AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम शिंदेंचा मोठा निर्णय! जिल्हा बँक निवडणुकीतून घेतली माघार; कारणही सांगितलं, म्हणाले- राजकीय दबाव…

Ahmednagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली आहे.

राम शिंदेंचा मोठा निर्णय! जिल्हा बँक निवडणुकीतून घेतली माघार; कारणही सांगितलं, म्हणाले- राजकीय दबाव...
| Updated on: Oct 05, 2026 | 4:34 PM
Share

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. मात्र आपला निर्णय कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे घेतलेला नसल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेच्या सभापतीपदावर असताना घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता कायम राखणे आवश्यक आहे, अशी भूमिका राम शिंदे यांनी मांडली. याच कारणामुळे आपण जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले. सभापती म्हणून काम करताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा गटाच्या बाजूने झुकल्याचा आभास निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम शिंदे यांच्या माघारीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र या निर्णयामागे कोणताही राजकीय दबाव नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच वैयक्तिक कारणामुळेही आपण निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत-जामखेडमधील दोन संस्थांच्या माध्यमातून आपला ठराव बिनविरोध झाल्याचा दावाही राम शिंदे यांनी केला आहे.

त्यामुळे निवडणुकीतून स्वतः माघार घेतली असली तरी आपल्या समर्थक संस्थांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व कायम राहणार असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. राम शिंदे यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांची होती. त्यामुळे अचानक घेतलेल्या माघारीच्या निर्णयावर कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकीकडे घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपण्यासाठी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची नाराजी, यामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. आता राम शिंदे यांच्या माघारीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे. तसेच पुढे काय घडतं याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच