Maharashtra News LIVE Update | सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत निवडणुका स्थगित करण्याची विनंती करणार: विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 02 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening 

Maharashtra News LIVE Update | सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत निवडणुका स्थगित करण्याची विनंती करणार: विजय वडेट्टीवार
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 02 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Jul 2021 19:09 PM (IST)

  ओबीसी आरक्षण पुन्हा मिळेल, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची चंद्रपूरात प्रतिक्रिया

  चंद्रपूर :ओबीसी आरक्षण पुन्हा मिळेल, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची चंद्रपूरात प्रतिक्रिया, यासाठी विधानसभेचा एकमुखी ठराव केंद्राकडे पाठविणार, एम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात साम्य- दिशाभूल करू नये, इंपेरिकल डेटा नसल्याचे सांगत यातून पळ काढू नका- फाटे फोडू नका, राज्याचा मागासवर्ग आयोग त्यासाठी सज्ज करत आहोत,  सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत निवडणुका स्थगित करण्याची विनंती करणार

 • 02 Jul 2021 19:08 PM (IST)

  बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शिवाजी मोरेला लाच घेताना अटक

  बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शिवाजी मोरे ला लाच घेताना पकडले , वाशीम च्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने 3 हजाराची लाच घेताना अटक, बुलडाणा येथील इंदिरा नगर मधील एका फिर्यादीकडून लुटीच्या प्रकरणात मागितली लाच,
  वाशीम अॅण्टी करप्शन ब्युरोची कारवाई..

 • 02 Jul 2021 18:02 PM (IST)

  पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आरोपीची चौथ्या मजल्या वरून उडी, भिवंडीत एकाचा जागीच मृत्यू

  भिवंडी शहरातील कसाई वाडा येथे आरोपीस पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या तावडीतून चौथ्या मजल्या वरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू ,
  जमील कुरेशी उर्फ जमील टकल्या असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव
  जमील कुरेशी यावर वापी गुजरात येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी आले असता ही घटना घडली .
  परिसरात तणाव ,मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदना साठी रवाना, मोठा पोलीस बंदोबस्त .

 • 02 Jul 2021 18:01 PM (IST)

  संभाजीराजेंचा पुन्हा एकदा साधेपणा समोर, अनाथ मुलांसोबत केलं जेवण

  संभाजीराजेंचा पुन्हा एकदा साधेपणा समोर

  संभाजीराजेंनी केलं अनाथ मुलांमध्ये जेवण

  जामखेड दौरा असताना निवारा बालगृह येथे भेट देऊन संभाजीराजांनी मुलांमध्ये घेतला जेवणाचा आस्वाद

  राजेंचा साधेपणा पाहून मुलही भरवली

 • 02 Jul 2021 18:00 PM (IST)

  मुम्बईच्या नागपाड़ा परिसरात एका बिल्डिंगमध्ये महिलेचा मृतदेह आढळला

  मुम्बईच्या नागपाड़ा परिसरात एका बिल्डिंगच्या रूम मधून 62 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाला

  रेहाना सिद्दीकी आहे महिलेचा नाव

  जेजे मार्ग पोलिस करत आहेत पुढील तपास

 • 02 Jul 2021 16:54 PM (IST)

  पेट्रोल, डिझेल, गॅस च्या महागाई विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

  – पेट्रोल, डिझेल, गॅस च्या महागाई विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
  – जिल्हाधिकारी कार्यलया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच निषेध आंदोलन
  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच महागाई मुक्तच भाषण ऐकवत केला निषेध
  – केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांना लवकर दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन करू राष्ट्रवादि कार्यकर्त्यांचा इशारा

 • 02 Jul 2021 13:20 PM (IST)

  अहमदनगरात डिझेल, पेट्रोल आणि गॅस दर वाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

  अहमदनगर

  डिझेल , पेट्रोल आणि गॅस दर वाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

  नगर शरतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आंदोलन

  केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माणिक विधाते यांच्या सह पदाधिकारी उपस्थित

 • 02 Jul 2021 13:19 PM (IST)

  अमरावतीत विकास कामावरून बडनेराचे आमदार रवी राणा आक्रमक

  अमरावती –

  अमरावतीत विकास कामावरून बडनेराचे आमदार रवी राणा आक्रमक

  बडनेराचे आमदार रवी राणा यांची अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या पतीवर घणाघाती टीका

  कुत्र्याची शेपटी नेहमी वाकडीच राहते ती सरळ होत नाही अशी संजय खोडके यांची परिस्थिती झालीय

  अमरावती महानगरपालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत रवी राणा यांनी उडवली खिल्ली

  संजय खोडके वे विकास कामात अडथळा आणत असल्याचा रवी राणा यांचा आरोप

  रवी राणा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

 • 02 Jul 2021 11:55 AM (IST)

  पायीवारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी ताब्यात घेण्याचे पोलिसांना सूचना

  पुणे

  – पायीवारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी ताब्यात घेण्याचे पोलीसांना सूचना

  -आळंदी आणि परिसरातील पोलीसांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयातुन बिनतारी संदेशा वरून सुचना

  -बंडातात्या कराडकर आळंदी परिसरात असल्याचा विडियो झाला होता व्हायरल..

  -आषाढीवारी सोहळा पायी काढण्यासाठी बंडातात्या कराडकर आहेत आग्रही

 • 02 Jul 2021 11:54 AM (IST)

  राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा अजीत पवारांवरील आरोपांवर खुलासा

  – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा अजीत पवारांवरील आरोपांवर खुलासा

  – अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतेही चुकीचं काम केले नाही.

  – त्यांना कायद्यानुसार व्यवसाय करण्याचा अधिकार आहे.

  – ईडीला त्यांच्याकडून जे काही उत्तर हवे आहे ते देण्यात येईल.

  – ईडी आपले काम करत राहिल. पण बातम्या पसरवून अजित पवार आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे

 • 02 Jul 2021 09:33 AM (IST)

  आळंदी मंदिरात काल्याच्या किर्तनाला सुरुवात

  आळंदी

  मंदिरात काल्याच्या किर्तनाला सुरुवात,

  12 वाजता होणार सप्ताह सोहळ्याची सांगता,

  ह.भ.प भागवत महाराज कबीर यांच्या किर्तनानं होणात्र सप्ताह सोहळ्याची सांगता

 • 02 Jul 2021 09:30 AM (IST)

  सोलापूर जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

  सोलापूर –

  जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

  चार टोळ्यांमधील 38 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

  आणखीन तीन टोळ्यांचा मोक्काअंतर्गत कारवाई साठी ग्रामीण पोलिसांच्या प्रस्ताव तयार

  मोक्का अंतर्गत झालेल्या लोकांवर जबरी चोरी, दरोडा ,खुनी हल्ला ,टोळीयुद्ध असे अनेक गुन्हे दाखल

 • 02 Jul 2021 09:29 AM (IST)

  पंढरपूर विभागातून 466 पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडले

  सोलापूर– पंढरपूर विभागातून 466 पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन तोडले

  शेती, घरगुती ,औद्योगिक वापराच्या वीज बिलांचा आकडा 334 कोटी 17 लाख पेक्षा जास्त

  पंढरपूर विभागात जवळपास 700 पेक्षा जास्त सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन्स

  वारंवार आवाहन करूनही या योजनांची थकीत वीज बिले भरली जात नसल्याने वीजवितरणने केली धडक कारवाई

 • 02 Jul 2021 09:29 AM (IST)

  आळंदी देवस्थान परिसराची बीडीडीएस पथकाकडून तपासणी सुरु

  आळंदी देवस्थान परिसराची बीडीडीएस पथकाकडून तपासणी सुरु

  इको या श्वानाच्या मदतीने केली जातीये तपासणी

  प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तपासणी

  आज दूपारी होणार माऊलींचा प्रस्थान सोहळा

  पुणे शहर पोलीस बीडीडीएस पथकाकडून तपासणी

 • 02 Jul 2021 09:21 AM (IST)

  महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे पडले महागात, 11 जणांना अटक

  सोलापूर – महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे पडले महागात

  सोलापूर,पुणे ,सातारा जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या दहा घटना

  21 आरोपीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल त्यातील 11 जणांना अटक

  आर्थिक संकटात असलेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुलीचे शासकीय कर्तव्य बजावत असताना होताहे शिवीगाळ आणि मारहाण

  पाच महिन्याच्या कालावधीत सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस प्रकरणांमध्ये 103 आरोपी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

  त्यातील 65 जणांना पोलिसांनी अटक केली आहे अटक

 • 02 Jul 2021 08:40 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपाचे उद्घाटन

  पुणे –

  – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपाचे उद्घाटन

  – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील कार्यक्रमाला उपस्थित

  – पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती

  – एव्हीआय वरून लाईव्ह फ्रेम चेक करा

 • 02 Jul 2021 08:39 AM (IST)

  अहमदनगरात दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडर जप्त

  अहमदनगर

  दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडर जप्त….

  पावडरची वाहतूक करताना वाहनासह 4 लाख 28 हजार रुपयांचा माल जप्त…..

  कर्जत पोलिसांची मोठी कारवाई

 • 02 Jul 2021 08:34 AM (IST)

  नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे-पोलीस विभाग यांचा संपर्क तोडला, नागपूर खंडपीठाने एल अँड टीला फटकारले

  नागपूर –

  नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस विभाग यांचा संपर्क तोडून जनहिताची पायमल्ली केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एल अँड टीला फटकारले

  स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांचा संपर्क थकीत रकमेच्या वादा वरून बंद करण्यात आला

  या कॅमेऱ्यांचा माध्यमातून महापालिका आणि पोलीस विभाग यांचं शहरातील घडामोडी वर लक्ष राहत होत

  3700 कॅमेऱ्यांचा माध्यमातून पोलिसांची गुन्हेगारांवर चांगलाच वचक राहत होता

  मात्र याचा संपर्क तुटल्याने पोलिसांना आणि महापालिकेचा सीसीटीव्ही पासून संपर्क तुटला

 • 02 Jul 2021 08:33 AM (IST)

  औरंगाबाद महानगरपालिकेने केल्या 125 जणांवर चेक बाउंसच्या केसेस

  औरंगाबाद –

  औरंगाबाद महानगरपालिकेने केल्या 125 जणांवर चेक बाउंस च्या केसेस

  मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेले 125 चेक झाले बाऊन्स..

  सहा महिन्यात तब्बल 514 चेक झाले बाउन्स..

  दोन कोटी 46 लाख रुपयांचे चेक निघाले बाउन्स..

  389 जणांनी दंडासह रक्कम भरल्याने 125 जणांविरोधात चेक बाउन्स च्या केसेस दाखल

 • 02 Jul 2021 07:46 AM (IST)

  नाशकात स्मार्ट सिटीवरून वाद पेटण्याची शक्यता, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आज घेणार बैठक

  नाशिक – स्मार्ट सिटीवरून वाद पेटण्याची शक्यता

  राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आज घेणार बैठक

  नगरसेवक प्रतिनिधी आणि महापौर बैठकीला राहणार उपस्थित

  स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांवरून नगरसेवक आक्रमक

  कार्यकारी अधिकारी थविल रडारवर

  कुंटेनच्या भूमिकेकडे लक्ष

  थविल यांच्या चौकशीची नगरसेवकांची मागणी

 • 02 Jul 2021 07:45 AM (IST)

  महापालिका निवडणुकीसाठी विदर्भवादी मैदानात उतरणार

  नागपूर  –

  महापालिका निवडणुकीसाठी विदर्भवादी मैदानात उतरणार

  विदर्भवाद्यांन कडून केली जात आहे चाचपणी

  तरुणांनी दाखवला उत्साह

  वेगळ्या विदर्भ साठी आंदोलन करण्या पुरते मर्यादित असणारे विदर्भवादी

  आता आता निकडणुकीचा झेंडा घेऊन मैदानात उतरणार

 • 02 Jul 2021 07:13 AM (IST)

  पुणे म्हाडाच्या 2908 घरांसाठी जाहीर करण्यात आलेली सोडत आज जाहीर होणार

  पुणे –

  – पुणे म्हाडाच्या २९०८ घरांसाठी जाहीर करण्यात आलेली सोडत आज जाहीर होणार,

  – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाहीर केली जाणार,

  – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील २९०८ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती,

  – २९०८ घरांसाठी तब्बल ५७ हजार नागरिकांचे घरांसाठी अर्ज.

 • 02 Jul 2021 06:48 AM (IST)

  कृष्णेच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा 21-0 दणदणीत विजय

  कराड

  कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल

  कृष्णेच्या निवडणुकीत डॉ अतुल भोसलेंच्या सत्ताधारी सहकार पॅनेलचा 21-0 दणदणीत विजय

  तिरंगी लढतीत सत्ताधारी सहकार पॅनेलच उमेदवार सर्व 21जागावर दहा हजारा पेक्षा जास्त मताधिक्याने विजय

  पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम अविनाश मोहिते यांच्या पॅनेलचा दारुण पराभव

  रात्री उशीरापर्यंत सुरू होती मतमोजणी सर्व जागांचे निकाल जाहिर

 • 02 Jul 2021 06:38 AM (IST)

  नवी मुंबई नेरुळ पामबीच येथे भरधाव कारची तीन गाड्यांना टक्कर, वाहतूक पोलीस वाचले

  नवी मुंबई नेरुळ पामबीच मार्गालगत सिग्नलवर तिन्ही कारच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलीस कर्मचारी सुखरूप आहेत, ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI