AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा

सुरेंद्रने मुलाला जमाखर्च विचारला असता, दीड कोटी रुपयांचा हिशेब तो देऊ शकला नाही. त्यामुळे बापलेकामध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर सुरेंद्रने मुलाच्या अंगावर थिनर (रसायन) ओतले आणि पेटवून दिले

CCTV | हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा
बापाने मुलाला जिवंत जाळलंImage Credit source: टीव्ही9
| Updated on: Apr 08, 2022 | 10:15 AM
Share

बंगळुरु : बापाने मुलाची जिवंत जाळून हत्या (set on fire) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरु शहरात (Karnataka Bengaluru) हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला. खर्चाचे योग्य तपशील देऊ न शकल्यामुळे बापाने मुलाला केमिकल टाकून पेटवले. आगीत होरपळलेल्या 25 वर्षीय मुलाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सुरेंद्र असे आरोपी पित्याचे नाव असून त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. तर अर्पित असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. बापाने मुलाला पेटवल्याची घटना (Father Killed Son) परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

बंगळुरुतील व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान अर्पितचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चामराजपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाल्मिकी नगर परिसरात गेल्या शुक्रवारी म्हणजे 1 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. उपचार सुरु असताना गुरुवारी अर्पितने अखेरचा श्वास घेतला.

दीड कोटीचा हिशेब

ही घटना घडली त्यावेळी अर्पित दुकान चालवत होता. सुरेंद्रने त्याला जमाखर्च विचारला असता, दीड कोटी रुपयांचा हिशेब तो देऊ शकला नाही. त्यामुळे बापलेकामध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर सुरेंद्रने मुलाच्या अंगावर थिनर (रसायन) ओतले. त्यानंतर मुलगा रस्त्यावर गेला. तेव्हा बापही त्याच्या मागोमाग तिथे आला आणि त्याने माचिन काढून जळती काडी त्याच्या अंगावर फेकली.

अर्पितच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तो मदतीसाठी गयावया करु लागला. त्यानंतर तो रस्त्याने सैरावैरा धावत सुटला. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यामध्ये अर्पित 60 टक्के भाजला होता. त्याला स्थानिक नागरिकांनी व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केलं. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. सुरेंद्रच्या शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रला अटक केली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

CCTV | उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली

 प्रेयसीला अडकवण्यासाठी प्रियकराने रचला भयंकर कट, अंबरनाथमधील तरुणाच्या हत्येची उकल

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.