मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजच्या दहा जागतिक विजेत्यांमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेचा समावेश

कोल्हापूर : आजच्या धवत्या जगात आपल्याला सगळं कसं इनस्टंट हवं आहे. त्याप्रमाणे आज आपल्या एका क्लीकवर फोटो ही उत्तम हवे असतात. त्यामुळे आजची तरूण पिढी ही चांगले फोटो येण्यासाठी चांगले फोन घेतात. चांगला फोटो (Photo) यावा म्हणून चांगले लोकेशन शोधतात. निसर्गाने आपल्या कॅनव्हासवर (canvas) केलेली उधळण आपल्या कॅमेरॅत कैद करण्यासाठी अनेकांची धडपड असते. अशीच धडपड […]

मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजच्या दहा जागतिक विजेत्यांमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेचा समावेश
कोल्हापूरचा प्रज्वल चौगुले Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 4:34 PM

कोल्हापूर : आजच्या धवत्या जगात आपल्याला सगळं कसं इनस्टंट हवं आहे. त्याप्रमाणे आज आपल्या एका क्लीकवर फोटो ही उत्तम हवे असतात. त्यामुळे आजची तरूण पिढी ही चांगले फोटो येण्यासाठी चांगले फोन घेतात. चांगला फोटो (Photo) यावा म्हणून चांगले लोकेशन शोधतात. निसर्गाने आपल्या कॅनव्हासवर (canvas) केलेली उधळण आपल्या कॅमेरॅत कैद करण्यासाठी अनेकांची धडपड असते. अशीच धडपड एका कोल्हापूरच्या पट्ट्याची होती. त्यांच्या मेहनेतीचे आज चीज झाले आहे. त्याने असा एक फोटो काढला आणि तो दहा जागतिक विजेत्यांमध्ये आला आहे. तर हा पट्ट्या कोण? त्याने असा कोणता फोटो काढला? असाही सवाल तुम्हालाही पडला असेल. तर हा फोटो काढणारा आपला कोल्हापूरचा (Kolhapur) प्रज्वल चौगुले असून त्याने अ‍ॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. अ‍ॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेसह जगातील चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन २५ जानेवारी २०२२ रोजी फोटोग्राफी प्रेमींसाठी करण्यात आलं होतं आणि १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रवेश स्वीकारण्यात आला होता.

प्रज्वलच्या नावाचाही समावेश

अ‍ॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांनी भाग घेतला होता. ज्यात प्रज्वल चौगुलेच्या नावाचाही समावेश होता. प्रज्वल चौगुलेने कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो काढला होता आणि तो स्पर्धेत पाठवला होता. त्याच्यासह इतरांनी काढलेले फोटो हे Apple.com वर, Apple च्या Instagram (@apple) वर टाकण्यात आले होते. तर प्रज्वल चौगुलेने कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो हा आयफोन १३ प्रोमध्ये काढला. हा फोटो पाहिल्यास जाळ्यावर पडलेले दवबिंदू हे चमकणारे मोती दिसत होते. या छायाचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

थेंबांचा फोटो

याबाबतीत बोलताना प्रज्वल चौगुले म्हणाला, मला निसर्गात फिरायला आवडते. त्याचबरोबर फोटो काढायलाही आवडतात. मी माझ्या आयफोन १३ प्रोसह पहाटे फिरायला जातो. त्यावेळी मी निसर्गाने आपल्या कॅनव्हासवर केलेली मक्त उधळण मी फोटोच्या स्वरूपात कैद करण्याचा प्रयत्न करतो. मी काढलेल्या अनेक फोटोंनी छायाचित्रकारांना आनंद दिला आहे. माला तसे तर कोळ्याच्या जाळ्यावरील दव थेंबांचा फोटो घ्यायचा होता आणि तसा माझा प्रयत्न ही सुरू होता. पण भाग्य साथ देत नव्हते. पण तो क्षण आला आणि कोरड्या कोळ्याच्या रेशीमने हारावरिल दवाने मोत्यांचाल हार तयार केल्याचे माला दिसले. ते दव मोत्यासारखे चमकत होते. हे पाहून मी मोहित झालो. असं प्रज्वल चौगुलेने सांगितलं. तर हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर प्रतिक्रीया देताना, हे छायाचित्र अप्रतिम आहे. मोठ्या बारकाईने कोळ्याच्या जाळ्यावरील दवबिंदू टीपले गेले आहेत. असं काहीतरी निसर्गात घडतं याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असतं, असं जज मेकर यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Central Government : Zero Budget शेतीसाठी मोठी आर्थिक तरतूद, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Photo Gallery | माझ्या ओठी नाव भीम, गौतमाचं येई; नाशिकमध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साहात!

Video : भारतीय गाण्यावर न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर ठुमके, लाखो लाईक्स- करोडो व्ह्यूज, व्हीडिओ पाहून तुम्हीही फिदा व्हाल!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.