Maharashtra News Live Update : राज्यात आज 5 हजार 368 नवे कोरोना रुग्ण तर 198 ओमिक्रॉन रुग्ण

| Updated on: Jan 01, 2022 | 8:01 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : राज्यात आज 5 हजार 368 नवे कोरोना रुग्ण तर 198 ओमिक्रॉन रुग्ण
Breaking News

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून ओमिक्रॉनचे (Omicron) संकट वाढले आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येतदेखील मोठ्या संख्येने वाढ होत आहे. राज्यात आज 5 हजार 368 कोरोना नवे रुग्ण तर 198 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक पवित्रा घेत प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. तसेच जिल्हा पातळीवर, अहमदनगर, नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा शहरांतदेखील नियमावाली जारी करण्यात आली आहे. या तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडींच्या सर्व अपडेट्स येथे फक्त टीव्ही 9 मराठीवर.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Dec 2021 09:53 PM (IST)

    राज्यात ओमिक्रॉनचा पहिला बळी

    राज्यात कोरोना विषाणू (Corona Virus) आणि तसंच ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका कमी असल्याचं सांगितलं जात होतं. अशावेळी देशात आणि राज्यात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेल्याची माहिती मिळतेय. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली होती असा अहवाल आज आला आहे.

  • 30 Dec 2021 08:45 PM (IST)

    राज्यात आज 198 ओमिक्रॉन रुग्ण

    कोरोनाच्या मोठ्या रुग्णवाढीसोबतच राज्यात आज तब्बल 198 ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईतल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 190 वर गेली आहे. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 450 रुग्णांची नोंद झाली आहे तर 125 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

  • 30 Dec 2021 07:21 PM (IST)

    दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत

    आरोग्यमंत्री टोपे काय म्हणाले?

    टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो आज उद्यामध्येच घेतला जाईल. हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे, ती नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे, त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरावं, त्यामुळे डेल्टा किती आणि ओमिक्रॉनचे रुग्ण किती हे समजेल. ट्रिटमेंटवर मोल्नोपिरावीर ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली. लसीकरणाबाबत केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन करावं अशी चर्चा झाली. लसीकरणापासून वंचित असलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा.

  • 30 Dec 2021 07:15 PM (IST)

    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद

    राज्यात आज रुग्णसंख्येत मोठी वाढ

  • 30 Dec 2021 01:45 PM (IST)

    चाळीसगाव छत्रपती शिवरायांचा पुतळा लोकार्पण सोहळा प्रकरण, पाच हजार जणांवर गुन्हा दाखल

    चाळीसगाव : छत्रपती शिवरायांचा पुतळा लोकार्पण सोहळा प्रकरण

    आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पाच हजार जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

    जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी कायद्याचे उल्लंघन व करोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • 30 Dec 2021 12:40 PM (IST)

    भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

    भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पाॅझेटिव्ह...

    माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना कोरोनाची लागण...

    विखे पाटील विधानसभेच्या अधिवेशनाला होते उपस्थित...

    अहमदनगर येथील विखे पाटील रूग्णालयात केली कोविड टेस्ट...

    संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी...

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन...

  • 30 Dec 2021 12:19 PM (IST)

    वेळेत निवडणुका घेण्याची राजकीय पक्षांची मागणी- निवडणूक आयोग

    मुंबई : वेळेत निवडणुका घेण्याची राजकीय पक्षांची मागणी

    निवडणूक प्रक्रियेवेळी कोरोनाविषयक सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे.

    निवडणूक आयोगाची माहिती

  • 30 Dec 2021 12:00 PM (IST)

    मी आलो तर गर्दी होणार, गुन्हे दाखल करायला लागणार : अजित पवार

    मी आलो तर गर्दी होणार

    आजकाल सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किती ऍक्टिव्ह झालेत

    मग फोटो येणार, गुन्हे दाखल करायला लागणार, मग परत विचारणार आमच्यावर कोण गुन्हे दाखल करणार

    माझी राजकीय सुरवात पीडीसीसी बँकेतुन झालीये

    पुणे जिल्हा बँकेचा कारभार सुरळीत सुरू आहे

    काही बँका मात्र, पार रसातळाला गेल्यात

  • 30 Dec 2021 11:58 AM (IST)

    लोकांना गांभीर्य नाहीये, पुण्यात सभागृहातील गर्दीवरून अजित पवारांनी सुनावलं

    पुणे : पीडीडीसी बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेला प्रचंड गर्दी झाली आहे.

    या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संबोधित करत आहेत. सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झालीये

    लोकांना गांभीर्य नाहीये

    सभागृहातील गर्दीवरून अजित पवारांनी सुनावलं

    बाबांनो, माझी विनंती आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे खूप काळजी घेण्याची गरज आहे

    अधिवेशनात मला म्हणाले की मी सभागृहात आल्यापासून ते जाई पर्यंत मास्क लावलेला असतो, बोलताना काढत नाही

    आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे, आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही

    जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे

    नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता घरातच करा

    आम्हालाही बंधन घालायला बर वाटत नाही

    आत्ता कुठं परिस्थिती सुधारत होती, पण परत नव्याने उद्भवलं

    काही राज्यांनी रात्रीचं लॉकडाऊन लावलं आहे

    काहींनी तर निवडणूक पुढे ढकल्यात आहेत

    बरेच जण भेटतात, पत्र पाठवतता तुमच्यासाठी हॉटेलचं उद्घाटन, कार्यालयाचं उद्घाटन थांबलं आहे

    पण मी आलो तर गर्दी होणार

  • 30 Dec 2021 11:34 AM (IST)

    पुण्यात पीडीडीसी बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेला प्रचंड गर्दी

    पुणे : पीडीडीसी बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेला प्रचंड गर्दी

    उपमुख्यमंत्री अजित पवार घेतायेत प्रचारसभा

    अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलीय प्रचारसभा

    सभागृहासह स्टेजवरसुद्धा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    अनेकांनी मास्कही लावले नाहीत

    गर्दी आणि मास्कवरुन सतत बोलणाऱ्याला अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या सभेतच कार्यकर्त्यांनी फासला कोरोना नियमांना हरताळ

  • 30 Dec 2021 11:26 AM (IST)

    राजधानी दिल्लीमधील मंदिरं पुन्हा बंद, 24 तासांत 923 कोरोना रुग्ण

    नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील मंदिरं पुन्हा बंद

    नवी दिल्लीत सध्या यलो अलर्ट

    दिल्लीत गेल्या 24 तासांत 923 कोरोना रुग्ण

    सगळी मंदिरं बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय

  • 30 Dec 2021 11:22 AM (IST)

    मोडीकल, मेयो, एम्स रुग्णालय तिसऱ्या लाटेसाठी सज्ज- नितीन राऊत

    नागपूर - ओमिक्रॅानचं संकट असल्याने 31 डिसेंबर आणि नव्या वर्षाच्या पार्टीवर निर्बंध

    - रात्री 9 ते सकाळी सहापर्यंत कलम 144 लागू करण्यात आलंय

    - लॅाकडाऊन लावण्याचा विचार नाही, पण लोकांचा जीव महत्त्वाचा

    - नागपूरात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

    - टास्क फोर्सच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने निर्बंध लावले

    - निर्बंध लावत असताना कडक धोरण टाळण्याचा प्रयत्न

    - मोडीकल, मेयो, एम्स रुग्णालय तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

    - ओमिक्रॅान रुग्णांसाठी स्वतंत्र वॅार्ड तयार केलाय

  • 30 Dec 2021 11:03 AM (IST)

    आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण, विधानसभा अधिवेशनाला लावली होती हजेरी  

    पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण

    सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉसिटीव्ह आली

    सध्या होम आयसोलेशन उपचार सुरू, अशी मिसाळ यांची माहिती

    तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी कोव्हीड चाचणी करण्याचं केलं आवाहन

    विधानसभा अधिवेशनाला लावली होती हजेरी

  • 30 Dec 2021 10:39 AM (IST)

    तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ, मंदिरातील दोन चांदीच्या मूर्तीवर मारला डल्ला

    उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ

    मंदिरातील दोन चांदीच्या मूर्तीवर मारला रात्री डल्ला

    विठ्ठल बिरुदेव व मलिंगराया या देवाच्या मूर्त्या चोरून नेल्या व पूजाऱ्याला केली मारहाण

  • 30 Dec 2021 10:29 AM (IST)

    कणकवली पोलीस नारायण राणे यांची भेट घेऊन परतले

    सिंधुडूर्ग- कणकवली पोलीस नारायण राणे यांची भेट घेऊन परतले

    पोलिसांकडून भेटीचे कारण काय याबाबत कुठलेही उत्तर देण्यास नकार

    काल नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजवर नारायण राणे यांच्या भेटीसाठी आली होती हीच पोलिसांची गाडी

    पोलीस गाडीतून एक अधिकारी उतरून नारायण राणे यांच्या बंगल्यावर झाला होता दाखल

    पोलिसांकडून कुठलीही माहिती सांगण्यास नकार

  • 30 Dec 2021 09:54 AM (IST)

    सार्वजिनक कार्यक्रमातून कोरोनाची लागण वाढत आहे- संजय राऊत

    मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे अनेक लग्न समारंभात गेल्या होत्या, मीही त्यांच्यासोबत अनेक लग्नात गेलो होतो, आम्ही अनेक सार्वजनिक कार्यक्रमात गेलो होतो, त्यातून ही लागण वाढत आहेस असे संजय राऊत म्हणाले.

  • 30 Dec 2021 09:46 AM (IST)

    कुडाळ मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींची भेट

    सिंधुदुर्ग : कुडाळ मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींची भेट

    भाजपच्या पॅनलचे उमेदवार प्रकाश मौर्य आणि भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे यांच्यासोबतही वैभव नाईक यांच्या गप्पा

    वैभव नाईक यांनी भाजपच्या पॅनलचे उमेदवार प्रकाश मोर्यै यांना दिल्या शुभेच्छा

    या भेटीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

  • 30 Dec 2021 09:40 AM (IST)

    बीडमध्ये वक्फ बोर्डाची 409 एकर जमीन हडप, तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

    बीड: वक्फ बोर्डाची 409 एकर जमीन हडप

    तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल

    बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

    उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचा दुसरा घोटाळा उघड

    आष्टी जमीन घोटाळा प्रकरणात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव आहेत मुख्य आरोपी

    आता पुन्हा 409 एकर घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्याने आघाव यांच्या अडचणीत वाढ

  • 30 Dec 2021 09:01 AM (IST)

    जम्मू-काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

    जम्मू-काश्मीर : सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

    भारतीय लष्कराचा मोठा पराक्रम

    दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सहा दहशतवादी ठार

    अनंतनाग आणि कुलगाममध्ये पहाटेपासून चकमक

    चार दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात यश

    चकमक झालेल्या परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन

  • 30 Dec 2021 09:00 AM (IST)

    अखेर कालीचरण महाराजला अटक, छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांची कारवाई

    रायपूर : अखेर कालीचरण महाराजला अटक

    छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांची कारवाई

    तिक्रपरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हा

    मध्यप्रदेशमधील खजुराहो मधून कालीचरण महाराजला अटक

    धर्मसंसदमध्ये महात्मा गांधीजीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

  • 30 Dec 2021 08:59 AM (IST)

    मालेगावमध्ये जप्त केलेल्या तलवारींचे 'दंगल' कनेक्शन उघड, राजस्थान आणि अजमेरमधून खरेदी केल्या तलवारी

    नाशिक - मालेगावमध्ये जप्त केलेल्या तलवारींचे 'दंगल' कनेक्शन उघड

    मालेगावमध्ये दंगल घडण्याच्या 1 दिवस आधीच आणल्या होत्या तलवारी

    संशयितांनी राजस्थान आणि अजमेरमधून खरेदी केल्या तलवारी

    याप्रकरणी 3 जणांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे

  • 30 Dec 2021 08:29 AM (IST)

    नाशिकमधील पिंपळगाव आगारातील एसटी चालक बडतर्फ, 34 कर्मचाऱ्यांना नोटीस

    नाशिक - पिंपळगाव आगारातील एसटी चालक बडतर्फ

    आणखी 34 कर्मचाऱ्यांना नोटीस

    नाशिक विभागातील पहिलीच कारवाई

    आता पर्यंत 70 एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस

    एसटी प्रशासनाकडून 7 दिवसांचा अल्टीमेटम

    67 दिवसांपासून नाशिकचे कर्मचारी संपात सहभागी

  • 30 Dec 2021 08:06 AM (IST)

    मराठवाड्याला गारपीठीचा मोठा फटका, 2 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट

    औरंगाबाद : मराठवाड्याला गारपीठीचा मोठा फटका

    तब्बल 2 हजार हेक्टरवरील पिके झाली भुईसपाट

    नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाचे आदेश

    औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला गारपीठीचा सर्वात मोठा फटका

    तूर, हरभरा, गहू, ज्वारी आणि फळपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान

  • 30 Dec 2021 07:48 AM (IST)

    नागपुरात मास्क आणि सॅनिटायझरच्या खाली लपवून गांजा तस्करी, दोघांना अटक

    नागपूर :  मास्क आणि सॅनिटायझरच्या खाली लपवून गांजा तस्करी

    - 31 डिसेंबरसाठी जाणारा गांजा बुटीबोरीजवळ जप्त

    - नागपूर जिल्हयात बुटीबोरी पोलिसांची गांजा जप्तीची मोठी कारवाई

    - बुटीबोरी जवळ 76 किलो गांजा केला जप्त

    - आर्टीका गाडीत सुरु होती गांजी तस्करी

    - हरियाणा पासिंगच्या गाडीतून गांजा तस्करी

    - दोन आरोपींना अटक

    - दिल्लीतील आरोपी पवन कश्यप आणि युपीतील दिपक शर्माला अटक

    - नागपूर पोलीस घेत आहेत मास्टरमाइंड गांजा तस्कराचा ओध

  • 30 Dec 2021 07:46 AM (IST)

    औरंगाबादेत मास्क न वापरणाऱ्यांच्या 450 गाड्या टाकल्या काळ्या यादीत 

    औरंगाबाद : मास्क न वापरणाऱ्यांच्या 450 गाड्या टाकल्या काळ्या यादीत

    मास्क न वापरणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईत झाली वाढ

    वाहनांचा दंड भरेपर्यंत वाहने राहतील काळ्या यादीत

    मास्क कारवाईचा दंड भरल्याशिवाय वाहनांसंबंधी व्यवहार होणार नाहीत

    प्रादेशिक परिवहनकडून लावण्यात आला विशेष नियम

  • 30 Dec 2021 07:35 AM (IST)

    ओमिक्रॅानच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध, हॅाटेल, रेस्टॅारंट 50 टक्के क्षमतेसह रात्री नऊपर्यंत सुरु

    नागपूर- ओमिक्रॅानच्या पार्श्वभूमिवर नागपूर जिल्ह्यात कडक निर्बंध

    - 31 डिसेंबरला अत्यावश्यक सेवा सोडल्यास रात्री 9 नंतर सगळं बंद

    - फार्महाऊस, हाउसिंग सोसायटीमध्ये कार्यक्रमावरंही बंदी

    - हॅाटेल, रेस्टॅारंट 50 टक्के क्षमतेसह रात्री नऊपर्यंत सुरु

    - लग्न समारंभात हॅालमध्ये 100, तर खुल्या जागेत 250 जणांची मर्यादा

    - अंत्यविधीसाठी 50 जणांची कमाल मर्यादा

    - नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले जमावबंदीसह नव्या निर्बंधाचे आदेश

  • 30 Dec 2021 07:11 AM (IST)

    OBC | महाराष्ट्रात लवकरच ओबीसींची नवी संघटना, विजय वडेट्टीवार मार्गदर्शक, नाव आणि भूमिका काय ?

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाचा मुद्दा अजूनही धगधगताच आहे. या मुद्द्यावरुन मागील कित्येक दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असताना आता ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात आणखी एका नव्या ओबीसी संघटनेची स्थापना केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही संघटना राज्यातील एका मोठ्या मंत्र्याची असणार असल्याचे सांगितले जात असून मंत्री विजय वडेट्टीवार या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत.

Published On - Dec 30,2021 6:31 AM

Follow us
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.