AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर, कोणता विभाग अव्वल, कोणता मागे?

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून ९७.६२ टक्क्यांसह कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर, कोणता विभाग अव्वल, कोणता मागे?
SSC
| Updated on: May 08, 2026 | 12:13 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दहावीच्या निकालात किंचित घट झाली आहे.

विभागावार निकाल किती?

राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या निकालाच्या शर्यतीत कोकण विभाग अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे. कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे विभागाने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मात्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी लागला आहे.

क्र. विभागीय मंडळाचे नाव निकालाची टक्केवारी
१ कोकण ९७.६२%
२ कोल्हापूर ९५.४७%
३ मुंबई ९४.९७%
४ पुणे ९४.२४%
५ नाशिक ९०.९३%
६ अमरावती ९०.५०%
७ नागपूर ८९.०७%
८ लातूर ८८.४२%
९ छत्रपती संभाजीनगर ८८.४१%
राज्याचा एकूण निकाल ९२.०९%

मुलींचीच बाजी

दरम्यान दहावीच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के असून मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे.  सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

परीक्षेत नापास झालेल्यांना ११ वीत प्रवेश घेता येणार 

दरम्यान पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी वेळ मिळावा म्हणून यंदा १० दिवस आधी परीक्षा घेण्यात आली, ज्याचा सकारात्मक परिणाम निकालावर दिसून आला. यंदापासून मार्कशीट आणि सर्टिफिकेट स्वतंत्र न छापता एकाच पेपरवर दोन्ही माहिती दिली जाणार आहे. क्रीडा, कला आणि स्काऊट गाईडमधील विशेष प्राविण्यासाठी विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात आले आहेत. तसेच दोन विषयात नापास झालेल्या ४१,०६५ विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा देण्यात आली असून त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येईल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?