AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; नेत्यानं सोडली साथ, उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नेत्यानं भावनिक पत्र लिहित ठाकरे गटाची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; नेत्यानं सोडली साथ, उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र
Uddhav Thackeray
| Updated on: Feb 17, 2025 | 4:50 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा धक्का बसला अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनगरागमन केलं. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला.  महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.  महायुतीमधील प्रमुख तीन पक्ष भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना मिळून तब्बल 232 जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला असा तसा फक्त 50 जागांचाच आकडा गाठता आला. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं चित्र आहे.

याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज पुन्हा एकदा एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख होते. जनावळे हे येत्या वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 

विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जनावळे यांनी राजीनाम्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहीलं आहे, साहेब मला माफ करा असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. पुण्यामधील काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?