AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE Update | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अडचणीत, 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 12:16 AM
Share

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी| Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 01 2021

Maharashtra News LIVE Update | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अडचणीत, 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 01 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jul 2021 11:09 PM (IST)

    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अडचणीत, 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

    पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अडचणीत

    -शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार 350 वारकऱ्यांना दर्शनाची परवानगी शासनाकडून देण्यात आली होती

    -त्यानुसार आज 164 वारकऱ्यांच्या कोरोना चाचणी केली त्यापैकी 20 वारकरी पॉझिटिव्ह आले आहेत

    -तर प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी 2 वारकरी पॉझिटिव्ह आले आहेत

    -उद्या या 20 जणांच्या संपर्कात आलेल्या वारकऱ्यांचा शोध घेण्यात येईल

    -हे वारकरी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे

  • 01 Jul 2021 09:30 PM (IST)

    कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल, डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी सहकार पॅनेलची विजयाकडे वाटचाल

    सातारा : कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल

    डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी सहकार पॅनेलची विजयाकडे वाटचाल

    सहकार पॅनेलचे तीन उमेदवार दहा हजार मताधिक्याने विजयी

    सर्व 21 जागांवर पाच हजारांपेक्षा जास्त मतांची उमेवारांना आघाडी

    काही तासात सर्व निकाल समजणार

  • 01 Jul 2021 09:29 PM (IST)

    मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारची याचिका फेटाळली

    मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारची याचिका फेटाळली

    102 व्या घटना दुरूस्ती संदर्भात केंद्र सरकारनं केली होती याचिका

    मराठा आरक्षण संदर्भात पुनर्विचार करण्याची गरज नाही

    सुप्रीम कोर्टाने आदेशात केलं स्पष्ट

  • 01 Jul 2021 07:56 PM (IST)

    नालासोपाऱ्यात कार-दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी

    नालासोपारा : नालासोपाऱ्यात  XUV 500 कार आणि स्कूटीचा भीषण अपघात झाला आहे. नालासोपारा पश्चिम रिद्धीविनायक हॉस्पिटल समोरील रोडवर आज 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटीवरील दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. XUV500 या कारने भरघाव वेगात येऊन स्कूटी चालकाला उडविले असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

  • 01 Jul 2021 07:23 PM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, खनिजकर्म महामंडळाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप

    मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    – शिवसेनेकडे असलेल्या खनिजकर्म महामंडळाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा आक्षेप

    – खनिजकर्मने राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर नाना यांनी घेतला आक्षेप

    – महाजेनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॅाशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर आक्षेप

    – संजय हरदानी चालवत असलेल्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा उल्लेख

    – खनिजकर्म महामंडळ रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चरला कंत्राट देणार आहे, त्याला स्थगिती देण्याची मागणी

    – खनिजकर्म महामंडळाचे शिवसेनेचे आमदार आशिष जैसवाल हे अध्यक्ष आहे

    – शिवसेनेकडे असलेल्या महामंडळावर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंचे गंभीर आरोप

  • 01 Jul 2021 05:55 PM (IST)

    जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, गोंडपिपरी-पोडसा मार्ग महिन्यातून चौथ्यांदा बंद

    चंद्रपूर : जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

    गोंडपिपरी-पोडसा मार्ग महिन्यातून चौथ्यांदा बंद

    या ठिकाणी सुरू असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम नागरिकांच्या जिवावर

    पर्यायी रस्ता वाहून गेल्याने नागरिक काढत आहेत धोकादायकरीत्या वाट

    ढीसाळ नियोजन, हलगर्जीपणा आणि संथगतीच्या कामामुळे जनजीवन विस्कळीत

    पुढल्या काही महिन्यात अपेक्षित पावसाने स्थानिकांच्या समस्या वाढणार

  • 01 Jul 2021 05:41 PM (IST)

    रायगडमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

    रायगड : मुंबई – पुणे एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात

    तिघांचा मृत्यू, अपघातात वाहनातील काही प्रवासी जखमी

  • 01 Jul 2021 05:12 PM (IST)

    देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

    पुणे -आज देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान केले आहे

    -मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुका विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत

    -पालखीचा मुककम 19 तारखेपर्यंत असणार आहे

  • 01 Jul 2021 05:03 PM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

    सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

    अमित सुरवसे आणि शिरसागर नामक दोन तरुणांवर गुन्हा दाखल

    अमित सुरवसेने याआधी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन केले होते

    दोघेही तरुण सामाजिक कार्यात सक्रिय

  • 01 Jul 2021 04:33 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस, दुबार पेरणीचे संकट टळले, शेतकरी सुखावला

    गोंदिया : जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर  जोरदार पाऊस

    दुबार पेरणीचे संकट टळले, शेतकरी सुखावला

    शेती मशागतीच्या कामाला येणार वेग

  • 01 Jul 2021 04:26 PM (IST)

    सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास आजपासून सुरुवात

    मुंबई : सिडकोच्या घरांचा ताबा देण्यास आजपासून सुरुवात

    कळंबोलीमधील सिडको प्रकल्प सदनिकेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

    मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या घरांच्या चाव्या

    आतापर्यंत 1 हजार 950 लाभार्थीनी सर्व हप्त्यांसह देखभाल व दुरुस्ती खर्च भरलेला

    या ग्राहकांना सिडको घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देणार असून त्याची सुरुवात आजपासून झाली

    सिडको लाभार्थीना दिलेल्या वेळेनुसार दिवसाला सुमारे 100 घरांची नोंदणी व करारनामे करणार

    चार हजार घरांचा ताबा ऑक्टोबर 2020 रोजी नागरिकांना मिळणार होता.

    मात्र करोनाची साथ याच वर्षी सुरू झाल्याने दिलेली मुदत सिडकोला पाळता आली नाही

  • 01 Jul 2021 01:09 PM (IST)

    सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आघाडीवर

    कराड

    सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आघाडीवर

    कृष्णा सहकारी कारखाना निवडणूक निकाल

    पहिल्या फेरीतील निकाल

    सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे विलास भंडारे 5546 मतांनी आघाडीवर

  • 01 Jul 2021 12:59 PM (IST)

    भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची नागरिकाला मारहाण

    – भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची नागरिकाला मारहाण,

    – मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल,

    – औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस,

    – नगरसेविका औंध परिसरातीलच क्लोरियन पार्क या इमारतीत त्या राहण्यास आहेत. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती देखील याच इमारतीत राहते,

    – याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल,

    – याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • 01 Jul 2021 12:59 PM (IST)

    महाराष्ट्र सरकार 65 हजार कोटी शिक्षकांच्या पगारावर खर्च करतो आहोत – अजित पवार

    अजित पवार भाषण पॉईंट्स –

    50 वर्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम पवार साहेब करत आहेत

    अनेक संस्था उभ्या राहिल्या

    अनेक संस्था पैसे कमवण्यासाठी उभ्या राहिल्या अस अनेक जण म्हणतात

    शिक्षणाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक जण पुढे जातात

    बिल गेट्स देखील याचंच उदाहरण

    महाराष्ट्र सरकार 65 हजार कोटी शिक्षकांच्या पगारावर खर्च करतो आहोत

  • 01 Jul 2021 12:57 PM (IST)

    कृष्णा सहकारी कारखाना निवडणूक निकाल, पहिल्या फेरीतील मतमोजणी सुरु

    कराड –

    कृष्णा सहकारी कारखाना निवडणूक निकाल

    पहिल्या फेरीतील मतमोजणी सुरु

    जयवंतराव भोसले सहकार पॅनल आघाडीवर

    राज्यमंत्री vishwajeet कदम यांना धक्का

    Vishwajeet कदम नेर्तृत्व करत असलेलं रयत पॅनेल तिसऱ्या क्रमांकावर

  • 01 Jul 2021 12:56 PM (IST)

    एकनाथ महाराज पालखी प्रस्थान कार्यक्रम सोहळा सुरू

    औरंगाबाद –

    एकनाथ महाराज पालखी प्रस्थान कार्यक्रम सोहळा सुरू

    गावातील नाथ मंदिरात जल्लोषात भजन कीर्तन कार्यक्रम सुरू

    नाथ महाराजांचे वंशज रघुनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

  • 01 Jul 2021 11:58 AM (IST)

    नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ईडीकडे तक्रार 

    – नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ईडी कडे तक्रार

    – अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप
    – ॲड. तरुण परमार यांनी केली ईडी कडे तक्रार
    – ईडी ने समन्स बजावून ॲड परमार यांना मुंबईला जवाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं
    – परमार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केली होती ईडी कडे तक्रार
  • 01 Jul 2021 10:56 AM (IST)

    छत्रपती सभांजी राजेंनी शिवप्रेमींना रायगडवर पायी न चढण्याबाबत केले आवाहन

    रायगड –

    छत्रपती सभांजी राजेंनी शिवप्रेमींना रायगडवर पायी न चढण्याबाबत केले आवाहन

    रायगड किल्ला परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे रायगड वर जाणा-या पाय-यांच्या मार्गावर मोठमोठाले दगड तसेच दरडीचा काही भाग पडला असुन त्यामुळे मार्ग तर बदं झाला आहे.

    तसेच जोरदार पर्जन्यव्रष्टीमुळे पाय-यांवरुन जोरदार पाण्याचे प्रवाह वाहतात. त्यामुळे शिवप्रेमीच्या जिवीताला धोका सभंवतो.

    सुरक्षिततेच्या द्रुष्टीने गडाच्या मार्गावरील दरड काढण्याचे काम रायगड प्राधिकरणाकडुन चालु आहे.

    शिवप्रेमीच्या जिवीतास धोका सभवंत असल्याकारणारे छत्रपती सभांजी महाराजांनी फेसबुक द्वारे गडावरील मार्गावर पडलेले दगडाचे फोटो शेयर करुन शिवप्रेमीनां गड पायी चढणे टाळण्याबाबत केले आवाहान.

  • 01 Jul 2021 09:01 AM (IST)

    पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ

    कोल्हापूर –

    पुणे बंगळुरु महामार्गावरच्या टोलनाक्यांवर दरवाढ

    कोल्हापूर सातारा दरम्यान दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ

    किणी, तासवडे टोल नाक्यांवर दरवाढ

    5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत वाढ

    नव्या दरवाढीची मध्यरात्री पासून अंमलबजावणी

    कार जीप या वाहनांना जुना दर 75, नवा दर 80

    हलक्या मालवाहतूक वाहनांसाठी जुना दर 135, नवा दर 145

    ट्रक बस आणि कंटेनरला जुना दर 265 नवा दर 290

  • 01 Jul 2021 08:49 AM (IST)

    कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीला सुरुवात

    कराड –

    कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीला सुरुवात

    कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरु

    74 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे मतमोजणी सुरु

    मतपत्रिका एकत्र न करता मतदान केंद्रानिहाय मतमोजणी सुरु

    कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी 34532 सभासदांनी मतदान केले आहे

    सायंकाळी 5 वाजे पर्यंत संपुर्ण निकाल अपेक्षित

    मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

    कृष्णेची निवडणूक चुरशीची तिरंगी झाली आहे

    निकालाबाबत सभासदांसह पश्चिम महाराष्ट्रात उत्सुकता

  • 01 Jul 2021 08:38 AM (IST)

    देहू संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सजली

    देहू

    देहू संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सजली,

    मंदिराला आकर्षक सजावट,

    घाटावर फक्त शांतता,

    सकाळी 10 वाजता मानाचे घोडेकर सराफ यांच्याकडून पादूका पूजन,

    10 ते 11.30 वाजता हरी किर्तनानं सप्ताहाची सांगता होईल…

    11 वाजता पादूका भजनी मंडपात आणल्या जातील,

    त्यानंतर 12 वाजता पुजेला सुरुवात होईल,

    1 वाजता खासदार छत्रपती संभाजीराजें भजनी मंडपात येतील,

    त्यांच्या हस्ते पादूका पूजन होऊन प्रस्थान सोहळ्याला सुरूवात होईल,

    2 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल,

  • 01 Jul 2021 08:36 AM (IST)

    औरंगाबाद शहरात सलग तिसऱ्या दिवशी लस टंचाई

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात सलग तिसऱ्या दिवशी लस टंचाई

    आज शहरात मिळणार फक्त 600 लस

    कोव्हाक्सीन लसींचे फक्त 600 डोस उपलब्ध

    लस मिळत नसल्यामुळे औरंगाबाद शहरात नागरिक हवालदिल

  • 01 Jul 2021 07:55 AM (IST)

    12 लाख रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यांना नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    नाशिक –

    कॉलेजरोड परिसरातील एका बंगल्यातून तब्बल 12 लाख रुपये लंपास करणाऱ्या चोरट्याना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    – खिडकीचे गज कापून चोरट्यानी टाकला होता डाव

    – संशयित 3 आरोपी मुद्देमालासह अटक

    – शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस सतर्क

  • 01 Jul 2021 07:54 AM (IST)

    विदर्भामध्ये उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती सादर करा, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश

    – विदर्भामध्ये उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती सादर करा

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश

    – आरोग्य सुविधांची एक महिन्यात माहिती सादर करण्याचे आदेश

    – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची गरज

    – उच्च न्यायालयाने व्यक्त केलं मत

    – कोरोनासंदर्भात न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुनावणी

  • 01 Jul 2021 07:51 AM (IST)

    एकनाथ महाराज पालखीचे आज होणार प्रस्थान

    औरंगाबाद –

    एकनाथ महाराज पालखीचे आज होणार प्रस्थान

    एकनाथ महाराजांच्या पादुकांचे पंढरपूर वारीसाठी आज प्रस्थान

    दुपारी 12 वाजता होणार एकनाथ महाराज पादुका पालखीचे प्रस्थान

    प्रस्थान कार्यक्रमासाठी 50 वारकऱ्यांना मिळाली आहे परवानगी

    गावातील नाथ मंदिरातून समाधी मंदिरात होणार पालखीचे प्रस्थान

    18 दिवास नाथ महाराजांच्या समाधी मंदिरात पालखीचा असेल मुक्काम

    19 तारखेला बस मधून पालखी जाणार पंढरपूरला

  • 01 Jul 2021 07:51 AM (IST)

    प्रचारकामाचे पैसे थकवल्याने नगरसेविकेच्या पतीवर हल्ल्याचा प्रयत्न

    प्रचारकामाचे पैसे थकवल्याने नगरसेविकेच्या पतीवर हल्ल्याचा प्रयत्न

    दोनच दिवसांपूर्वी संदीप म्हात्रे यांच्यावर दोघांनी कोयत्याने केला होता वार

    नगरसेविकेच्या पती संदीप म्हात्रेवर देखील गुन्हा दाखल

    संदीप म्हात्रे गणेश नाईक यांचे खंदे समर्थक

    कोपर खैरण्यातील पक्ष कार्यालयातच झाला होता हल्ला

  • 01 Jul 2021 07:44 AM (IST)

    पुणे आता राज्यातील सर्वात मोठे शहर, मुंबईलाही मागे टाकले

    पुणे –

    – पुणे आता राज्यातील सर्वात मोठे शहर, मुंबईलाही मागे टाकले

    – महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश झाल्यामुळे सर्वाधिक क्षेत्रफळाचे शहर म्हणून पुण्याने मुंबईलाही मागे टाकले,

    – मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किलोमीटर असून, पुण्याचे क्षेत्रफळ तब्बल ५१८.१६ चौरस किलोमीटर झाले आहे,

    – नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची समीकरणे कितपत बदलणार याची आता उत्सुकता असेल,

    – या गावांच्या समावेशानंतर येथील पायाभूत सुविधांवर पालिकेला काम करावे लागणार आहे.

    – पाणी, मलनिस्सारण, शिक्षण आदी सुविधा उभारताना त्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही करावी लागणार आहे,

    – या गावांमधील अंदाजे लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे.

  • 01 Jul 2021 07:42 AM (IST)

    कुख्यात रणजित सफेलकरच्या ‘श्रीराम सेने’ची मान्यता रद्द

    – कुख्यात रणजित सफेलकरच्या ‘श्रीराम सेने’ची मान्यता रद्द

    – धर्मादाय आयुक्तांनी केली ‘श्रीराम सेने’ची मान्यता रद्द

    – श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखेनं केली रणजित सफेलकरला अटक

    – सफेलकर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

    – ‘श्रीराम सेने’ची मान्यता रद्द करण्यासाठी गुन्हे शाखेनं पाठवलं धर्मदाय आयुक्तांना पत्र

    – गुन्हे शाखेच्या पत्रानंतर ‘श्रीराम सेने’ची मान्यता रद्द

  • 01 Jul 2021 07:14 AM (IST)

    देहू तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानासाठी सज्ज

    देहू तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानासाठी सज्ज

    मंदिराची अतिशय सुंदर फुलांनी केली सजावट

    काकडा आरतीने दुमदुमली देहू नागरी

  • 01 Jul 2021 07:13 AM (IST)

    तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची होणार चौकशी

    – तुकाराम मुंढे यांच्या काळातील साहित्य खरेदीची होणार चौकशी

    – चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती महापौरांची घोषणा

    – नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती

    – नागपुरात मुंडेंच्या काळात साहित्य खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप

    – महानगरपालिका प्रशासनाने आरोप फेटाळले

    – प्रत्येक खरेदी नियमानुसार झाल्याचं मनपा प्रशासनाचं स्पष्टीकरण

  • 01 Jul 2021 06:47 AM (IST)

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद

    सोलापूर –

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद

    गाडीवर भला मोठा दगडटाकून महाराष्ट्राचा बुलंद आवाजचा नारा देत केले पलायन

    पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाटलाग केल्यानंतर सुद्धा  दगडफेक करणारा हाथी लागला नाही

    सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे घडलेली घटना.

Published On - Jul 01,2021 6:33 AM

Follow us
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.