AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : सोमय्याला पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी जावं लागेल, संजय राऊतांचा सोमय्यावर नव्या घोटाळ्याचा आरोप, कागदपत्रेही दाखवली

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा (toilet scam) केलाय. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जावं लागेल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घोटाळ्याची कागदपत्रे दाखवली. ते नाशिक येथे आले असता बोलत होते.

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : सोमय्याला पुन्हा अटकपूर्व जामिनासाठी जावं लागेल, संजय राऊतांचा सोमय्यावर नव्या घोटाळ्याचा आरोप, कागदपत्रेही दाखवली
नाशिकमध्ये संजय राऊतांनी टॉयलेट घोटाळ्याची कागदपत्रे दाखवली.
| Updated on: Apr 16, 2022 | 3:36 PM
Share

नाशिकः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा (toilet scam) केलाय. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जावं लागेल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घोटाळ्याची कागदपत्रे दाखवली. ते नाशिक येथे आले असता बोलत होते. राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) या देशातल्या सर्वात मोठा टॉयलेट घोटाळा केला आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा सुद्धा पैशाचा अपहार आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली. आम्ही सर्व त्यात होतो. आयएनएस विक्रांत वाचावी. त्यात संरक्षणविषयक म्युझियम बनवावं, अशी मोहीम होती. सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची मागणी होती. दुर्दैवाने ती पूर्ण झाली. त्यानंतर या महाशयांनी स्वतःची सेव्ह विक्रांत मोहीम सुरू केली आणि त्यात घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला.

दिलासा कोर्ट म्हणते ते चुकीचे…

संजय राऊत म्हणाले की, सोमय्या यांनी विक्रांत वाचवायच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केले. लोकांनी पैसे दिले. लोकांना वाटलं पैसे योग्य ठिकाणी पोहचले, पण गेल्या दोन महिन्यांपूर्वी अशी माहिती समोर आली की, हे पैसे जिकडे जायचे आहेत, तिकडे गेले नाहीत. मध्येच कुठेतरी या पैशाचा अपहार झालेला आहे. त्यानंतर काही त्यानंतर काही निवृत्त लष्करी जवानांनी तक्रार दाखल केली. दिलासा कोर्ट म्हणतं 2013 च्या प्रकरणी आता गुन्हे दाखल होतायत. पण हे पूर्णतः चुकीचंय. कारण आतापर्यंत पैशाचा अपहार झाल्याचे आता उघड झाले आहे. 2022 मध्ये राजभवनातून ही माहिती मागवली. त्यावेळी हे समोर आलं. 58 कोटींचा हिशेब आम्ही मागतोय. मात्र, हा आकडा कुठून आणला असे आरोपी म्हणतोय. आमचं असं म्हणणंय की 58 कोटी 158 कोटी हे पोलीस तपासात निष्पण्ण होईल.

सत्र न्यायालय योग्य…

संजय राऊत म्हणाले की, सत्र न्यायालयानं विक्रांत घोटाळ्याबाबत जामीन नाकारताना बेइमानी झालेली आहे, हे विचारात घेतलं. अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्याचं सत्र न्यायालयाचं निरीक्षण आहे. म्हणून त्यांना जामीन नाकारलाय. मात्र, सध्या हायकोर्टामध्ये जो दिलासा घोटाळा सुरूय त्या घोटाळ्यात हे एकाच पक्षाचे लाभार्थी असतात. त्या लाभार्थींना हा लाभ मिळालाय. देश कुठे चाललाय हे यातून कळतंय. यातून सरळसरळ अपहार दिसतोय. ही सरळसरळ लोकांची फसवणूक आहे. सरळसरळ देशाच्या भावनेशी खेळून कोट्यवधी रुपये गोळा केलेत. आणि तरीही त्यांना दिलासा मिळतो. मात्र, आमचे असंख्य कार्यकर्ते, लोकांना एक रुपयाचाही दिलासा कधी मिळालेला नाहीय. फक्त केंद्रीय तपास यंत्रणाही नाही, तर न्याय यंत्रणाही कोण चालवतेय, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे दुर्दैवाने आम्हाला इथे बोलावे लागतेय.

महापालिकांचे कोट्यवधी हडपले…

राऊत म्हणाले की, मी कालच विक्रांत घोटाळ्यातल्या आरोपीचा शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा काढलाय. (यावेळी राऊतांनी घोटाळ्याची कागदपत्रे माध्यमांना दाखवली.) माणसे कुठे पैसे खाऊ शकतात, तर टॉयलेटमध्ये सुद्धा. हा मीरा-भाईंदर पालिकेच्या आयुक्तांचा अहवालय. किरीट सोमय्या, त्यांची पत्नी आणि मुलाचे एक एनजीओ आहे. त्याचे नाव युवा प्रतिष्ठान. त्यांनी खोटी बिले तयार करून युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कांदळवनाची बेकायदेशीरपणे कत्तल करून तिथे निधी वापरला. महापालिकांचे कोट्यवधी रुपये हडप केले. यासंदर्भातले कागद इथे आहेत. या कागदावरतीच गुन्हा दाखल होणारय. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अटकपू्र्व जामिनासाठी जावं लागेल. आपल्याला आज ना उद्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूच्या कोठडीत रहावं लागेल.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.