AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे. ईडीच्या या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समर्थन केलं आहे. (kirit somaiya on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)

शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला
| Updated on: Nov 24, 2020 | 11:00 AM
Share

मुंबई: शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे. ईडीच्या या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ईडी सबळ पुरावे आणि माहिती असल्याशिवाय कारवाई करत नाही, असं सांगतानाच शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. (kirit somaiya on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा चुकीच्या मार्गाने मालमत्ता जमवली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही थेट हल्ला केला. शिवसेनेचे मुखियाही अशाच प्रकारचे उद्योग-धंदे करतात, हे सर्वांनाच माहीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, ईडीने आज प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घर आणि कार्यालयात सकाळपासून धाड मारली आहे. तसेच सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही छापा मारला आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेना प्रवक्ते आणि आमदार असले तरी ते बांधकाम व्यावसायिकही आहेत. त्यामुळे त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केली असावी म्हणूनच ईडीने ही धाड टाकली, अशी चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

‘शिवसेनेचं लग्न एकाशी, लफडं दुसऱ्याबरोबर’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

(kirit somaiya on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...