VIDEO | लातूरमध्ये कोरोना रुग्णांत वाढ, सार्वजनिक कार्यक्रमावर ‘हे’ निर्बंध, पाहा जिल्हाधिकारी काय म्हणाले?

लग्न तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केवळ 100 लोकांनाच एकत्रित येण्यास येथील जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. ( latur ban gathering marriage ceremony corona)

VIDEO | लातूरमध्ये कोरोना रुग्णांत वाढ, सार्वजनिक कार्यक्रमावर 'हे' निर्बंध, पाहा जिल्हाधिकारी काय म्हणाले?
लातूरचे जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी. पी.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 7:58 PM

लातूर : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे जिल्हा पातळीवर प्रशासन अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी जिल्हापातळीवर प्रयत्न केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता येथील जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी. पी. यांनी लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. लग्न तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केवळ 100 लोकांनाच एकत्रित येण्यास येथील जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसे आदेश जारी केले आहेत. (latur ban on gathering of moret than 100 people in marriage and other ceremony due to corona virus )

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लोकांच्या एकत्रित येण्यावर निर्बंध घातले आहेत . जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नवीन आदेशा नुसार लग्न समारंभ किंवा लॉन्सवर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी केवळ 100 लोकांनाच एकत्रित येण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासगी शिकवण्यांनाही कोरोना प्रतिबंधक उपाय पाळण्याचे कडक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी काय म्हणाले, पाहा व्हिडीओ :

खासगी शिकवण्यांसाठी काय आदेश?

लातूरमध्ये खासगी शिकवण्याचे मोठे जाळे आहे. येथे निट, सिईटी सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात. त्यामुळे येथील खासगी शिकवण्यांना कोरोना प्रतिंबधात्मक नियम पाळण्याचे कडक आदेश येथील जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी शिकवण्यांच्या मालकांना दिल्या आहेत. शिकवण्यांना सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे या गोष्टींकडे लक्ष टेवण्याचे सांगण्यात आले आहे.

अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दोन्ही जिल्हा प्रशासनाने  हा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्ह्यात दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय.

दरम्यान, लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. असे असले तरीसुद्धा सध्याची परिस्थिती पाहता येथील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. याच कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंधाचे आदेश दिले आहेत.

इतर बातम्या :

मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन

मुंबईत लग्‍न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये ‘हे’ नियम पाळणं बंधनकारक, अन्यथा गुन्‍हा दाखल होणार

अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होणार?, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठीचे पास निम्म्यावर; कोरोना संसर्गामुळे अलर्ट

(latur ban on gathering of moret than 100 people in marriage and other ceremony due to corona virus)

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.