आज जिंकलो यासाठी मी सर्वांचे आभार मानते” असं करुणा शर्मा म्हणाल्या.

2 लाख रुपये पोटगीवर समाधानी आहात का? यावर करुणा शर्मा म्हणाल्या की, “मी अजिबात समाधानी नाही. कारण महिन्याचा खर्च 1 लाख 70 हजार आहे. 30 हजार रुपये मेन्टेन्स आहे. एका नोकराकडे चार हजार कोटीची प्रॉपर्टी निघाली. माझ्या आणि मुलांच्या नावावर काही नाहीय” “मुलगा 21 वर्षांचा असून बेरोजगार आहे. आम्हाला महिन्याच्या खर्चासाठी 15 लाख रुपये हवेत. त्यासाठी कोर्टात खटला दाखल केलेला. मी कोर्टाच्या ऑर्डरवर समाधानी नाही. मी हायकोर्टात दाद मागणार” असं करुणा शर्मा म्हणाल्या.

वाल्मिक कराडने मला मारहाण केली

धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर करुणा शर्मा म्हणाल्या की, “माझ्या आईचे प्राण गेले. माझ्या आईने आत्महत्या केली. मला दोनवेळा जेलमध्ये टाकलं. त्यांनी प्रतारणा केली. माझा छळ सुरु आहे. येरवडा जेलमध्ये 45 दिवस होती. बीडमध्ये 16 दिवस होती. जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराडने मारहाण केली. गाडी फोडली. हिंसाचार सरु आहे. माझी बहिण 40 वर्षांची आहे. तिचं शारीरिक शोषण केलं. मी या ऑर्डरविरोधात हायकोर्टात दाद मागणार” असं करुणा शर्मा म्हणाल्या.

‘मी आत्महत्या केली, तर माझ्या मुलांच काय होईल’

तीन वर्षात तुमचं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं का? “हो बोलणं झालं, भेट झाली. कुठेतरी सेटलमेंट करा असा विषय झालं. मुला-मुलींच शिक्षण थांबलेलं आहे. मुलांवर याचा परिणाम होतोय. कोणीतरी महिला घाणेरड बोलत आहे. पैसे देऊन तिला घाणेरड बोलायला लावतायत. पण मी घाबरत नाही. आत्महत्येचा विचार माझ्याही मनात आला. माझ्या आईने आत्महत्या केल्यानंतर माझं जगणं मुश्किल झालं. आज माझी आई असती, तर पतीने मला सोडलं नसतं. मी आत्महत्या केली, तर माझ्या मुलांच काय होईल म्हणून मी जिवंत आहे”

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.