जंगलात नव्हे उसाच्या शेतात दोन गव्यांची झुंज, एकाचा मृत्यू; उसाचे मोठे नुकसान

जंगलात नव्हे उसाच्या शेतात दोन गव्यांची झुंज, एकाचा मृत्यू; उसाचे मोठे नुकसान

बाजारभोगावमध्ये या दोन गव्यांची झुंज लागून आज सकाळी एका गव्याचा मृत्यू झाला. दोन गव्यांची झुंज लागल्यानंतर ज्या ठिकाणी ही झुंज लागली त्या ठिकाणी उसाची शेती होती, त्यांच्या या झुंजीमुळे उसाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

महादेव कांबळे

|

May 13, 2022 | 4:15 PM


कोल्हापूरः सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) चंदगड, गडहिंग्लज, आजरा आणि राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात मानवी वस्तीतून आणि शेती परिसरात गव्यांचा (Gaur) वावर वाढला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान आणि नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. गव्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतीचे प्रचंड नुकसान गव्यांकडून केले जात आहे. बाजारभोगावमध्येही आज गव्यांचा वावर दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. बाजारभोगावमधील (Bajarbhagav) मोडका ओढा परिसरातील उसाच्या शेतामध्ये दोन गव्यांची झुंज लागल्याने त्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू झाला आहे.

ही झुंज (Gaur Fighting) उसाच्या शेतात लागल्याने उसाच्या शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. झुंज लागून गवा मृत झाल्याने गव्याच्या शवविच्छेदनाच्या पंचनाम्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले असून पुढील तपास वन विभाग करत आहे.

उसाच्या शेतात झुंज

बाजारभोगावमध्ये या दोन गव्यांची झुंज लागून आज सकाळी एका गव्याचा मृत्यू झाला. दोन गव्यांची झुंज लागल्यानंतर ज्या ठिकाणी ही झुंज लागली त्या ठिकाणी उसाची शेती होती, त्यांच्या या झुंजीमुळे उसाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एक गवा मृत झाल्यानंतर दुसरा गवा जंगलाच्या दिशेने पळून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्यावेळी उसाच्या शेतीचे मालक शेतात आले आणि त ज्यावेळी गव्याचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वन विभागाकडून पंचनामा

वन विभागाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृत गव्याची तपासणी केली असता त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचे त्यांना आढळून आले. वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे शेतकऱ्याचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होते असते त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकरीवर्गातून होत आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें