AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावीत नापास झालेल्यांना अकरावीत घेता येणार प्रवेश, पर्याय काय?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५ च्या दहावीच्या निकालाची घोषणा केली आहे. एटीकेटी असलेले विद्यार्थी ११वी मध्ये प्रवेश घेऊ शकतात परंतु १२वीसाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

दहावीत नापास झालेल्यांना अकरावीत घेता येणार प्रवेश, पर्याय काय?
students
Follow us
| Updated on: May 13, 2025 | 12:58 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.१४ टक्के इतका लागला आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ टक्के इतकी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणकोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबद्दलची माहिती दिली आहे.

दहावीतील बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेनुसार अकरावीत प्रवेश करता येणार आहे. बोर्डाने याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाने श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरु केली आहे. या परीक्षेत सर्व विषयात पास झालेला विद्यार्थी यानंतरच्या तीन परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पास झालेला विद्यार्थी हा जून जुलै २०२५ परीक्षा, फेब्रुवारी मार्च २०२६ आणि जून जुलै २०२६ च्या परीक्षेला श्रेणी सुधारतंर्गत या तिन्ही परीक्षेसाठी किंवा तिन्हीपैकी एका परीक्षेसाठी तो पुन्हा प्रविष्ठ होऊ शकतो, असे शरद गोसावी यांनी म्हटले.

दहावी नापास झालेला विद्यार्थी अकरावीला कसा घेईल प्रवेश?

तसेच दहावीसाठी ATKT लागू केली आहे. जर एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी त्याला 11 वीमध्ये प्रवेश दिला जातो. याला allowed to keep terms म्हणजेच ATKT दिली जाते. यानुसार तो विद्यार्थी अकरावीत अॅडमिशन घेऊ शकतो. मात्र बारावीत प्रवेश घेण्यापूर्वी त्याला दहावी उत्तीर्ण होणे गरजेचे असेल. हा विद्यार्थी जून-जुलैची २०२५ किंवा फेब्रुवारी मार्च २०२६ ची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला आणि अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तो बारावी परीक्षेला प्रवेश घेण्यास पात्र ठरु शकतो, असेही शरद गोसावींनी म्हटले.

दहावीच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

  • परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी: १५ लाख ४६ हजार ५७९
  • उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी: १४ लाख ५५ हजार ४७७
  • नियमित विद्यार्थ्यांचा निकाल: ९४.१०%
  • दिव्यांग विद्यार्थी नोंदणी: ९ हजार ६७३
  • परीक्षेला बसलेले दिव्यांग विद्यार्थी: ९ हजार ५८५
  • उत्तीर्ण झालेले दिव्यांग विद्यार्थी: ८ हजार ८४८
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल: ९२.२७%
  • एकूण नोंदणी (सर्व विभाग): १६ लाख १० हजार ९०८
  • परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी (सर्व विभाग): १५ लाख ९८ हजार ५५३
  • उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी (सर्व विभाग): १४ लाख ८७ हजार ३९९
  • सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल: ९३.०४%
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.