Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांची लॉटरी? सरकार रक्षाबंधनाला…तातडीची अपडेट समोर!
लाडक्या बहिणींना आतापर्यंत जून महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींनी जुलै महिन्यात मिळाले. आता जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. तरीदेखील महिलांना अद्याप जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत.

Ladki Bahin Yojana Latest Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. याच पैशांचा वापर करून महिला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करतात किंवा इतर कामासाठी हे पैसे वापरतात. सरकार लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे पाठवते. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या याच पैशांबाबत एक प्रश्न विचारला जातोय. यावेळी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये टाकले जाणार का? असं लाडक्या बहिणी विचारत आहेत.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार का?
लाडक्या बहिणींना आतापर्यंत जून महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींनी जुलै महिन्यात मिळाले. आता जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. तरीदेखील महिलांना अद्याप जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. सरकार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यावर पैसो पाठवण्याचा प्रयत्न करते. परंतु अजूनही जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसल्याने यावेळी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार का? असं लाडक्या बहिणी विचारत आहेत.
रक्षाबंधनाला मिळणार का गिफ्ट?
राज्य सरकारने 2024 साली लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं होतं. सरकारने त्यावेळी दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणेच दिले होते. म्हणजेच त्यावेळी लाखो महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपयांऐवजी थेट 3000 रुपये आले होते. यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे. हा सण महिलांचा असतो. या दिवशी महिला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतात. त्यामुळे 2024 सालाप्रमाणेच सरकार या वर्षीदेखील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ एकत्रित देणार का? असे विचारले जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळावेत अशी मागणीही काही लडक्या बहिणी करत आहेत.
महिलांना एकत्र 3000 रुपये मिळणार का?
दरम्यान, सरकारने दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित देण्याबाबत अद्याप कोणताही तातडीचा निर्णय घेतलेला नाही. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके कधी मिळतील, याबाबतही काही सांगितलेले नाही. जुलै महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दिले जाऊ शकतात. तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असले तरीही हे पैसे कधी मिळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
