AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC HSC Result 2026 Updates : इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ? निकालाबाबतची मोठी अपडेट समोर, पटापट चेक करा

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या 2026 परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. वर्षभराच्या अभ्यासानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12वीचा निकाल एप्रिल महिन्याच्या अखेरीस, तर 10वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. अधिकृत तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

SSC HSC Result 2026 Updates : इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ? निकालाबाबतची मोठी अपडेट समोर, पटापट चेक करा
10 वी आणि 12 वीचा निकालImage Credit source: social media
| Updated on: Apr 17, 2026 | 8:07 AM
Share

शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या 10 वीच्या आणि 12 वीच्या परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थी एकदम रिलॅक्स होतात. वर्षभर मान मोडून अभ्यास केल्यानंतर परीक्षा संपली की मिळालेली सुट्टी ही म्हणजे आनंदाचा ठेवचा असते. पण सुट्टी लागली तर मनात एकीकडे निकालाचा विचार सुरू असतोच. त्यावरच पुढचं भवितव्य ठरलेलं असतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा संपून काही वेळ उलटतो न उलटतो तोच आता निकालाची उत्सुकता असून त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार याबद्दल विद्यार्थी आणि पालक खूप उत्सुक आहेत. त्याबद्दलच आता मोठी अपडेट समोर आली आहे.

कधी लागणार निकाल ?

10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात 12 वीची तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा पार पडली. दोन्ही परीक्षा संपून महिन्याभराचा कालावधी उलटला असून आता परीक्षांचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी व त्यांच्या पालकांना खूप उत्सुकता आहे. त्याबद्दलच महत्वाची माहिती समोर आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, याच महिन्याच्या अखेरीस इयत्ता 12 वीचा निकाल लागू शकतो. तर मे महिना सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच इयत्ता 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  सध्या गुणसंकलन आणि रिपोर्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, 12 वी प्रमाणेच 10 वीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची देखील तपासणी अतिशय वेगाने सुरू असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पेपर तपासून झाले आहेत असे समोर आले आहे. पेपर तपासणीचे उर्वरित काम पुढील काही दिवसांत पूर्ण होणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10 निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना हा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार असून लवकरच निकालाची अधिकृत तारीख घोषित केली जाऊ शकते.

कुठे चेक करता येईल निकाल ? 

खालील लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल चेक करता येऊ शकतात :

https://mahresult.nic.in

https://hscresult.mkcl.org

https://hscresult.mahahsscboard.in

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...