AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असल्या तरी, त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुली होणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. याउलट, योजनेचा गैरवापर करून लाभ घेतलेल्या १४ हजार पुरुषांकडून मात्र रक्कम वसूल केली जाईल. यामुळे अपात्र महिलांना दिलासा मिळाला असून, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा
24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय घेण्यात आलेत
| Updated on: Jun 02, 2026 | 8:25 AM
Share

महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या महिलांना यापुढे योजनेचा लाभ आणि दरमहा मिळणारे 1500 रुपये आता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून सध्या राज्यभरात चर्चा सुरू असून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र अपात्र ठरलेल्या या लाखो महिलांना आतापर्यंत जे पैसे देण्यात आले, त्यांची वसुली त्यांच्याकडून करण्यात येणार का असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचसंदर्भात आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 24 तासांतच लाडकी बहीण योजनेबाबात 2 मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

लाखो महिलांकडून होणार वसुली ?

लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता केवळ 1 कोटी 66 लाख महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून त्यांच्या खात्यात दरमहा योजनेच्या लाभाची रक्कम जमा होईल. पण ज्या महिला अपात्र ठरल्या, त्यांचं काय ? त्यांना जी रक्कम इतके महिने देण्यात आली, त्याची वसुली होणार का ? असा सवाल अनेक महिलांच्या मनात आहे. मात्र यायाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या 81 लाख महिलांकडून पैसे वसूल करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

14 हजार पुरुष लाभार्थ्यांकडून वसूल करणार रक्कम

लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाले असून केवळ महिलांसाठी ही योजना असतानाही हजारो पुरूषांनी या योजनेचा लाभ घेत रक्कम लाटल्याचे समोर आले होते. त्यांना मात्र आता मोठा दणका बसणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची डेटाबेसद्वारे पडताळणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. थोडथोडक्या नव्हे तर 14 हजार पुरूषांनी महिलांच्या नावे अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत, पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यांच्यात़कडून मात्र लाटलेले हे पैसै आता पुरेपूर वसूल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पुरुषांना दणका बसणार असून शासकीय योजनेत गैरप्रकार करण त्यांना चांगलंच महागात पडणार आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात