Maharashtra News LIVE Update | औरंगाबादच्या बाबा पेट्रोलपंप चौकात पाणीच पाणी

| Updated on: Jul 17, 2021 | 12:01 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | औरंगाबादच्या बाबा पेट्रोलपंप चौकात पाणीच पाणी
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 16 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jul 2021 09:25 PM (IST)

    औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप चौकात पाणीच पाणी

    औरंगाबाद :-

    औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप चौकात पाणीच पाणी

    मुसळधार पावसामुळे चौकात साचले तुफान पाणी

    मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरात ट्राफिक जॅम

    ट्राफिक जॅम मध्ये अडकले घरी जाणारे अनेक नागरिक

    गेल्या दोन तासांपासून धुवांधार पाऊस

  • 16 Jul 2021 09:24 PM (IST)

    दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

    पिंपरी चिंचवड :

    – मुंबईतील कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरण

    -मुख्य आरोपी लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्यला पाच दिवसांची पोलीस कोठडी

    -अन्य पाच आरोपींचा शोध सुरू.मुंबई आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू.

  • 16 Jul 2021 06:06 PM (IST)

    शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे जितेंद्र आव्हाडांची तक्रार

    शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळतोय. शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार विनोद घोसाळकर, सुनील प्रभू, खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती.

  • 16 Jul 2021 05:26 PM (IST)

    भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    इंदापूर येथील भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.  हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला.  प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत.

  • 16 Jul 2021 05:19 PM (IST)

    समृद्ध जीवन'च्या महेश मोतेवारने लपवून ठेवलेल्या महत्वाच्या कागदपत्रांचा साठा जप्त, सीआयडीची कारवाई

    पुणे: समृद्ध जीवन'च्या महेश मोतेवारने लपवून ठेवलेल्या महत्वाच्या कागदपत्रांचा दुसरा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) धायरी येथील सदनिकेत गुरूवारी छापा टाकण्यात आला.  समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्यासंदर्भातील आणखी महत्वाची कागदपत्रे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या आठवड्यात गुरूवारी धायरी येथे छापा टाकून जप्त केले. धायरी येथील एक सदनिका भरून कागदपत्रे "सीआयडी'ला मिळाली असून या कागदपत्रांचा पंचनामा करण्यासाठी पथकास दोन दिवस लागणार आहेत.

  • 16 Jul 2021 04:17 PM (IST)

    मुंबई एनसीबीचा घाटकोपरमध्ये छापा, ड्रग्स विक्रेत्यांना अटक

    मुंबई एनसीबीने घाटकोपर भागात छापा टाकला आणि ड्रग विक्रेत्यांना केली अटक

    त्यापैकी एक नायजेरियन यालाही अटक करण्यात आली

    अटक केलेल्या पेडलर्सकडून ड्रग्ज जप्त केली आहेत

    पुढील तपास मात्र शुरू

  • 16 Jul 2021 04:10 PM (IST)

    लोणावळ्यात जमावबंदी लागू

    लोणावळ्यात कलम 144 लागू, पर्यटकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

  • 16 Jul 2021 03:29 PM (IST)

    ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस

    ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. चार्टर्ड विमान वापरावरुन ही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • 16 Jul 2021 03:27 PM (IST)

    शेतकऱ्यांना दिलासा, पीक विमा भरण्यास 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

    शेतकऱ्यांना दिलासा, पीक विमा भरण्यास 23 जुलैपर्यंत मुदत

    पीक विमा भरण्यास 15 जुलै अंतिम तारीख होती. मात्र अनेक शेतकऱ्यांचा विमा न भरला गेल्याने 8 दिवसांची मुदतवाढ

    आता 23 जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार

    उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांची माहिती

  • 16 Jul 2021 12:51 PM (IST)

    नाशकात काही संघटनांच्या दबावामुळे आंतरधर्मीय विवाह सोहळा रद्द

    नाशिक -

    काही संघटनांच्या दबावामुळे आंतरधर्मीय विवाह सोहळा रद्द

    18 तारखेला होणार होता विवाह

    हिंदू मुलगी आणि मस्लिम मुलाचा होणार होता विवाह

    परिवाराच्या संमतीने होणार होता विवाह सोहळा

    मात्र काही संघटनांच्या आणि समाजाच्या विराधामुळे परिवाराने रद्द केला होता विवाह सोहळा

    आमदार बच्चू कडू पीडित कुटुंबियांच्या भेटीला येणार

    बच्चू कडू परिवाराच्या पाठीशी राहणार उभे?

  • 16 Jul 2021 12:49 PM (IST)

    मराठा आरक्षण लढ्याच्या समर्थनार्थ मराठा आक्रोश मोर्चाची पत्रकार परिषद

    नवी मुंबई -

    मराठा आरक्षण लढ्याच्या समर्थनार्थ मराठा आक्रोश मोर्चाची पत्रकार परिषद

    18 जुलै रोजी नवी मुंबई येथून काढणार बाईक रॅली

    सकाळी 9 वाजता ऐरोली ते माथाडी भवन वाशी पर्यंत निघणार बाईक रॅली

    मराठा आरक्षण देण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बाईक रॅली

    4 जुलै रोजी सोलापुरात सुध्दा काढण्यात आली होती बाईक रॅली

  • 16 Jul 2021 12:02 PM (IST)

    मुक्ताईनगरात मेहुण्याने शालकाचा‌ कुर्‍हाडीने खून केला

    मुक्ताईनगर

    मेहुण्याने शालकाचा‌ कुर्‍हाडीने खून केल्याची घटना

    मुक्ताईनगर शहरात रात्री मेहुण्याने शालकाचा‌ कुर्‍हाडीने खून केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आलीये

    विशाल‌ वामन ठोसरे मयत झालेल्या शालकाचे नाव आहे

    घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ ,पोलीस दाखल पोलिसांचा तपास सुरू

    संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून फरार असल्याने याचा शोध सुरू आहे

  • 16 Jul 2021 08:28 AM (IST)

    वसई-विरारमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच

    वसई -

    वसई-विरारमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच

    संपूर्ण आभाळ काळेकुट्ट झाले आहे

    संततधार पडणाऱ्या पावसाने सध्यातरी शहरातील सकल भागात पाणी साचले नाही

  • 16 Jul 2021 08:12 AM (IST)

    पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते सील

    औरंगाबाद -

    पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते सील

    पंकजा मुंडे यांना मोठा झटका

    ईपीएफओ विभागाची वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई

    पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकल्यामुळे केले बँक खाते सील

    पीएफचे तब्बल 92 लाख केले वसूल

    ईपीएफओ च्या औरंगाबाद कार्यालयाने केली मोठी कारवाई

  • 16 Jul 2021 07:40 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तिन दिवस नाशिक दौऱ्यावर

    नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तिन दिवस नाशिक दौऱ्यावर

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका - ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आवाहन

    पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी

  • 16 Jul 2021 07:23 AM (IST)

    रत्नागिरीत पहाटेपासून पावसाची विश्रांती

    रत्नागिरी- पहाटेपासून पावसाची विश्रांती

    रात्री देखील सरींवर पाऊस

    हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला दिला रेड अलर्ट

    1 जून पासून आज पर्यंत पावसानं ओलांडली 1500 मिलिमीटर ची सरासरी

  • 16 Jul 2021 06:55 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

    अहमदनगर

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

    टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी छिंदमसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल

    या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत

    या प्रकरणी टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे याने दिली फिर्याद

  • 16 Jul 2021 06:51 AM (IST)

    मुंबईत काल रात्रीपासून थांबून थांबून पाऊस

    मुंबईत काल रात्रीपासून थांबून थांबून पाऊस पडत आहे.

    त्यामुळेच मुंबई उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी जमण्यास सुरुवात झाली आहे.

    सायन पूर्व या भागामध्ये ,आपण पाहू शकता कि इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले की जणू या भागाला नदीचे स्वरूप आले आहे.

    आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा आता पाणी घुसन्यात सुरवात झाली आहे तर वाहनांचे टायर आता पाण्याखाली गेलेत.

    मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे मान्सून कुठे ना कुठे मुंबईकरांसाठी आता संघर्ष बनत चालला आहे.

  • 16 Jul 2021 06:51 AM (IST)

    वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अल्पवयीन मुलांजवळ पिस्टल, अकोट शहरात खळबळ

    अकोला जिल्हातल्या अकोट मधील घटना

    वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अल्पवयीन मुलांजवळ पिस्टल निदर्शनास आल्यानं अकोट शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे

    मात्र, ही पिस्टल असली अथवा नकली आहे का याचा तपास अकोट शहर पोलीस करत आहे

    सद्यस्थिती पोलिसांनी या अल्पवयीन मुलांच्या वडिलांची चौकशी सुरू केली आहे

    तर मुले फरार झाली आहेत

  • 16 Jul 2021 06:50 AM (IST)

    वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच

    वसई-विरार

    वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच

    दोन दिवसांपासून उघडझाप करीत रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे

    संततधार पडणाऱ्या पावसाने शहरातील कोणत्याच सकल भागात पाणी साचले नाही

    मात्र ग्रामीण भागातील शेतक-यांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे

    विरार पूर्व मनवेलपाडा विवा जहांगीड परिसरातील रात्री 12 वाजताची ही दृश्य आहेत

Published On - Jul 16,2021 6:44 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.