Maharashtra News Live Update : राणे आणि शिवसेनेत पोस्टर वॉर, नितेश राणेंच्या फोटोसह ‘हरवला आहे’चे पोस्टर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: prajwal dhage

Updated on: Jan 02, 2022 | 6:08 AM

Maharashtra News Omicron Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update : राणे आणि शिवसेनेत पोस्टर वॉर, नितेश राणेंच्या फोटोसह 'हरवला आहे'चे पोस्टर
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 454 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 157 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 8067 नव्या कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Omicron News live) नोंद झाली. सर्वाधिक रुग्णांची संख्या मुंबईत आढळून आली आहे. मुंबईत 5428 रुग्ण आढळून (Mumbai Omicron News Live) आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपून गेली तरी संप सुरुचं आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा (Koregoan Bhima) येथे शौर्य दिनानिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 01 Jan 2022 10:18 PM (IST)

  राणे आणि शिवसेनेत पोस्टर वॉर

  राणे आणि शिवसेनेत पोस्टर वॉर, नितेश राणेंच्या फोटोसह ‘हरवला आहे’चे पोस्टर

 • 01 Jan 2022 10:13 PM (IST)

  नवी दिल्ली नंतर हरियाणा राज्यात निर्बंध

  सिनेमागृह, स्विमिंग पूल, पार्क बंद करण्याचा हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

  गुरुग्राम, फरिदाबाद सह 5 जिल्ह्यात निर्बंध लागू

  नवी दिल्लीतील वाढती कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

 • 01 Jan 2022 04:30 PM (IST)

  मुंबईत ड्रग्सचा मोठा साठा जप्त

  सुमारे 3 कोटी 18 लाख रुपयांच ड्रग्स जप्त
  31 डिसेंबरच्या पार्टी साठी आणण्यात आलं होतं ड्रग्स
  3 आफ्रिकन नागरिकांना अटक
  मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केली कारवाई
 • 01 Jan 2022 03:34 PM (IST)

  500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधला.

 • 01 Jan 2022 03:26 PM (IST)

  500 चौरसफुटापर्यंत मालमत्ता कर माफ

  500 चौरसफुटापर्यंत मालमत्ता कर माफ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

  मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

 • 01 Jan 2022 01:19 PM (IST)

  हरियाणात डोंगराचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

  हरियाणामध्ये  डोंगराचा भाग कोसळला. हरियाणाच्या भिवानी भागात 15 ते 20 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु करण्यात आलं असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

 • 01 Jan 2022 12:28 PM (IST)

  जळगाव गिरणा संवर्धनासाठी ‘गिरणा परिक्रमे’ला सुरुवात

  जळगाव गिरणा संवर्धनासाठी ‘गिरणा परिक्रमे’ला सुरुवात

  रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह यांची उपस्थिती

  महिनाभर जिल्ह्यातील गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये  परिक्रमा

  पाण्यासाठी लोक या देशातून त्या देशात स्थलांतरित होत अाहे . त्यामुळेच पाण्यावरुनच तिसरे महायुध्द होणार असल्याचे संकेत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी जळगावात गिरणा नदीच्या परिक्रम कार्यक्रमाप्रसंगी दिले.

 • 01 Jan 2022 10:57 AM (IST)

  फर्जीवाडा विरोधात लढाई सुरू ठेवण्याचा संकल्प : नवाब मलिक

  - फर्जीवाडा विरोधात लढाई सुरू ठेवण्याचा संकल्प या नव्या वर्षात मी केला आहे..

  - 18 कोटी डील काय झाले,आम्ही दिलेल्या तक्रारीचे काय झाले...

  - रिया चक्रवर्ती बाबत आता कोर्टात धाव घेतली जात आहे..

 • 01 Jan 2022 10:42 AM (IST)

  मास्क वापरला नाही तर माझ्या मुलीचा फोन येतो, ती माझी काळजी घेते : सुधीर मुनगंटीवार

  मास्क वापरला नाही तर माझ्या मुलीचा फोन येतो, ती माझी काळजी घेते… मी फक्त इंटरव्यु देण्यासाठी मास्क काढतो..

  - आयुष्यात मी समाधानी… एवढीच इच्छा की देवाने आशिर्वाद द्यावा, शक्ती द्यावी, माझ्या हातून ऊत्तम काम व्हावं ही इच्छा…

  - भाजपची सत्ता येणार का हा प्रश्न नाही, शुन्यातून सत्तेत पोहोचण्यासाठी काम करणार…

 • 01 Jan 2022 10:21 AM (IST)

  देहू मंदिर परिसरात भाविकांची तुरळक गर्दी

  -नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक मंदिरे भाविक भक्तांच्या मंदियाळीने सजलीये तर संत तुकाराम महाराजांच्या देहूत भाविक भक्तांची संख्या तुरळक पहायला मिळाली

  -पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक देहूत दाखल.देहू मंदिर परिसरात भाविकांची तुरळक गर्दी

 • 01 Jan 2022 09:00 AM (IST)

  बैलगाडा शर्यतीला स्थगिती, शिवाजीराव आढळराव पाटील यांचं घाटात ठिय्या आंदोलन

  - बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घाटात सुरू केले ठिय्या आंदोलन,

  - शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत बैलगाडा मालकांचेही आंदोलन सुरू ,

  - जिल्हा प्रशासनाचा आंदोलकांकडून केला जातोय निषेध

 • 01 Jan 2022 08:06 AM (IST)

  बैलगाडा शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यानं बैलगाडा मालकांकडून सरकारचा निषेध

  बैलगाडा शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांकडून सरकारचा निषेध,

  - एकीकडे भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाते मग बैलगाडा शर्यतीला का नाही ?

  - बैलगाडा मालकांचा प्रशासनाला सवाल,

  - शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये निराशा

 • 01 Jan 2022 07:44 AM (IST)

  आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

  - बनावट दागिने बँकेत तारण ठेऊन आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल - नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - 2021 मध्ये सोने तारण ठेऊन 24 लाख रुपयांच घेतलं होतं कर्ज - कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली असता बनावट दागिने असल्याचा प्रकार आला समोर - नितीन कातोरे,संतोष थोरात,निलेश विसपुते,रावसाहेब कातोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

 • 01 Jan 2022 06:59 AM (IST)

  वैष्णवदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानं 6 जणांचा मृत्यू

  वैष्णवदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानं 6 जणांचा मृत्यू

 • 01 Jan 2022 06:11 AM (IST)

  नव्या वर्षात कोरोनाच्या संकटातून मुक्तता कर, भक्तांचं कुलस्वामिनी तुळजाभवानीला साकडं

  नव वर्षाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांनी पहाटे पासून गर्दी केली होती. कोरोना संकट दूर होऊन या संकटातून भक्तांची मुक्तात करावी असे साकडे भक्तांनी तुळजाभवानी चरणी घातले. तुळजाभवानी मंदिर कळसावरील आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता, नव वर्षात् तुळजाभवानी दर्शन घेऊन अनेक भाविकांनी त्याच्या कार्याची नवीन सुरुवात केली.

Published On - Jan 01,2022 6:06 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI