AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : लातुरकरांच्या मनात आजही विलासराव देशमुख, जयंतीनिमित्त अभिवादनासाठी एकवटले सर्वपक्षीय नेते

स्व. विलासराव देशमुखम यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले होते. तर दिवस उजाडल्यापासून लातुरातील नागरिकांची पावले ही बाभळगावच्या दिशेने निघाली होती. लातुरकर आणि विलासराव देशमुख यांचे एक वेगळे नाते होते. आजही त्यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक त्यांच्या बरोबरची आठवण ही सोशल मिडीयावर शेअर करीत आहे.

Latur : लातुरकरांच्या मनात आजही विलासराव देशमुख, जयंतीनिमित्त अभिवादनासाठी एकवटले सर्वपक्षीय नेते
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 4:08 PM
Share

लातूर : राजकारणातले एक दिलखुलास व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री (Vilasrao Deshmukh) स्व.विलासराव देशमुख यांची गुरुवारी 77 वी जयंती जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी पार पडली. बाभळगाव येथील त्यांच्या (Salutations at the tomb site) समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी सर्वक्षीय नेते एकवटले होते. तर सकाळपासूनच लातुरकरांनी समाधीस्थळी एकच गर्दी केली होती. राज्याची धुरा सांभाळत असतानाही (Latur) लातुरकरांशी त्यांची नाळ कशी जोडली गेली होती त्याचे किस्से आजही लातुरकर तेवढ्याच आत्मियतेने मांडतात. राजकारणात अजात शूत्र असे व्यक्तिमत्व असलेले विलासराव यांची दिवसभरात एकदा तरी आठवण निघाल्याशिवाय लातुरकरांचा दिवस हा मावळत नाही. गुरुवारीही त्यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम तर झालेच पण जो तो त्यांच्या बाबतीत झालेला किस्सा मांडत होता.

समाधीस्थळी एकवटले लातूरकर

स्व. विलासराव देशमुखम यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले होते. तर दिवस उजाडल्यापासून लातुरातील नागरिकांची पावले ही बाभळगावच्या दिशेने निघाली होती. लातुरकर आणि विलासराव देशमुख यांचे एक वेगळे नाते होते. आजही त्यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक त्यांच्या बरोबरची आठवण ही सोशल मिडीयावर शेअर करीत आहे. तर सकाळी देशमुख कुटुंबातील सर्वांनी त्याच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी अमित देशमुख , आमदार- धिरज देशमुख , माजी मंत्री- दिलीपराव देशमुख, विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख यांनी विलासरावांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले . यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे ,माजी खासदार -डॉ .सुनील गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .

राजकारण विरहित मैत्रीमुळे विलासराव देखमुख मनामनात

विलासराव देशमुख राज्याच्या मुख्यमंत्री विराजमान असतानाही देखील त्यांनी सुडभावनेने राजकारण केले नाही. त्यांची अदा, भाषण शैली आणि शब्द सामुग्रीवर असलेली पकड याची भुरळ विरोधकांना देखील होती. आजही जेव्हा विलासराव देखमुख यांचा विषय असतो तेव्हा विरोधकांची भूमिका ही देखील नरमाईची असते. स्व. विलासराव देशमुखांनी सर्वसामान्यांच्या मनात तर घर केलेच पण यामधून विरोधक सुध्दा सुटू शकले नाही.

जयंती निमित्त कार्यक्रम

गुरुवारी सकाळी 8 वाजता विलासबाग येथे सर्व लातुरकर हे स्थानापन्न झाले होते. सकाळी 9 वाजता संगीतकार डॉ.वृषाली देशमुख-कोरडे व शशिकांत देशमुख यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी 9.45 वाजता शेवटचे भजन तर 10 पासून पुष्पअर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. हे कार्यक्रम समाधी स्थळी झाले असले तरी लातूर शहरात आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.