AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | मराठवाड्यात हल्ल्याचे सत्र सुरूच, Nanded हत्याकांडानंतर औरंगाबादेत व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

नांदेड हत्याकांडाला तीन दिवस उलटले असून औरंगाबादमध्येही एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.

Aurangabad | मराठवाड्यात हल्ल्याचे सत्र सुरूच, Nanded हत्याकांडानंतर औरंगाबादेत व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
औरंगाबादमध्येही व्यावसायिकावर प्राणघातक हल्लाImage Credit source: TV9 Marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 08, 2022 | 10:26 AM
Share

औरंगाबाद | मराठवाड्यातील व्यावसायिकांवर हल्ल्याचे (Businessman attacked ) सत्र सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता औरंगाबादमधील (Aurangabad) व्यावासायिकावरही प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राट देण्याच्या वादावरून एका टोळीकडून हा हल्ला झाला आहे. सिक्युरिटी एजन्सी व्यवसायिक कारभारी किसन जाधवर यांच्या चारचाकी गाडीला अडवण्यात आले. गुंडांनी जाधवर यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांना धमकी देत गाडीच्या बाहेर खेचले. नांदेडमधील व्यावसायिकाला तीन दिवसांपूर्वीच गोळ्या झाडून जीवे मारण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. नांदेड जिल्हा तर या थरारक घटनेने पूर्णपणे हादरला आहे. त्यात पुन्हा औरंगाबादमधील व्यावसायिकावर असा हल्ला झाल्याने ही मालिका कधी थांबणार, असा संतप्त सवाल व्यावासायिकांकडून विचारला जात आहे.

बाबा पेट्रोलपंपाजवळ गाडी अडवली

औरंगाबादचे व्यावसायिक कारभारी किसन जाधवर यांच्या चारचाकी गाडीवर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कंत्राट मिळण्याच्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचं जाधवर यांनी सांगितलं. गुरुवारी रात्री वाळूजहून औरंगाबादकडे येत असताना आरोपी आणि काही साथीदारांनी बाबा पेट्रोलपंप जवळ त्यांची गाडी अडवली. जाधवर यांनी ब्रेक दाबून गाडी थांबवली. तेव्हा आरोपींपैकी दोघांनी गाडीची काच फोडून त्यांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाधवर यांनी केला आहे. याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नांदेडमधील व्यावसायिकावर हल्ल्यानंतर मराठवाड्यातील सर्वच व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच औरंगाबादमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.

नांदेड हत्येचा तपास कुठवर?

नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांची तीन दिवसांपूर्वी भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 5 एप्रिल रोजी घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण नांदेड हादरलं असून व्यावसायिकावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी सर्वच स्तरांतील नागरिक एकवटले आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून वेगाने तपासाच्या सूचना दिल्या. संजय बियाणी यांच्या खुनाच्या तपासासाठी पाच विशेष तपास पथक नेमण्यात आले असून आरोपींच्या शोध घेतला जात आहे. इतर जिल्ह्यातही काही तपास पथके धाडण्यात आले आहेत. या खून प्रकरणी दोघे साक्षीदार असून यातील एक बियाणी यांचा वाहन चालक आहे. घटनेच्या वेळी मारेकऱ्यांना पाहून तो स्टेअरिंगखाली लपला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर घराचे गेट उघडायला आलेला दुसरा चालक मारेकऱ्यांनी गोळी झाडल्याने गंभीर जखमी झाला. त्यावर उपचारर सुरु आहेत. याशिवाय काहींनी ही घटना पाहिली असून त्यांची साक्षीदार म्हणून नोंद केली जाणार आहे.

इतर बातम्या-

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात

Urdu language controversy | पैसा बोलता हैं ! जाणून घ्या भारतीय चलना विषयी काही न ऐकलेल्या रंजक गोष्टी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली