AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE Update | वाघाच्या हल्ल्यात गुरख्याचा मृत्यू, नागभीड तालुक्यातील खरकाडा जंगल परिसरातील घटना

| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 12:21 AM
Share

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी Maharashtra Breaking News Live Updates In Marathi

Maharashtra News LIVE Update | वाघाच्या हल्ल्यात गुरख्याचा मृत्यू, नागभीड तालुक्यातील खरकाडा जंगल परिसरातील घटना
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 06 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jul 2021 11:15 PM (IST)

    लोकजागर मंच पक्षाचे अध्यक्ष अनिल गावंडे यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

    अकोला : लोकजागर मंच पक्षाचे अध्यक्ष अनिल गावंडे यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

    प्रहार जनशक्ती पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल गावंडे यांची नियुक्ती

    बच्चूभाऊ कडू यांनी आज मुंबई येथे दिलं नियुक्ती पत्र

    अनिल गावंडे हे लोकजागर मंच या पक्षाचे अध्यक्ष होते

    या पक्षावर त्यांनी निवडणूकही लढवली आहे

    आता त्यांचा प्रहारमध्ये प्रवेश झाल्याने पक्षाचे बळ वाढले असून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली आहे

  • 06 Jul 2021 11:13 PM (IST)

    सांगलीमध्ये पावसाला सुरुवात, दुबार पेरणीचे संकट टळले

    सांगली : गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज सांगलीमध्ये पावसाला सुरुवात.

    दुबार पेरणीचे संकट टळले

    शेतकरी काही प्रमाणात सुखावला

  • 06 Jul 2021 08:49 PM (IST)

    वाघाच्या हल्ल्यात गुरख्याचा मृत्यू, नागभीड तालुक्यातील खरकाडा जंगल परिसरातील घटना

    चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुरख्याचा मृत्यू

    नागभीड तालुक्यातील खरकाडा जंगल परिसरातील घटना

    रमेश वाघाडे असं 42 वर्षीय गुरख्याचं नाव

    वाघाडे याच भागातील वाढोना गावातील रहिवासी

    दुपारी गुरं चारायला जंगलात गेले असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला

    जखमी अवस्थेत वाढोना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यावर तिथे त्यांचा मृत्यू

  • 06 Jul 2021 08:43 PM (IST)

    नागपूर जिल्हापरिषद पोटनिवडणुकीसाठी 106 जणांनी भरले उमेदवारी अर्ज

    नागपूर ब्रेकिंग –

    नागपूर जिल्हापरिषद पोटनिवडणूक

    अवैध ठरलेल्या नामनिर्देशनपत्रांची माहिती

    एकूण उमेदवारी अर्ज –

    जिल्हा परिषद – 106

    पंचायत समिती – 164

    एकूण – 270

    वैध ठरलेले अर्ज –

    जिल्हा परिषद – 103

    पंचायत समिती – 160

    अवैध ठरलेले अर्ज –

    जिल्हा परिषद – 3

    पंचायत समिती – 4

  • 06 Jul 2021 08:41 PM (IST)

    अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी येथे दोरदार पाऊस 

    अकोला : जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी येथे दोरदार पाऊस

    गेल्या 15 दिवसानंतर एकतास बरसल्या जोरदार पावसाच्या सरी

    संध्याकाळी बरसला जोरदार पाऊस

    या पावसाचा पिकांना फायदा

    या पावसामुळे शेतकरी आनंदीत

    पेरणी झाल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी आनंदीत

  • 06 Jul 2021 06:54 PM (IST)

    विदर्भात पावसासाठी आणखी दोन दिवस पहावी लागणार वाट

    नागपूर – विदर्भात पावसासाठी आणखी दोन दिवस पहावी लागणार वाट

    8 जुलैपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन 9 व 10 तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज

    नागपूर हवामान विभागाने वर्तविला अंदाज

    वातावरणात वाढलेली ह्युमिडिटी म्हणजे चांगला पाऊस येण्याचे संकेत

    मात्र शेतकऱ्यांना पावसाची आणखी दोन दिवस पहावी लागणार वाट

  • 06 Jul 2021 06:51 PM (IST)

    पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांची उचलबांगडी, निषेधार्थ उद्या आर्णी शहर बंदची घोषणा

    यवतमाळ- आर्णी येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक पितांबर जाधव यांची उचलबांगडी

    जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी कसुरीवरून केली उचलबांगडी

    या निषेधार्थ उद्या आर्णी शहर बंदची घोषणा

    आर्णीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पितांबर जाधव यांच्या बदलीविरोधात केले जाणार आंदोलन

    पितांबर जाधव यांनी काही दिवसात आर्णीमध्ये अवैध धंद्याना चाप बसविला होता

    शिवाय देहविक्कीचा अड्डडा उध्वस्त केला होता

  • 06 Jul 2021 06:49 PM (IST)

    नाशिक महामार्गावर पुणध्ये फाट्यावर भीषण अपघात, दोन जण जखमी

    मुंबई –  नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जात असताना पुणध्ये फाट्यावरली येथील वळणावर कारचा भीषण अपघात

    चालगकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

    अपघातात दोन जण जखमी

  • 06 Jul 2021 04:41 PM (IST)

    अहमदनगरमध्ये आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

    अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

    अधिकारी डॉ. गणेश शेळके वय यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन केली आत्महत्या

    मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली घटना, आत्महत्येपूर्वी कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला

    नंतर उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला

    बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही.

    त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले.

    आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली

    चिठ्ठीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसीलदार आणि कलेक्टर जबाबदार असल्याचा उल्लेख

    वेळेवर पेमेंट न करणे तसेच कामाचा अतिरिक्त भार यामुळे केली आत्महत्या

  • 06 Jul 2021 04:39 PM (IST)

    मधमाश्या चावल्याने ठाण्यातील राबोडी येथील तरुणाचा मृत्यू

    ठाणे – मधमाश्या चावल्याने ठाण्यातील राबोडी येथील तरुणाचा मृत्यू

    – काल कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते

    त्यानंतर तरुणाचा झाला मृत्यू

    – मृत्यू झाल्यानंतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात केला राडा

    – घटनास्थळी जमाव जमल्याने MSF जवान आणि स्थानिक पोलिसांनी जमावाला पांगावले

  • 06 Jul 2021 12:49 PM (IST)

    मनसे नेते अमित ठाकरेंनी लोणकर कुटुंबियांची भेट घेतली

    मनसे नेते अमित ठाकरेंनी लोणकर कुटुंबियांची भेट घेतली

    कुटुंबाचं सात्नव यावेळी करण्यात आले

    पुण्यातील दौंड येथील केडगावमध्ये जाऊन अमित ठाकरेंनी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतली

  • 06 Jul 2021 10:51 AM (IST)

    नारायण राणे दिल्लीसाठी रवाना, केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

    नारायण राणे दिल्लीसाठी रवाना

    नारायण राणेंना दिल्लीहून जेपी नड्डांचा फोन

    केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

  • 06 Jul 2021 09:56 AM (IST)

    15 जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास नाशिककरांवर पाणी कपातीच संकट ओढवणार

    नाशिक

    – दिवसागणिक पावसाची प्रतीक्षा – 15 जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास नाशिककरांवर पाणी कपातीच संकट ओढवणार – धरणांमध्य अत्यल्प पाणीसाठा शिल्लक – बळीराजालाही पावसाची आतुरता – पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका

  • 06 Jul 2021 09:55 AM (IST)

    गोदावरीचे प्रदूषण रोखा, पर्यावरण प्रेमींचा मनपा प्रशासनाला इशारा

    नाशिक –

    – गोदावरीचे प्रदूषण रोखा, पर्यावरण प्रेमींचा मनपा प्रशासनाला इशारा – सांडपाणी,तसेच इतर कंपन्यांचे खराब पाणी गोदावरी पात्रात सोडलं जात असल्याने प्रदूषणात होतीये वाढ – पालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवण्यात दंग – गोदावरीचे प्रदूषण रोखण्यावर योग्य उपाय योजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पर्यावरण प्रेमींचा इशारा

  • 06 Jul 2021 09:53 AM (IST)

    नागपूरच्या जरीपटका भागातील अवनी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील दोन आरोपींना मध्यप्रदेशात अटक

    नागपूर

    नागपूरच्या जरीपटका भागातील अवनी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशात केली अटक

    दोन दरोडेखोर अद्यापही फरार आहे

    एका युवतीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने दरोडेखोरांना अवनी ज्वेलर्सवर दरोड्याची दिली होती टीप

    चारही दरोडेखोर उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती

    काल दुपारी अवनी ज्वेलर्स वर चार दरोडेखोरांनी टाकला होता दरोडा

  • 06 Jul 2021 08:17 AM (IST)

    नागपुरात पिस्तुलाच्या धाकावर भरदिवसा सराफा दुकान लुटले

    – नागपुरात पिस्तुलाच्या धाकावर भरदिवसा सराफा दुकान लुटले

    – चार लाखांची रोकडसह २५ ते ३० लाखांचा मुद्देमाल लंपास

    – जरीपटक्यातील वर्दळीच्या भागातली घटना

    – सराफाचे हाततोंड बांधून, मारहाण करुन दुकानात डांबले

    – गुन्हा दाखल पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरु

  • 06 Jul 2021 08:17 AM (IST)

    75 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदारा सह तलाठी जाळ्यात

    कोल्हापूर

    75 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदारा सह तलाठी जाळ्यात

    कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आजरा शहरात कारवाई

    नायब तहसीलदार संजय शेळके आणि तलाठी राहुल बंडगर या दोघांना अटक

    वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून देण्यासाठी केली होती दीड लाखाच्या लाचेची मागणी

    नायब तहसीलदारच लाचलुचपत च्या जाळ्यात अडकल्यान कोल्हापूर महसूल विभागात खळबळ

  • 06 Jul 2021 08:15 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत १६ जागांसाठी १०६ अर्ज दाखल

    – नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत १६ जागांसाठी १०६ अर्ज दाखल

    – पंचायत समिती पोटणीवडणूकीत ३१ जागांसाठी १६८ अर्ज दाखल

    – पोटणीवडणूकीत काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी, शिवसेना स्वबळावर

    – भाजपने विरोधीपक्षनेते अनिल बिधान यांचे तिकीट तापले

    – अनिल बिघान यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला

    – काँग्रेसने ज्योती राऊत यांना दिला डच्चू

  • 06 Jul 2021 08:14 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक

    नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक

    – भाजप आणि काँग्रेसनेही दिले ओबीसी उमेदवार

    – जिल्हा परिषदेच्या १६ जागांवर भाजपने दिले ओबीसी उमेदवार

    – काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या १० जागांवर ओबीसी उमेदवार

    – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने होत आहेत पोटणीवडणूक

    – घोषणा केल्याप्रमाणे भाजप, काँग्रेसनेही दिले ओबीसी उमेदवार

  • 06 Jul 2021 08:14 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जाणारा सोळा किलो गांजा पोलिसांनी केला जप्‍त

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जाणारा सोळा किलो गांजा पोलिसांनी केला जप्‍त

    पुणे बेंगलोर महामार्गावर वडगाव परिसरात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कारवाई

    गांजा विक्री साठी घेऊन येत असलेल्या प्रतीक यादव याला केली अटक

    यादव कडून 16 किलो गांजा सह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

  • 06 Jul 2021 08:12 AM (IST)

    शहराच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर आता या गावांच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्टेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आलीये

    पुणे

    शहराच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर आता या गावांच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्टेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आलीये

    या गावांमध्ये सुमारे २५० टन कचरा निर्माण होत असून, तो जिरविण्यासाठी महापालिकेला पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभारावे लागणार, त्यासाठी नियोजन सुरू

    घनकचरा विभागाने घेतला समाविष्ट गावातील कचऱ्याचा आढावा

    यासाठी लवकरच महापालिका व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार

  • 06 Jul 2021 08:11 AM (IST)

    महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांत वाहतूक सुरू करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएलएमने केली सुरू

    पुणे

    महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांत वाहतूक सुरू करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएलएमने केली सुरू

    त्याबाबतचा आराखडा तयार करून लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार

    नव्याने समाविष्ट २३ गावांपैकी १६ गावांत पीएमपीची वाहतूक सध्या सुरू

    मात्र, उर्वरित गावांतील वाहतूक सुरू करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू

    २३ गावांपैकी किमान तीन ठिकाणी पीएमपीची आगारे उभारण्याची गरज

    बस थांबे, आगारे, पास केंद्र यांच्या जागांसाठी पीएमपीएलएम पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करेल.

    त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधून पीएमपीएलएमसाठी काही जागांचे आरक्षण निश्चित करण्यास सांगितले जाईल

Published On - Jul 06,2021 6:34 AM

Follow us
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...