स्वातंत्र्यापूर्वीचे पुस्तक वाटून काय मिळवायचेय? प्रबोधनकार, जवळकरांच्या पुस्तकावरून किशोरी पेडणेकरांचा सवाल!
किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयात सर्व परिचारिका, वरिष्ठ डॉक्टर आमदार मनोज जामसुदकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली.

Kasturba Hospital : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ तसेच सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुष्मन’ या पुस्तकांच्या वाटपावरून मोठा वाद झाला आहे. निवृत्त कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सहकाऱ्यांना ही पुस्तकं भेट म्हणून दिली होती. मात्र काही महिला कर्मचाऱ्यांनी ही पुस्तके घेण्यास नकार देत ती निवृत्त कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकून दिली. याच घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन बैठक घेतली. ही बैठक घेतल्यानंतर त्यांनी देशाचे दुष्मन हे पुस्तक हातात घेऊन 1925 सालापूर्वीचे पुस्तक वाटून काय मिळवायचे होते? असा सवाल केलाय. आता त्यांच्या या विधानानंतर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची ही पुस्तके…
किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयात सर्व परिचारिका, वरिष्ठ डॉक्टर आमदार मनोज जामसुदकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुढे येत आमच्या कृत्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत माफी मागितली. पेडणेकर यांनी मात्र भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची ही पुस्तके वाटून निवृत्त कर्मचाऱ्याला काय साध्य करायचं होत? असा सवाल केला. तसेच समोर आलेल्या व्हिडीओच्या सत्यतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचा पोलीस तपास करतील असे सांगितले. सोबतच हे पुस्तक का वाटण्यात आले, कदम या निवृत्त कर्मचाऱ्याच्या पुस्तकवाटपाच्या मागे कोण आहे? असा सवलही त्यांनी उपस्थित केला.
पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या?
“कस्तुरबा हॉस्पिटलच्या सिस्टर इन्चार्ज मीडियासमोर आलेल्या आहेत. ऑनड्यूटी, युनिफॉर्मवर यायचं नसतं. पण या नर्सच्या वतीने मी त्यांच म्हणणं मांडत आहे. मुळात कोणत्याही पुस्तकाला फेकफेकी केलेली नाही. दोन पुस्तकं वाटली गेली. ती पुस्तकं एका लिफाफ्यात होती. कदम नावाच्या निवृत्त व्यक्तीने 100 वर्षांपूर्वींचे विचार असलेली पुस्तकं वाटण्याचा प्रयत्न केला,” असं विधान पेडणेकर यांनी केला.
प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक मागे होतं
“आमदार, मनोज जासमूदकर तसेच आम्ही सर्वांनी या प्रकरणाची चौकशी केली. यातून लक्षात आलं की कदम नावाची व्यक्ती वादग्रस्त होती. त्यांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक मागे होतं. कोणीही पुस्तकं झिडकारलेली नाहीत. ती पुस्तकं फक्त नाकारण्यात आली. पुस्तकं नाकारणं आणि झिडकारून देणं यात फरक आहे. व्हिडीओत एक लिफाफा होता. हा लिफाफा पडला,” असा दावा पेडणेकर यांनी केला.
देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीचे पुस्तक वाटून काय मिळवायचंय?
तसेच, समोर आलेला व्हिडीओ किती सत्य आहे किती असत्य आहे हे पोलीस शोधून काढतील. परंतु कदम यांना माझे सांगणे आहे की तुमच्या व्यक्तीगत रागाचा परिणाम अख्ख्या जाती-धर्मांवर होता कामा नये. कारण देशाचे दुष्मन हे 1925 सालापूर्वीचे म्हणजे देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीचे आहे. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीचे पुस्तक आता वाटून कदम यांना काय मिळवायचे आहे? हे शोधून काढायला हवे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
