Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 LIVE : धाकधूक वाढली, आज लागणार इयत्ता 10 वीचा निकाल
Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 LIVE Updated in Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीचा निकाल आज लागणार आहे. यंदा किती टक्के निकाल लागतो, मुलं बाजी मारतात की मुली, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली 10 वीची परीक्षा ?
फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी यंदा 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणा केली. त्यापैकी 8 लाख 65 हजार 740 मुलं, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर होती. एकूण 23 हजार 683 शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. संपूर्ण राज्यात या परीक्षेसाठी 5 हजार 111 मुख्य केंद्र होती.
-
Maharashtra Board 10th (SSC) Result 2026 : आज दहावीचा निकाल, इथे पहा तुमचा रिझल्ट, या वेबसाईट्स लगेच करा नोट
महत्त्वाची बातमी! आज दहावीचा निकाल, इथे पहा तुमचा रिझल्ट, या वेबसाईट्स लगेच करा नोट
-
-
10 वीच्या विद्यार्थ्यांना Digital गुणपत्रिका करता येणार सेव्ह
10 वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. तसेच या माहितीची प्रिंट आऊटही घेता येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना DigiLocker App मध्ये Digital गुणपत्रिका सेव्ह करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
-
Maharashtra Board 10th Result 2026 : कुठे पाहता येणार निकाल ?
10 वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या पोर्टल्सवर निकाल पाहू शकतील याची महाराष्ट्र बोर्डाने पुष्टी केली आहे.
-
Maharashtra Board 10th Result 2026 : इयत्ता 10 वी रिझल्ट, 9 विभागांत कोण मारणार बाजी ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षा घेण्यात आली होती. आज कोणता विभाग ठरणार अव्वल, कोणाचा निकाल लागणार सर्वाधिक ?
थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल.
-
-
Maharashtra Board 10th Result 2026 : महाराष्ट्रात दहावीचा आज निकाल, गेल्या वर्षी कधी लागला होता निकाल ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येईल. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
-
Maharashtra Board 10th Result 2026 : दुपारी उपलब्ध होणार इयत्ता 10 वीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल हा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज ( 8 मे) दुपारी उपलब्ध होणार आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आजच्या निकालाकडे लागलं आहे.
-
-
Maharashtra Board 10th Result 2026 : 10 वीचा निकाल आज, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निकालाचे वाचन होईल. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालाची वेळ जवळ येताच विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. तेव्हापासूनच 10 वीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली. अखेर आज इयत्ता 10 वीचा निकाल लागणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वीची परीक्षा घेतली होती. लाखो विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते, त्यांचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून त्यामध्ये विभागनिहाय निकाल जाहीर होणार आहे. तसेच संपूर्ण निकालाची टक्केवारी, किती मुली, किती मुलं उत्तीर्ण झाली तेही सांगण्यात येईल. 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन तसेच इतर माध्यमांद्वारे सहज पाहू शकतील.
तसेच www.tv9marathi.com वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. यासोबतच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात.10 वीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स, तुम्हाला इथे tv9 लाईव्ह ब्लॉगवरही जाणून घेता येतील. निकालाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - May 08,2026 6:57 AM
