AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तरला ‘पंढरपूर’ का करता आलं नाही चंद्रकांत पाटील, फडणवीसांना? भाजप उमेदवाराच्या पराभवाची पाच कारणं

कोल्हापूर शहराला राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा लाभला आहे. धार्मिक राजकारणाकडे येथील बहुतांशी मतदार त्या वाट्याला जात नाही, तरीही कोल्हापूरात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळेच भाजपच्या धार्मिक मुद्याला येथील मतदार भुलला नाही.

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापूर उत्तरला 'पंढरपूर' का करता आलं नाही चंद्रकांत पाटील, फडणवीसांना? भाजप उमेदवाराच्या पराभवाची पाच कारणं
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभवImage Credit source: TV9
| Updated on: Apr 16, 2022 | 4:12 PM
Share

कोल्हापूरः असं म्हटलं जातं की, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांचा प्रारंभ हा कोल्हापुरातून होतो. त्याला राजकारण तर बिलकुल अपवाद नाही. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्यानंतर कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक (Kolhapur North by Election) जाहीर झाली. त्यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayushri Jadhav) यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळाली. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत ज्या प्रकारे भाजप आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली तशीच लढत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतही झाली.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडीला दणका देण्यात आला. आणि भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करण्यात आला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवर समाधान आवताडे 3733 मतांनी विजयी झाले होते.

बारा बलुतेदारांमध्ये नाराजी

या विजयामुळे भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. विजय मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक त्याच्यासोबत राहीले. भारतीय जनता पार्टी आणि सर्वजण एकत्रित काम करत होते. आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला. हा विजय विठ्ठलाला समर्पित, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसेच यावेळी फडणवीस यांनी वेळ आली तर राज्यातील सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण सध्या कार्यक्रम हा कोरोनाचा करायचा आहे. सध्या सरकार नाही तर कोरोनाकडे आमचे लक्ष आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची चर्चा जोरदार झाली होती. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र या पोटनिवडणुकीत भाजपने मांडलेली सगळई गणितं फेल ठरली होती.

शाहू महाराजांचा वैचारिक वारसा

कोल्हापूर शहराला राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा लाभला आहे. धार्मिक राजकारणाकडे येथील बहुतांशी मतदार त्या वाट्याला जात नाही, तरीही कोल्हापूरात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळेच भाजपच्या धार्मिक मुद्याला येथील मतदार भुलला नाही. काश्मिर फाईल्सचा मुद्दाही याच काळात उपस्थि करण्यात आला होता, मात्र त्याकडे मतदार फिरकलेही नाहीत. याचा परिणामही कोल्हापूर निवडणुकीवर झाला असल्याचे दिसत आहे.

स्वतः बंटी पाटलांचा हसन मुश्रीफ

कोल्हापूर उत्तर मतदार संघात काही भाग हा बंटी पाटलांच्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम कोल्हापूर पोटनिवडणूकीवर झाला आहे. ज्या प्रकारे सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट कोल्हापूरच्या राजकारणात आहे, तसाच एक गट हसन मुश्रीफ यांचाही आहे. महाविकास आघाडीतील हे दोघे नेते असल्याने त्याचाही फायदा पोटनिवडणुकीत झाला आहे.

शेती, कारखाना, गोकुळ मधून मजूर, भाजपला हिंदूत्वाचा मुद्दा

कोल्हापूरचं राजकारण सहकारी संस्था, साखर कारखाने आणि विविध संस्थांवरच येथील राजकारण चालतं. कारण याच कारखान्यातून काम करणारा जो जनसामान्य वर्ग आहे तोच येथील कोल्हापूरातील आहे. यामधील बहुतांशी संस्थांवरही सतेज पाटील गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणूकीत याचाही फायदा झाला आहे.

चंद्रकांत जाधवांना कोल्हापूरकर विसरले नाहीत

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा खरा पिंड हा राजकारणाचा नव्हता, पण सामाजिक कामात सतत व्यस्त असणाऱ्या या चंद्रकांत जाधवांनी आपल्या त्या कामावरच आमदारकी मिळवली होती. त्यामुळे ते गेल्यानंतरही कोल्हापूर उत्तरमधील मतदार त्यांना विसरला नाही. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचाच फायदा त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना झाला आहे.

शेवटच्या टप्प्यात मुख्यत्र्यांकडून आवाहन

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी अनेक दिग्गजांनी येथे सभा घेतल्या आणि मतदारांना मार्गदर्शन केले. सतेज पाटील यांनी तर सगळा कोल्हापूर उत्तर मतदार संघ पिंजून काढला होता. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन मेळाव्यात कोल्हापूरकरांना मतदानाचे आवाहन केले आणि त्याला शिवसैनिकांसह कोल्हापूरकरांना जयश्री जाधव यांना निवडून दिले.

संबंधित बातम्या

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : सोमय्याला पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी जावं लागेल, संजय राऊतांचा सोमय्यावर नव्या घोटाळ्याचा आरोप, कागदपत्रेही दाखवली

पाकिस्तान: पंजाब संसदेत प्रचंड गदारोळ, नेत्यांनी उपसभापतींना मारल्याचा आरोप

Ramdas Athawale On Pawar : शरद पवार अजिबात जातीयवादी नाहीत, फडणवीसांच्या ट्विटर बाँबनंतरही आठवले मतावर ठाम

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.