AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक, आगीत तीन घरं जळून खाक

नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक (LPG cylinder Gas Leaked) झाल्याने शेजारी असलेली तीन घरे जळून खाक झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात ही भयानक घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सकाळी 6 च्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली.

नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक, आगीत तीन घरं जळून खाक
Nagpur Fire
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 1:31 PM
Share

नागपूर : नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक (LPG cylinder Gas Leaked) झाल्याने शेजारी असलेली तीन घरे जळून खाक झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात ही भयानक घटना आज सकाळच्या सुमारास घडली (LPG cylinder Gas Leaked Fire Destroyed Three Houses In Nagpur).

काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावात सकाळी 6 च्या सुमारास राधाबाई टूले यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली. पाहता पाहता ही आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली.

या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दुर्दैवाने विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे आणि खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजार रुपये देखील या आगीत जळून खाक झाले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार या आगीत तब्बल 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. मृतकांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश होता. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

LPG Cylinder Gas Leaked Fire Destroyed Three Houses In Nagpur

संबंधित बातम्या :

इराकमध्ये हाहा:कार ! ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट, 82 जणांचा होरपळून मृत्यू, 100 पेक्षा जास्त जखमी

डोंबिवलीत कामगार वसाहतीत सिलेंडर स्फोट; भीषण आगीत एका कामगाराचा मृत्यू, दुसरा गंभीर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.