AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडीतून मध्य प्रदेशात चालत निघालेल्या कामगाराला कसारा घाटात हार्टअटॅक

मुंबई-नाशिक महामार्गावरुन पायी निघालेल्या 55 वर्षीय परप्रांतिय कामगाराचा मृत्यू झाला (labour died after heart attack near kasara Ghat ) आहे.

भिवंडीतून मध्य प्रदेशात चालत निघालेल्या कामगाराला कसारा घाटात हार्टअटॅक
| Updated on: Apr 24, 2020 | 2:16 PM
Share

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरुन पायी निघालेल्या 55 वर्षीय परप्रांतिय कामगाराचा मृत्यू झाला (labour died after heart attack near kasara Ghat ) आहे. लॉकडाऊनमुळे हा परप्रांतिय मजूर भिवंडीवरुन पायीच गावी निघाला होता. त्यांच्यासोबत अन्य तीन-चार सहकारी होते. मात्र कसारा घाटाच्या पायथ्याशी रस्त्यातच हार्टअटॅक आल्याने, एकाचा  दुर्दैवी मृत्यू झाला. शिवशरण मोतीलाल सोनी (55) असं या दुर्दैवी कामगाराचं नाव आहे. ते मध्यप्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातील गरवली गावाकडे पायी निघाले होते. मात्र वाटेतच त्यांना हार्टअॅटकने गाठल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचं पार्थिव इगतपुरी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं. शविविच्छेदनानंतर पार्थिव सोबतच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आलं. मात्र पार्थिव घेऊन ते कुठे गेले आणि त्यांना कुठे पाठवण्यात आले याची माहिती कसारा पोलिस देण्यात तयार नाहीत. त्याबाबत प्रशासनाकडूनही अद्याप माहिती मिळालेली नाही.

पायी निघालेले 231 मजूर ताब्यात दोनच दिवसापूर्वी कल्याण पोलिसांनी पायी निघालेल्या 231 मजूरांना ताब्यात घेतलं होतं. कल्याण डोंबिवलीत एकीकडे कोरोनाचा होटस्पॉट बनला आहे, तर दुसरीकडे डोंबिवली एम आय डीसीमध्ये काम करणारे 231 मजूर पायी चालत यूपी बिहारला जात असताना, त्यांना कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

डोंबिवली ग्रामीण भागात गोळवली, दावडी, टाटा पावर भागात राहणारे हे तब्बल 231 मजूर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास यूपी आणि बिहारला जाण्यासाठी निघाले होते. कल्याण पोलिसांनी या सर्व मजुरांना कल्याण पश्चिम दुर्गाडी चौकात ताब्यात घेतले. कल्याणच्या सुभाष मैदानात केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी करण्यात आली.

(labour died after heart attack near kasara Ghat )

संबंधित बातम्या 

पायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.