AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवेंनी अर्ज दाखल करताच भाजपचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. भाजपनं या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

अंबादास दानवेंनी अर्ज दाखल करताच भाजपचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड
ambadas danve Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 3:28 PM
Share

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजप अतिरिक्त उमेदवार देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.  मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात आलेला नाही, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 9 जागांचा कोटा होता, यामध्ये भाजपच्या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येकी एका उमेदवाराने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळेस अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.  जर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली तर आम्ही उमेदवार देणार नाही असं शिवसेना शिंदे गट आणि भाजपने म्हटलं होतं. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजप तसेच शिवसेनेकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. अंबादास दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसचा ही पाठिंबा 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच उमेदवार देण्याचे संकेत देखील दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.  त्यानी अंबादास दानवे यांना आपाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोणताही अतिरिक्त उमेदवार नसल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!