LIVE : अटकपूर्व जामिनासाठी शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर..

LIVE : अटकपूर्व जामिनासाठी शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत
Picture

शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत

अटकपूर्व जामिनासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवस्वराज्य यात्रा सोडून मुंबईत दाखल, इंदापुरातील सभेला अनुपस्थिती, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 76 नेत्यांवर काल गुन्हे दाखल

27/08/2019,3:28PM
Picture

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला डेडलाईन

27/08/2019,3:06PM
Picture

31 तारखेला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार : रावसाहेब दानवे

जालना : येत्या 31 तारखेला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालन्यात गौप्यस्फोट, अजित पवारांच्या झेंड्यांचा दांडा आमच्या हातात, भगव्या झेंड्यावरुन दानवेंचा अजित पवारांना टोला, भाजप-शिवसेना विधानसभा निवडणुका एकत्रच लढणार, जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत दानवेंचं वक्तव्य, भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार रांगेत उभे आहेत

27/08/2019,3:06PM
Picture

शिवस्वराज्य यात्रेला अजित पवारांची दांडी

अटकपूर्व जामीनासाठी अजित पवार शिवस्वराज्य यात्रा सोडून मुंबईत दाखल, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 76 नेत्यांवर गुन्हे दाखल, इंदापुरात आयोजित शिवस्वराज्य यात्रेला अजित पवारांची दांडी, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या अडचणीत वाढ

27/08/2019,3:02PM
Picture

पंतप्रधान मोदींकडून जेटलींच्या कुटुंबाचे सांत्वन

पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुण जेटली यांच्या निवासस्थानी दाखल, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर मोदी कुटुंबियांना भेटण्यासाठी जेटलींच्या घरी, मोदींकडून जेटलींच्या कुटुंबाचे सांत्वन

27/08/2019,12:25PM
Picture

शिवसेना नेता रविनीश पांडेवर खंडनीचा गुन्हा दाखल

नागपूर : शिवसेना नेता रविनीश पांडेवर खंडनीचा गुन्हा दाखल, रेती वाहतूक करणाऱ्यांकडून खंडणी मागितल्याचा आरोप, 1 लाखांच्या खंडणी प्रकरणी मौदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

27/08/2019,12:18PM
Picture

12 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात परिसरात पावसाचे पुनरागमन

मनमाड : 12 दिवसाच्या विश्रांतीनंतर शहर परिसरात पावसाचे पुनरागमन, रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु, पावसामुळे मान टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले, पाणी टंचाई दूर होण्यासाठी मात्र जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा

27/08/2019,11:19AM
Picture

पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सराईत घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या, टोळीकडून तब्बल 50 गुन्हे उघडकीस, तब्बल 81 लाखाचा मुद्देमाल जप्त, एक किलो सोन्याचे दागिने, दहा किलो चांदी, एक परदेशी पिस्तूल, सहा जिवंत राऊंड, सहा चारचाकी गाड्या

27/08/2019,11:16AM
Picture

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अॅक्शन थ्रिलर वॉर चित्रपट 2 तारखेला प्रदर्शित होणार, वाणी कपूर, आशुतोष राणाही महत्त्वाच्या भूमिकेत

27/08/2019,11:14AM
Picture

सोलापूर- कंटेनर स्कॉर्पिओच्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

सोलापूर- कंटेनर स्कार्पिओच्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद जवळ अपघात, अपघातातील मृत व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याचे रहिवासी, कंटेनरला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने अपघात

27/08/2019,10:01AM
Picture

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, इंदापूरजवळील बळपुडी गावाजवळ रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अपघात, अपघातात आनंद शिंदे किरकोळ जखमी, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

27/08/2019,9:23AM
Picture

नांदेड: मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांची आत्महत्या

नांदेड: मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांची आत्महत्या, राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले, व्यवसायाने शेतकरी असलेल्या जाधव यांच्यावर मोठे कर्ज झाले होते, संभाजी जाधव हे विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरेंचे समर्थक, मनसेसोबत जाणारे मराठवाड्यातील पहिले शिवसैनिक म्हणून होते परिचित, शेतीच कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्याची कुटुंबाची माहिती

27/08/2019,9:21AM
Picture

पनवेलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला आग

पनवेल : पनवेलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला आग, सकाळी 6 वाजून 20 मिनिटाची घटना, पळस्पे फाटा येथे लागली आग, सुदैवाने जिवीतहानी नाही, पळस्पे मधून गाडी नवीन पनवेलमध्ये जात असताना घडली घटना

27/08/2019,9:13AM
Picture

बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममधून 15 लाखांची रोकड लंपास

 कोल्हापूर : बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममधून 15 लाखांची रोकड लंपास, गोपनीय कोडची माहिती मिळवून पैसे लंपास केल्याची माहिती, बँकेची पोलिसात धाव, कोड मिळवण्यासाठी छुप्या स्कॅनर चा वापर झाल्याचा संशय शहरातील अन्य एटीएम मधून ही पैसे लंपास झाल्याची शक्यता, एटीएम सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह, गोपनीय कोड हॅक होतं असल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ

27/08/2019,9:10AM
Picture

मुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंवर टीका

बीड: आगामी काळात विरोधी पक्ष नेता होण्याऐवढे सुध्दा आमदार निवडून येणार नाहीत मुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंवर टीका

27/08/2019,9:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *