Sangram Patil Martyr | शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापुरात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर आज (23 नोव्हेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार आहे. (Kolhapur Nigwe Martyr Sangram Patil Funeral)

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 8:44 AM, 23 Nov 2020
Sangram Patil Martyr | शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापुरात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर आज (23 नोव्हेंबर) अंत्यसंस्कार केले जाणार आहे. संग्राम पाटील याचं पार्थिव कोल्हापुरातील निगवे खालसा गावात दाखल झाले आहे. गावातील चनिशेटी विद्यालयासमोरील क्रीडांगणावर त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Kolhapur Nigwe Martyr Sangram Patil Funeral)

जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना (21 नोव्हेंबर) वीरमरण आलं. यानंतर दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले आहे. शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव काश्मीरमधून विमानाने पुणे विमानतळावर येथे दाखल झाले. त्यानंतर रात्रीच ते पार्थिव कोल्हापुरात दाखल झाले.

संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Nigwe Martyr Sangram Patil Funeral)

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला.

अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण

ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमा भागात तैनात होते. पाक सैन्याकडून 13 नोव्हेंबरला पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दवाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं. (Kolhapur Nigwe Martyr Sangram Patil Funeral)

संबंधित बातम्या : 

आठवडाभरात कोल्हापूरचा दुसरा जवान शहीद, निगवेचे संग्राम पाटील धारातीर्थी