वर्ध्यात कोरोनाचा वाढता प्रकोप, 5 दिवसात 451 रुग्ण, 36 तासाची संचारबंदी

आता वर्धा जिल्ह्याचाही समावेश होत आहे. वर्ध्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप वाढत आहे.

वर्ध्यात कोरोनाचा वाढता प्रकोप, 5 दिवसात 451 रुग्ण, 36 तासाची संचारबंदी
Maharashtra corona virus


वर्धा : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रकोप आरोग्य यंत्रणांच्या काळजीत भर टाकत आहे. यात आता वर्धा जिल्ह्याचाही समावेश होत आहे. वर्ध्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश काढण्यात आले आहेत. एवढंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी 36 तासांची संचारबंदीही जाहीर केलीय. वाढत्या कोरोनाचा प्रकोप प्रशासनाची चिंता वाढवणारा ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण 25 हॉटस्पॉट आहेत. यापैकी वर्धा तालुक्यात 19, हिंगणघाट तालुक्यात 3 आणि देवळी तालुक्यात 3 हॉटस्पॉट आहेत (Latest Corona Updates of Wardha on 20 February 2021 Maharashtra).

आटोक्यात असलेला कोरोना आता वाढत आहे. जिल्ह्यात मागील 5 दिवसांमध्ये तब्बल 451 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढवलीय. एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे नागरिक अद्यापही निष्काळजी पणा दाखवत आहेत. शासनाने दिलेल्या नियमांचं नागरिक पालन करताना दिसत नाहीये. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदी आदेश देण्यात आले आहेत. एवढंच नाही तर आज संध्याकाळपासून 36 तास संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी केलंय. वर्धा जिल्ह्यात पाच दिवसात 451 कोरोनाबधित रुग्ण आढळले, तर 5 लोकांचा मृत्यू झालाय.

मागील 5 दिवसात जिल्ह्यात आढळलेल्या तालुकानिय रुग्णांची संख्या

14 फेब्रुवारी – 69 रुग्ण – 1 मृत्यू

 • वर्धा – 51
 • आर्वी – 1
 • हिंगणघाट – 7
 • सेलू – 5
 • आष्टी – 4
 • समुद्रपूर – 1

15 फेब्रुवारी – 10 रुग्ण – 2 मृत्यू

 • वर्धा – 10
 • 16 फेब्रुवारी – 90 रुग्ण – 1 मृत्यू
 • वर्धा – 64
 • आर्वी – 2
 • हिंगणघाट – 5
 • सेलू – 6
 • आष्टी – 4
 • कारंजा – 9

17 फेब्रुवारी – 85 रुग्ण – 1 मृत्यू

 • वर्धा – 60
 • आर्वी – 3
 • देवळी – 2
 • हिंगणघाट – 7
 • सेलू – 5
 • आष्टी – 4
 • कारंजा – 3
 • समुद्रपूर – 1

18 फेब्रुवारी – 89 रुग्ण – 0 मृत्यू

 • वर्धा – 62
 • आर्वी – 9
 • देवळी – 3
 • हिंगणघाट – 8
 • सेलू – 1
 • कारंजा – 4
 • समुद्रपूर – 2

19 फेब्रुवारी – 108 रुग्ण – 0 मृत्यू

 • वर्धा – 72
 • आर्वी – 7
 • देवळी – 4
 • हिंगणघाट – 11
 • सेलू – 4
 • आष्टी – 3
 • कारंजा – 5
 • समुद्रपूर – 2

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे वर्धा तालुक्यात आढळत आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून वर्धा तालुका समोर येत आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने आता चाचण्या वाढवायला सुरवात केली आहे. मागील 8 दिवसांमध्ये 5 हजार 560 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे.

मागील 8 दिवसात झालेल्या कोरोना चाचण्या

 • 12 फेब्रुवारी – एकूण 862 चाचण्या
 • 13 फेब्रुवारी – एकूण 618 चाचण्या
 • 14 फेब्रुवारी – एकूण 543 चाचण्या
 • 15 फेब्रुवारी – एकूण 111 चाचण्या
 • 16 फेब्रुवारी – एकूण 727 चाचण्या
 • 17 फेब्रुवारी – एकूण 771 चाचण्या
 • 18 फेब्रुवारी – एकूण 681 चाचण्या
 • 19 फेब्रुवारी – एकूण 1247 चाचण्या

हेही वाचा :

Wardha Curfew | वर्ध्यात संचारबंदी लागू, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद

कोरोनाग्रस्त वाढतेच, ‘त्या’ तीन शहरांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार : अजित पवार

वर्धा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता! 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी

व्हिडीओ पाहा :

Latest Corona Updates of Wardha on 20 February 2021 Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI