नारायणगावमध्ये आढळला बिबट्याचा बछडा ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नारायणगाव येथील डिंभा डाव्या कालव्यामध्ये सुमारे एक ते दीड महिने वयाचा बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. शिवेवर अंबादास वाजगे यांच्या शेताजवळ बिबट्याचा बछडा आढळून आला आहे.

नारायणगावमध्ये आढळला बिबट्याचा बछडा ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 5:37 PM

नारायणगाव – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव , मंचरसह आता  नारायणगाव येथील डिंभा डाव्या कालव्यामध्ये सुमारे एक ते दीड महिने वयाचा बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. शिवेवर अंबादास उर्फ लक्ष्मण दत्तात्रय वाजगे यांच्या शेताजवळ शेतमजूर देविदास लहानु केदार यांना बिबट्याचा बछडा आढळून आला आहे.

वनविभागाला दिली माहिती

आज सकाळी शेतावर कामाला जात असताना देविदास केदार यांना बिबट्याच्या बछड्याचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी कॅनॉलमध्ये उतरून पाहिले असता त्यांना हा बछडा पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आढळला. याघटनेची माहिती तात्काळ वन विभाग व बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे यांना फोन करून याबाबत माहिती दिली.

वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे व रमेश सोलाट यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या बछड्याला ताब्यात घेऊन येथील वनपाल मनीषा काळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे तसेच वनपाल मनिषा काळे यांनी या बछड्याला सिरींजने पाणीदेखील पाजले. व माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रामध्ये या बछड्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी वाजगे यांच्या उसाच्या शेतामधून दोन बिबट्याचे बछडे खेळत खेळत येथील शेतमजुरांच्या अंगणात आले होते. तसेच काल (दि 28) रोजी एक बिबट्याचा बछडा शंभर मीटर अंतरावर आढळला होता. मात्र या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने हल्ल्या केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याने, नागरिक घाबरत आहेत. इतकंच नव्हे तर वनविभागने पिंजरा लावून मादी बिबट्याला पकडावे अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.

नागपूर हवालाचे गुजरात कनेक्शन, 98 लाखांवर रक्कम जप्त, तपासात लागली ईडी, आयटी

Salman Khan | अभिनेता सलमान खानची अहमदाबादमध्ये गांधीगिरी, ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट

सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीवरील सुनावणीस सुरुवात; बैलगाडा मालकांच्या आशा वाढल्या

Non Stop LIVE Update
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....