AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर… सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली

Ketan Agarwal Siya Goyal : केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. आता सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर... सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली
Sia Goyal Father ReactionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 26, 2026 | 5:54 PM
Share

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला होता. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असातच आता सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सिया सासरच्या लोकांवर खूश होती…

सिया गोयलच्या वडिलांनी म्हटले की, ‘ही दुख:द घटना आहे. आमचा विश्वास बसत नाही. आम्ही केतनला आमचा मुलगा मानायचो. त्यांना आम्ही गमावलंय याचं दुख आहे. आम्हाला लग्नाच्या खूप अपेक्षा होत्या. काय काय स्वप्न सजवले होते. सियाचा वाढदिवस होता. आम्हाला महाबळेश्वरला जाऊन सेलिब्रेशन करायचं होतं. उदयपूरला लग्न करायचं होतं. बरीच स्वप्न होते. सियाही लग्नाबाबत भरभरून बोलायची. सासरच्या लोकांवर खूश होती. चांगला नवरा आणि घर मिळाल्याचं सांगत होती.’

आम्हाला अफेअरबद्दल माहिती असती तर…

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सियाचं अफेयर असतं तर तिने सांगितलं असतं. तिने थोडं जरी सांगितलं असतं किंवा केतनच्या कुटुंबीयांनी सांगितलं असतं तर आम्ही तिच्याशी बोललो असतो. काही जरी कळलं असतं तर आम्ही बोललो असतो.सिया सिंपल होती. तिचं काही अफेयर होतं असं काही माहीत नव्हतं. जरा जरी माहीत असतं तर सियाला आम्ही दरडावलं असत. चेतन कुठून आला माहीत नाही. त्याला कधी भेटलो नाही. त्याचा चेहराही कधी पाहिला नाही. तो कधी घरी आला नाही, आम्ही कधी त्याचं नावही ऐकलं नाही. आम्ही केतनला गमावलं नाही. तर मुलालाच गमावलं आहे.’

नोव्हेंबरमध्ये होणार होते लग्न

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठीच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच सिया आणि चेतनने केतनचा कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. आता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत