Latur : गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

निलंगा शहरातून गावाकडे निघालेल्या दुचाकीला भरधावात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरील दोघेही मित्र होते. रात्री उशिरा गावाकडे जात असताना निलंगा-औराद शहाजनी मार्गावरील एका पूलावर ही दुर्घटना घडली आहे. गाव 10 किमी अंतरावर असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

Latur : गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू
गुंजरगा येथील बालाजी राम शिंदे व सूर्यकांत वाघंबर शिंदे या दोघांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:18 PM

लातूर : निलंगा शहरातून गावाकडे निघालेल्या (Two Wheeler) दुचाकीला भरधावात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने (Two Death) दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरील दोघेही मित्र होते. रात्री उशिरा गावाकडे जात असताना (Nilanga) निलंगा-औराद शहाजनी मार्गावरील एका पूलावर ही दुर्घटना घडली आहे. गाव 10 किमी अंतरावर असतानाच ही दुर्घटना घडली आहे. गुंजरगा येथील बालाजी राम शिंदे व सूर्यकांत वाघंबर शिंदे या दोघांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरा दुचाकीवर निघाले होते गावाकडे

बालाजी शिंदे व सूर्यकांत शिंदे हे लहानपनापासूनचे मित्र होते. कामानिमित्त ते बुधवारी निलंगा शहरात आले होते. काम आटोपून निलंग्याहून रात्री ते उशिरा गुंजरगा या गावाकडे निघाले होते. दरम्यान, निलंगा-औराद रोडवरील उदगीर मोडपासून जवळच असलेल्या ज्ञानोबा बोधले यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

वाहनाचा तपास सुरु, गावात शोककळा

या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने गुंजरगा गावावर शोककळा पसरली होती. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. उपचारासाठी त्या दोघांना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निलंगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Aasaram | आसारामच्या आश्रमात मृतदेह सापडला, बेपत्ता अल्पवयीन मुलगी कारमध्ये मृतावस्थेत

CCTV | हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा

Aurangabad | मराठवाड्यात हल्ल्याचे सत्र सुरूच, Nanded हत्याकांडानंतर औरंगाबादेत व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.