Maharashtra Marathi Breaking News Live : द अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून हवामान ॲप

| Updated on: Feb 02, 2024 | 7:13 AM

Maharashtra Breaking News in Marathi: आज 24 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : द अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून हवामान ॲप

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Jan 2024 08:19 PM (IST)

    App च्या मदतीने कोणत्याही गावातील शहर आणि देशाचे हवामान तपासता येणार

    मुंबई | राज्यात सतत हवामानात बदल होत असतो. या हवामान बदलामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र त्यानंतरही त्यात अपेक्षित असे बदल दिसून येत नाही. अशात आता पुण्यातील द अकॅडमी स्कूलच्या 13 वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ याने हवामानाचा अंदाज घेणारा ॲप तयार केला आहे. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना कोणत्याही गाव, शहर किंवा देशाच्या हवामानाचा अंदाज घेण्यास मदत होईल.

  • 24 Jan 2024 08:14 PM (IST)

    शिवाजी नगर ते सांगवी फाटा या दरम्यान 10 ते 12 किलोमीटर वाहनांच्या रांगा

    पिंपरी चिंचवड | मनोज जरांगे पाटील अद्याप ही शिवाजी नगर (पाटील इस्टेट) येथे जरांगे यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी नगर ते सांगवी फाटा या दरम्यान वाहनांच्या 10 ते 12 किलोमीटर रांगा लागल्या आहेत. तसेच पुण्यात वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 24 Jan 2024 07:52 PM (IST)

    ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल पक्षकारांना देण्याचे निर्देश

    ज्ञानवापी सर्वेक्षणाशी संबंधित अहवाल पक्षकारांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सध्या त्याची प्रत सार्वजनिक केली जाणार नाही. अर्ज केल्यानंतर सर्वेक्षण अहवालाची छायाप्रत पक्षकारांना दिली जाईल. यास एक आठवडा लागू शकतो.

  • 24 Jan 2024 07:35 PM (IST)

    मंत्रिमंडळातील एकही सदस्य अयोध्येला जाणार नाही: अनुराग ठाकूर

    पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळातील एकही सदस्य अयोध्येला जाणार नाही. सध्या तिथे फक्त भाविक जात आहेत. त्यांनी भाविकांना उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या व्यवस्थेनुसार सर्व तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

  • 24 Jan 2024 07:18 PM (IST)

    कॅबिनेट मंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत अयोध्येला जाऊ नये, पंतप्रधान मोदींचं आवाहन

    सामान्य भाविकांना प्रोटोकॉलमुळे दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्र्यांना गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

  • 24 Jan 2024 07:06 PM (IST)

    मंत्रिमंडळातील प्राण प्रतिष्ठेच्या आभार प्रदर्शनावर पंतप्रधान मोदी झाले भावूक

    केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात अयोध्येतील राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात पंतप्रधान मोदींचे आभारप्रदर्शन वाचण्यात आले. यावेळी पीएम मोदी खूप भावूक झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळ खूप भावूक दिसले.

  • 24 Jan 2024 06:50 PM (IST)

    गोरेगाव येथील अनमोल टॉवरला आग लागली

    गोरेगाव : महेश नगर येथील अनमोल टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची पातळी 2 असल्याचे सांगितले जाते. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टॉवरच्या वरच्या मजल्यावर आग लागली आहे. या घटनेत अद्याप कोणी जखमी किंवा अडकल्याची कोणतीही माहिती नाही.

  • 24 Jan 2024 06:40 PM (IST)

    विदर्भातील 7 जिल्ह्यात युवा अधिकार मंच काढणार ओबीसी जनगणना यात्रा

    नागपूर : मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर आता ओबीसी युवा अधिकार मंच विदर्भात ओबीसी जनगणना यात्रा काढणार आहे. विदर्भातील 7 जिल्ह्यात ही यात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे. बिहारप्रमाणे ओबीसीची जनगणना करण्यात यावी अशी मागणी जनजागृती यात्रेमधून करण्यात येणार आहे. 3 फेब्रुवारीला सेवाग्राममधून यात्रेची सुरवात होणार आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे.

  • 24 Jan 2024 06:32 PM (IST)

    दिल्लीच्या बाहुल्यांनी शिवसेना आणि वाघाविषयी बोलू नये, अंबादास दानवे यांची टीका

    मुंबई : भारतीय जनता पार्टीत जे लोक जातात त्यांना पावन समजले जाते. पण, जे लोक पक्षात जाण्यास इच्छुक नाहीत त्यांच्यापाठी ईडी चौकशी लावली जाते. जे दिल्लीचे बाहुले बनलेले आहेत त्यांनी शिवसेनेवर आणि वाघाविषयी बोलू नये. हे पिंजऱ्यातले प्राणी झालेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना उपदेश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

  • 24 Jan 2024 06:18 PM (IST)

    ओबीसीच्या महायल्गार मेळाव्याला प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती

    धाराशिव : ओबीसी आरक्षण महायल्गार मेळाव्याला सुरुवात झाली आहे, ओबीसी आरक्षनावरचे अतिक्रमण त्वरित थांबवा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी ही प्रमुख मागणी महायल्गार मेळाव्यातून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  • 24 Jan 2024 06:15 PM (IST)

    ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

    नाशिक : ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने आज हा निकाल दिला. पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा बडगुजर आणि इतर दोघांवर आरोप आहे.

  • 24 Jan 2024 06:05 PM (IST)

    अजित पवार गटाकडून हकालपट्टी, हा नेता भाजपच्या वाटेवर?

    कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून ए वाय पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नव्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील असुरलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्याशी घेतलेलं वैर ए वाय पाटील यांना भोवलं आहे. बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर ए वाय पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

  • 24 Jan 2024 05:55 PM (IST)

    सांगलीमध्ये बेदाण्याला मिळाला सर्वाधिक दर

    सांगलीमध्ये नवीन वर्षातल्या बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला आहे आज पार पडलेल्या मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 160 रुपये इतका उच्चांकी दर बेदाण्याला मिळाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाणा सौदयाचा शुभारंभ पार पडला.या सौदयात व्यापाऱ्यांच्या उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक 160 रुपये इतका दर चांगल्या बेदाण्याला मिळाला आहे.

  • 24 Jan 2024 05:41 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल

    मनोज जरांगे आंदोलकांसह पुण्यात दाखल झाले आहेत. आंदोलकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

  • 24 Jan 2024 05:30 PM (IST)

    मराठा आरक्षणाचा मुद्दा तिघडी सरकारने चुकीच्या पद्धतीने हातळला- विजय वडेट्टीवार

    मराठा आरक्षणाचा मुद्दा तिघडी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने चिघळले आहे. वेळ काढू पणा केला. आता दहा दिवसात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतात हे चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

  • 24 Jan 2024 05:15 PM (IST)

    रामराज्य आणायचे असेल तर अहंकारी वृत्ती सोडली पाहिजे- विजय वडेट्टीवार

    राष्ट्रपती मुर्मु यांना आमंत्रित न करण्यामागे यांची अहंकारी वृत्ती दिसून येत आहे. राम समजायचा असेल, रामराज्य आणायचे असेल तर अहंकारी वृत्ती सोडली पाहिजे. जो अहंकार ठासून भरला आहे तो सोडला पाहिजे, आता यांच्या कडून भलतेच वेश परिधान करण्याचे सुरू आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

  • 24 Jan 2024 04:50 PM (IST)

    सांगलीत मराठा सर्वेक्षणासाठी पाच हजार प्रगणकांची नियुक्ती

    मराठा सर्वेक्षणासाठी पाच हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात ९२ लाख अभिलेखांची तपासणी झाली असून ३८ हजार ४६८ मराठा नोंदी आढळल्या आहेत.

  • 24 Jan 2024 04:34 PM (IST)

    विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन

    विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगावला स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरत आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारने मागणी मान्य करावी म्हणत रस्ता रोको आंदोलन केले. माजी आमदार आणि जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष वामनराव चटक यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. काटोल जिल्हा तात्काळ निर्माण करा. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी विदर्भवाद्यांनी केली. बराच वेळ रस्ता अडून धरल्याने आंदोलन उठत नसल्याने अखेर पोलिसांनी विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं.

  • 24 Jan 2024 04:06 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक सुरु आहे. महाराष्ट्रातील विमानतळ, विदर्भात नदीजोड/पोर्ट संदर्भात सादरीकरण आणि जलयुक्त शिवार अभियान संदर्भात आढावा बैठक सुरू आहे. संबंधित अधिकारी व पक्षातील काही नेते बैठकीत उपस्थित आहेत.

  • 24 Jan 2024 04:02 PM (IST)

    पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुणे शहरातील मोर्चाचा मार्ग बदलला

    पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुणे शहरातील मोर्चाचा मार्ग बदलला आहे. जहांगीर हॉस्पिटलच्या बाजूने न जाता मोर्चा सादल बाबा चौकातून पुढे मार्गस्थ होणार आहे. सादल बाबा चौक, संगमवाडी संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, विद्यापीठ चौकातून मोर्चा, औंध कडे जाणार आहे.

  • 24 Jan 2024 02:59 PM (IST)

    बच्चू कडू यांनी माती कालवू नये - प्रकाश शेंडगे

    बच्चू कडू यांना ओबीसी समाजाने पण मतदान केले आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजात आणण्याचे काम करु नये. बच्चू कडू यांनी ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये, अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. यापुढे आमदार कडू यांनी ओबीसी मताची अपेक्षा करु नये, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

  • 24 Jan 2024 02:50 PM (IST)

    मोर्चाचा मार्ग बदलण्याची शक्यता

    मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा शहरातील मार्ग बद्दलण्याची शक्यता आहे. शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे पोलिसांकडून जरांगे पाटील यांना मार्ग बदलण्याची विनंती करण्यात आली आहे. जहांगीर हॉस्पिटल कडून न जाता सादर बाबा चौकातून लोणावळ्याकडे मार्गस्थ होण्याची पुणे पोलिसांनी जरांगेंना विनंती केली आहे.

  • 24 Jan 2024 02:36 PM (IST)

    लहान मुलांची सूटका

    सोलापुरातील गड्डा यात्रेतील एक व्हिडिओ मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये चिमुकल्यांच्या अंगाला केमिकलयुक्त रंग लावून त्यांना भीक मागण्यासाठी गर्दीत उभं करण्यात आल्याचे दिसतंय. सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर सोलापुरातील बाल संरक्षण विभागाने याची दखल घेतलीय.बाल संरक्षण अधिकारी, पोलीस विभाग, सामाजिक संस्था या सर्वांच्या उपस्थितीत विविध पथक तयार करून गड्डा यात्रेत रेस्क्यू मोहीम राबविण्यात आली.तेव्हा व्हिडीओत दिसणारे लहान मुले यात्रेत आढळून आले नाहीत मात्र यात्रेत 9 लहान मुलं आढळून आली.

  • 24 Jan 2024 02:20 PM (IST)

    सरकार पुन्हा जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणार

    सरकारी अधिकारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. पुण्यात हा मोर्चा येऊन धडकला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

  • 24 Jan 2024 02:10 PM (IST)

    राम मंदिराच्या दर्शनाबाबत भाजपाचा मेगा प्लॅन

    भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार

    31 जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

    1 फेब्रुवारी उत्तराखंड मुख्यमंत्री आणि मंत्री जाणार

    5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दर्शनाला जाणार

    6 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

    9 फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

    12 जानेवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

    15 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री दर्शनाला जाणार

    22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री आणि 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री दर्शनाला जाणार

    4 मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

  • 24 Jan 2024 02:00 PM (IST)

    राज्य मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला

    राज्य मंत्री मंडळ ५ फेब्रवारी रोजी अयोध्येत श्री राम मंदिरात दर्शनाला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री मंडळ श्री रामाचे दर्शन घेणार आहे.

  • 24 Jan 2024 01:59 PM (IST)

    बाळासाहेब थोरात यांचे मोठे विधान

    इंडिया आघाडी ही देशपातळीवरील आघाडी आहे. देश पातळीवरचं हे सगळं आहे त्यात केंद्रीय नेतृत्व आमचं लक्ष घालत. ममताजींची काही बातमी आली असेल पण मला वाटत नाही, आम्ही सगळे बोलून एकत्र करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

  • 24 Jan 2024 01:53 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

    शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ संविधानाची प्रतिकात्मक पुस्तक मध्यभागी ठेवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मागच्या 4 ते 5 तासापासून तीव्र आंदोलन सुरू आहे.

  • 24 Jan 2024 01:39 PM (IST)

    प्रकाश शेंडगे यांनी केले मोठे विधान

    मराठा आरक्षण आंदोलन 26 पासुन मुंबईत होत आहे, त्यांनी इशारा दिला आहे. ओबीसीला सरकारने शब्द दिला होता लेखी दिले की ओबीसी आरक्षणला धक्का लागणार नाही, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

  • 24 Jan 2024 01:25 PM (IST)

    गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

    दगडाने ठेचून 38 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आलीये. गोंदिया शहर पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक. हत्या झालेल्या युवकाची ओळख अद्याप पटली शकली नाहीये.

  • 24 Jan 2024 12:32 PM (IST)

    Live Update : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता 10 मिनिटं वाढीव मिळणार

    दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता 10 मिनिटं वाढीव मिळणार... विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटं आधीच प्रश्नपत्रिका वाटप केल्या जाणार... शिवाय परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निर्णय... महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

  • 24 Jan 2024 12:24 PM (IST)

    Live Update : इंडिया आघाडीत मोठी फुट, ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडली

    इंडिया आघाडीत मोठी फुट... ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडली... लोकसभा निवडणुकीत कोणाशीही युती करणार नाही... ममता बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण... लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट... पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार... काँग्रेसने आमचा कुठलाही प्रस्ताव मान्य केला नाही .... भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण आम्हाला दिले नाही... ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसवर मोठा आरोप

  • 24 Jan 2024 11:50 AM (IST)

    दाट धुकं आणि प्रतिकूल हवामानामुळे दिल्ली विमानतळावर विमानांच्या उड्डाणात व्यत्यत

    दाट धुकं आणि प्रतिकूल हवामानामुळे दिल्ली विमानतळावर विमानांच्या उड्डाणात व्यत्यत येत आहे. त्यामुळे 22 आंतरराष्ट्रीय विमानांचं निर्गमन, 20 आंतरराष्ट्रीय विमानांचं आगमन, 31 देशांतर्गत विमानांचं आगमन आणि 46 देशांतर्गत विमानांचं निर्गमन खोळंबलं आहे. दिल्ली विमानतळाच्या FIDS ने (फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टम) ही माहिती दिली आहे.

  • 24 Jan 2024 11:40 AM (IST)

    आम्ही काही चूक केली नाही तर चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही- सुप्रिया सुळे

    आम्ही काही चूक केली नाही तर चौकशीच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

  • 24 Jan 2024 11:30 AM (IST)

    पुण्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात

    पुणे- मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला कालपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातदेखील आजपासून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात एकूण 1000 प्रगणक सर्वेक्षण करणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक निकष लावत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. एकूण 184 प्रश्नांची उत्तरं मिळवत हे सर्वेक्षण होणार आहे.

    पुण्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज 150 घरांचं सर्वेक्षण करण्याचं टार्गेट देण्यात आलं आहे. तर जिल्ह्यात एकूण 6 हजार 596 कर्मचारी घरोघरी जात आरक्षणासाठी सर्वेक्षण करणार आहेत.

  • 24 Jan 2024 11:20 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज लोणावळ्यात मुक्काम

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आज लोणावळ्यात मुक्काम असेल. हा पायी मोर्चा खराडीमधून लोणावळ्यात दाखल होणार आहे. ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असल्याचं वक्तव्य जरांगेंनी केलं आहे.

  • 24 Jan 2024 11:10 AM (IST)

    मविआची उद्या मुंबईत बैठक

    मविआची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत उद्या या बैठकीत चर्चा होणार आहे. वंचितला उद्याच्या मविआच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.

  • 24 Jan 2024 10:49 AM (IST)

    सत्याचा विजय होईल - सुप्रिया सुळे

    आमच्यासाठी हा संघर्षाचा काळ आहे. रोहित पवार यांच्यावर सूडभावनेने कारवाई केली जात आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या आव्हानांना आम्ही सत्याच्या मार्गाने सामोर जाणार असेही त्या म्हणाल्या.

  • 24 Jan 2024 10:46 AM (IST)

    विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केलं जातंय - अनिल देशमुख

    विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केलं जातंय. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.

  • 24 Jan 2024 10:39 AM (IST)

    रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

    रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत रोहित पवारांना पाठिंबा दर्शवला.

  • 24 Jan 2024 10:31 AM (IST)

    राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात व्यक्त केला रोष

    मुंबईत राष्ट्रवादी तर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सरकार आणि केंद्र सरकार विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच राष्ट्रवादी भवन समोर आसूड ओढत ईडीचा निषेधही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

  • 24 Jan 2024 10:08 AM (IST)

    ईडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची शाखा - संजय राऊत

    ईडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची शाखा आहे. संपूर्ण मविआ रोहित पवारांच्या पाठिशी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 24 Jan 2024 10:05 AM (IST)

    आम्ही सामान्य व्यक्तींच्या वतीने एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवत आहोत

    आम्ही सामान्य व्यक्तींच्या वतीने एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवत आहोत. कदाचित त्यामुळेच ही कारवाई असावी असं लोकांचं मत आहे, असं  रोहित पवार म्हणाले.

  • 24 Jan 2024 10:04 AM (IST)

    चौकशीला सहकार्य करणार, सर्व माहिती देणार - रोहित पवार

    चौकशीला सहकार्य करणार, सर्व माहिती देणार असं रोहित पवार म्हणाले.  ईडी अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व माहिती, कागदपत्रं आम्ही दिलेली आहेत. या मागे काय विचार, कुठली शक्ती हे आजतरी सांगता येणार नाही, अस त्यांनी नमूद केल.

  • 24 Jan 2024 09:55 AM (IST)

    ईडीच्या अधिकाऱ्याना मी चौकशीसाठी सहकार्य करणार- रोहित पवार

    रोहित पवार थोड्याच वेळात ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार आहेत. चौकशीमध्ये आपण अधिकाऱ्याना पूर्ण सहकार्य करणार असं त्यांनी सांगितलं.

  • 24 Jan 2024 09:52 AM (IST)

    शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल

    रोहित पवार यांच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे आहेत. रोहित पवार थोड्याच वेळात इडी चौकशीसाठी जाणार आहेत. त्याआधी ते शरद पवार आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

  • 24 Jan 2024 09:37 AM (IST)

    इडी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

    थोड्याच वेळात रोहित पवार इडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. त्याआधी इडी कार्यालयाच्या परिसरात संघर्ष योद्धा असं संबोधत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे.

  • 24 Jan 2024 09:31 AM (IST)

    शरद पवार सिल्वर ओक बंगल्यावरून राष्ट्रवादी कार्यालयाकडे रवाना

    रोहित पवार आज इडी चौकशीसाठी हजर राहाणार आहेत. त्या वेळी शरद पवार इडी कार्यालयाजवळत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात असणार आहे. त्यासाठी ते आपल्या निवासस्थानावरून रवाना झाले आहेत.

  • 24 Jan 2024 09:28 AM (IST)

    रोहित पवार थोड्याच वेळात इडी कार्यालयात जाणार

    रोहित पवार थोड्याच वेळात इडी कार्यालयात जाणार आहेत. इडी चौकशीला जाण्याआधी ते शरद पवार आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

  • 24 Jan 2024 09:11 AM (IST)

    Nagpur : नागपूरात अंगणवाडी सेवीकांचा रास्तारोको

    महागाई भत्ता आणि विविध मागणण्यासाठी नागपूरात अंगणवाडी सेवीकांनी नागपूरात रास्ता रोको करण्यात आला मात्र, पोलिसांनी लगेच धरपकड करत हा प्रयत्न हाणून पाडला.

  • 24 Jan 2024 08:59 AM (IST)

    Maharashtra news | अजित पवार गटाचा रोहित पवारांना सवाल

    ईडी चौकशीला जायचे असेल तर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाण्याची गरज काय? अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची टीका. रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार. राज्यात राजकीय नेत्यांसोबतच अनेक उद्योगपती, व्यापाऱ्यांना ईडीच्या नोटीसा आलेल्या आहेत. जर आपण काही केलेले नसेल तर मग त्याचा पॉलिटिकल इव्हेट करून कोणावर तरी खापर फोडायची गरज काय? असा सवाल अजित पवार गटाने विचारला.

  • 24 Jan 2024 08:52 AM (IST)

    Maharashtra news | सोलापूर शास्त्रीनगर दगडफेक प्रकरण

    सोलापुरातील शास्त्रीनगर दगडफेक प्रकरणी 6 जणांना केली अटक. सोमवारी शास्त्रीनगर येथे बाईक रॅलीवर झाली होती दगडफेक. शास्त्रीनगरातून रॅली पुढे जाताना रॅलीसमोर 20 ते 25 जण आले आणि रॅलीतील कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. दगडफेक. मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत सात जण झाले होते जखमी. तसेच गाड्यांची झाली होती तोडफोड.

  • 24 Jan 2024 08:31 AM (IST)

    Maharashtra news | राष्ट्रवादी भवनासमोर मोठ्या संख्येने जमले कार्यकर्ते

    रोहित पवार यांच्या समर्थनासाठी कर्जत जामखेड मतदार संघातून अनेक सर्वसामन्य कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनासमोर जमले आहेत. डोक्यावर टोपी, गावठी पोशाख, घालून सरकार हमसे डर ती है ईडी को आगे करती है अशा घोषणा ही दिल्या जात आहेत. रोहित पवार 11 च्या सुमारास ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात येऊन थांबणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्या मध्ये मोठा उत्साह आहे.

  • 24 Jan 2024 08:12 AM (IST)

    National news | काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अमित शाहंना लिहिल पत्र

    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र. काल आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट. पोलिसांकडून दडपशाही केली जात आहे, खरगे यांचा आरोप. भारत जोडो न्याय यात्रेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या जाव्या. खरगे यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

  • 24 Jan 2024 07:58 AM (IST)

    पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

    पोलीस कोठडीत ब्लँकेटच्या साह्यानं गळफास घेत आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हुकडेश्वर पोलिस स्टेशनमधील ही घटना आहे. थंडीच्या बचावासाठी दिलेल्या ब्लँकेटची चिरोटी फाडली आहे. लोखंडी सळाखिला लटकून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दिसताच रुग्णालयात दाखल केले आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात हा आरोपी अटके होता.

  • 24 Jan 2024 07:55 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात नव्या मतदारांची संख्या वाढली

    पुणे जिल्ह्यात नव्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल एक लाख 75 हजार नव्या मतदारांची भर पडली आहे.  जिल्ह्यातील एकूण 21 मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या वाढली. पुणे जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा मतदार संघ ठरला आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट सर्वात लहान मतदार संघ आहे. काल पुणे जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • 24 Jan 2024 07:53 AM (IST)

    अयोध्येसाठी पुण्यातून आता विशेष रेल्वे गाड्या सुटणार

    अयोध्येसाठी पुण्यातून आता विशेष रेल्वे गाड्या सुटणार आहेत.  पुण्याहून अयोध्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे विभागातून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 30 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान 15 रेल्वे सोडण्यात येणार आहेत.  एका महिन्यात विशेष रेल्वेच्या अयोध्येसाठी 30 फेऱ्या असणार आहेत.

  • 24 Jan 2024 07:51 AM (IST)

    नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारीला गोव्याच्या दौऱ्यावर

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा फेब्रुवारीला गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.  बेतुल इथल्या इंडिया एनर्जी विक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.  अनेक सरकारी प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी समारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे.  पंतप्रधान मोदींचा एक दिवसाचा गोवा दौरा असणार आहे.

  • 24 Jan 2024 07:46 AM (IST)

    जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा पाचवा दिवस

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचा कालपासून खराडी बायपास येथे मुक्कामी आहे.  आज सकाळी नऊ वाजता मनोज जरंगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. पुणे शहरातील मुख्य रस्त्यावरून पिंपरी चिंचवड मार्गे मनोज जरांगे लोणावळ्याला जाणार आहेत.  लोणावळा गावात आज मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे. सलग पाचव्या दिवशीही सरकारकडून मनोज सरंगे यांच्या मोर्चावर तोडगा नाही. त्यामुळे जरांगे यांच्यासह आंदोलकांचा आक्रमक पवित्रा दिसतोय.

मुंबई | 24 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचा आज खराडी बायपास इथं मुक्कामी आहे. सकाळी नऊ वाजेपासून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. बिग बॉस 17 च्या घरातून अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बाहेर पडला आहे.यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Jan 24,2024 7:41 AM

Follow us
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.