AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु, पहिली यादी कधी जाहीर होणार? तारीख समोर

२०२५-२६ पासून महाराष्ट्रात ११वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे होत आहेत. १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ९४३५ कनिष्ठ महाविद्यालये/उच्च माध्यमिक शाळा नोंदणीकृत आहेत. ८ जून रोजी शून्य फेरी आणि १० जून रोजी कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल. अधिक माहितीसाठी mahafyjcadmissions.in ला भेट द्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु, पहिली यादी कधी जाहीर होणार? तारीख समोर
admission
| Updated on: Jun 05, 2025 | 7:43 PM
Share

राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत आज अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती प्र.संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली.

या प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये 9,435 नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता 21,23,040 इतकी असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता 18,97,526 तर कोटा प्रवेश क्षमता 2,25,514 इतकी आहे. यासाठी दिनांक 26 मे ते 5 जून 2025 या कालावधीत https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करण्यात आली.

किती विद्यार्थ्यांनी केले अर्ज?

यामध्ये 1215190 विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाईन जमा केलेले आहे. 12,05,162 विद्यार्थ्यानी अर्ज भाग-1 भरलेले आहेत. तर, अर्ज भाग-2 भरुन अंतिम करुन 11,29,924 विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत. नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी 11,29,932 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. इनहाऊस कोटा साठी 64,238 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी 32,721 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोटासाठी 47,578 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

8 जूनला पहिली यादी प्रसिद्ध होणार

वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 9 जून ते 11 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 11 जून ते 18 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ- https://mahafyjcadmissions.in पाहावे. तसेच ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन नंबर 8530955564 वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....