Maharashtra News LIVE Update | अभिनेत्री मीरा चोप्राने सौम्या टंडन हिनेदेखील बनवले लसीकरणासाठी बोगस ओळखपत्र

| Updated on: Jun 04, 2021 | 12:11 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | अभिनेत्री मीरा चोप्राने सौम्या टंडन हिनेदेखील बनवले लसीकरणासाठी बोगस ओळखपत्र
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jun 2021 09:06 PM (IST)

    अभिनेत्री मीरा चोप्राने सौम्या टंडन हिनेदेखील बनवले लसीकरणासाठी बोगस ओळखपत्र

    ठाणे  – अभिनेत्री मीरा चोप्राने पालिका हद्दीत पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रामध्ये बनावट ओळखपत्राच्या आधारावर लस घेतल्यानंतर मोठा गौप्यस्फोट

    -अभिनेत्री सौम्या टंडन हिनेदेखील बनवले होते बोगस ओळखपत्र

    – लसी घेण्याकरता बनवले होते ओळखपत्र

    – ठाणे मनपाच्या चौकशी अहवालात झाला खुलासा

    – अभिनेत्री सौम्या टंडनचे नाव चौकशी अहवालात समोर

    -आतापर्यंत 21 बनावट ओळखपत्रे करून 15 जणांचे झाले बेकायदेशीर लसीकरण

    -चौकशी समितीच्या अहवालात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

    – 21 श्रीमंत तरुण आणि तरुणींचे बनावट ओळखपत्र तयार करून 15 जणांना अशा प्रकारे लस देण्यात आली असल्याची माहिती या समितीने उजेडात आणली आहे

  • 03 Jun 2021 07:31 PM (IST)

    शहापूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी, सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची जोरदार सुरुवात

    शहापूर : शहापूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी, सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची जोरदार सुरुवात, गेल्या एक तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग, हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

  • 03 Jun 2021 07:29 PM (IST)

    ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

    चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू. सुरेश रामटेके (55) आणि अश्विनी मेश्राम (16) अशी मृतकांची नावं असून हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गावाजवळ गेले होते, संध्याकाळी 5 च्या दरम्यान विजेच्या कडकडाट आणि पाऊस झाला, याच दरम्यान वीज पडून या दोघांचा मृत्यू झाला

  • 03 Jun 2021 07:01 PM (IST)

    नंदुरबारमध्ये वादळी-वाऱ्यासह पाऊस

    नंदूरबार :- हवामान खात्याकडून येणाऱ्या तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळपासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं. मात्र आता सायंकाळी जोरदार वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 03 Jun 2021 06:59 PM (IST)

    गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची बदली

    गोंदिया : गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची उपसचिव बहुजन समाज व इतर मागासवर्ग विकास विभाग मंत्रालय या पदावर करण्यात आली बदली तर अतिरिक्त जिल्हाधीकारी राजेश खवले यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा देण्यात आला कारभार

  • 03 Jun 2021 04:32 PM (IST)

    कोल्हापूर : पावसामुळे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

    कोल्हापूर :

    पावसामुळे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

    गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील घटना

    मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही

    कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तासाभरात पासून कोसळतोय मुसळधार पाऊस

  • 03 Jun 2021 04:28 PM (IST)

    राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये शिथिलता, मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

    राज्यात पाच टप्प्यात अनलॉक होणार, 18 जिल्ह्यांमध्ये शिथिलता, मुंबईत सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता नाही. मुंबई लोकलबाबत अध्याप निर्णय नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा, पहिल्या टप्प्यात मॉल-दुकानं सुरु होणार, मुंबई सध्या दुसऱ्या टप्प्यावर

    लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्याच्या आत असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.

    पहिला टप्पा -

    ५ टक्के पॉझिटीवेहीटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे. तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही, लोकल तुर्तास बंद

    पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.

    पहिल्या टप्प्यातील जिल्हे - भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरौली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक

  • 03 Jun 2021 04:22 PM (IST)

    नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर गुंडांकडून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण

    नागपूर :

    आशिष ऑटोमोबाईल, सोमलवाडा येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गुंडांकडून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण

    पेट्रोल भरताना झालेल्या वादातून हल्ला, घटना CCTV मध्ये कैद..

    चालू ने पंप कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्न, एकाच गाडीवर आलेल्या तिघांनी केला हल्ला..

    नागपूर वर्धा महामार्ग असलेल्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या पंप वरील घटना

  • 03 Jun 2021 04:10 PM (IST)

    राज्यात बारावीच्या परीक्षा होणार नाही, शिक्षण खात्याचा प्रस्ताव अखेर मंजूर

    राज्यातील बारावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली आहे, राज्याच्या शिक्षण खात्याने याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

  • 03 Jun 2021 03:20 PM (IST)

    सात वर्षांपूर्वी साहेबांना गमावलं, दोन वर्षांपूर्वी मी पराभूत झाले : पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांच्या भाषणातील काही मुद्दे :

    दरवर्षी येऊन आपण गडावरून प्रेरणा घेऊन जातो,

    समोर बसलेल्या 40-50 नाही समाजासमोर मी बोलतीये,

    मी उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही

    या मंत्र्यावर आपण भविष्याची वाटचाल करायचीये,

    4 तारखेला इथं अलोट जनसागर लोटला होता

    मुंडे साहेबांची शपथ घेताच समाज शांत झाला,

    जो माणूस जिवंत नाही त्याची शपथ घेताच समाज शांत झाला. एवढा माझा मोठा मायेचा पदर आहे.

    7 वर्षापुवी साहेबांना गमावलं,

    दोन वर्षापुर्वी मी पराभूत झाले, मात्र समाधीवर नतमस्तक होऊन समाजाला सोडणार यासाठी काम सुरू केलन

    कोरोनाच्या काळात काम सुरू केलं धान्य वाटप सुरू केलंय....

    पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष , केंद्रीय मंत्र्यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या..।

    मराठा समाजाची घोर निराशा झालीये, मुंडे साहेब म्हटले होते भगवान गडावर

    मराठा समाजाला आरक्षण देऊ मुंडे साहेब असते तर आरक्षण मिळालं असतं,

    कोरोना काळात लोकांचे हाल झाले,

    कोरोनाची तिसरी लाट येणार आणि लहानं मुलं बाधित होणार त्यामुळे आता नियोजन करण्याची गरजंय,

    कोरोनाचे नियम पाळून

    मी गावागावात जाणार, लोकांना सांगणार खरी लढाई लढणार आहे,

    गोपीनाथ मुंडेंचा विचार घेऊन काम करायचंय,

    आमचं ठरलंचंय

  • 03 Jun 2021 02:30 PM (IST)

    केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा, पालघरमधल्या वसईतून पाहणीला सुरुवात

    तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या वसईतील शेतक-यांची आज केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली आहे.. वसई ताल्युक्यातील वटार गावातील विल्सन कोरिया यांच्या शेतात झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाने केली आहे. केंद्रीय पथकाचा आज पालघर जिल्ह्यातील पहिलाच दौरा असून त्याची सुरवात त्यांनी वसईतून केली आहे.

    वसई ताल्युक्यातील वटार, अर्नाळा, सह आजूबाजूच्या परिसरात चक्रीवादलाचा फटका मोठ्याप्रमाणात बसला आहे. यात केळी बाग, सुपारी चे झाड, फुल बागा याचे मोठे नुकसान झाले आहे. विल्सन कोरिया या एकट्या शेतक-याचे 1000 च्या वर केळीची झाडं नेस्तनाबूत झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी करून, केंद्रीय पथक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह अन्य जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करून सरकारला अहवाल देणार आहे.

  • 03 Jun 2021 12:59 PM (IST)

    मुंडे कुटुंबियांकडून गोपीनाथ गडावर अभिवादन

    मुंडे कुटुंबियांकडून गोपीनाथ गडावर अभिवादन

    महादेव जानकर, सुजय विखे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती

    थोड्याच वेळात पंकजा मुंडे फेसबुकच्या माध्यमातून साधणार संवाद

    पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष

  • 03 Jun 2021 12:50 PM (IST)

    नवी मुंबई मनपा निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार- नाना पटोले

    नवी मुंबई मनपा निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार, अशी घोषणा नाना पटोले यांनी केलीय. नाना पटोले यांच्या हस्ते नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन पार पडलं. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  • 03 Jun 2021 12:28 PM (IST)

    गोपीनाथराव सामान्य माणसाला घडविणारे महानायक होते, महादेव जानकर लोकनेत्याबद्दल बोलताना भावूक

    गोपीनाथराव सामान्य माणसाला घडविणारे महानायक होते

    मी पंकजा मुंडेंच्या सुखाच्या ऐवजी दुखाःत मी जास्त सहभागी आहे,

    बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो तसा मी झालो,

    मुंडे साहेब आज असते सत्तेत विभाजन झालं नसतं, मुंडे साहेब बाप माणूस होते गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली,

    रासप ही एनडीए सोबत आहे...ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये,

    ओबीसीनं या राज्याची सत्ता हाती घ्यावी, सत्तेत ओबीसी असल्याशिवाय ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत ...ओबीसींनो सत्तेय या ही आमची भूमिका आहे,

    सगळ्या जातीला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे मात्र ओबीसींच्या आरक्षणाला हात लागता कामा नये ...

    गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायली मिळाली असती

  • 03 Jun 2021 12:04 PM (IST)

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न, आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न ..

    20 जुलै च्या आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले...

    महापुजेसाठी शासनाकडून परवानगीची मागणी....

    पादुका देव भेटी साठी , 18 नैवद्य साठी शासनाने मंदिर उघडण्यासाठी परवानगी ध्यावी तसेच प्रदक्षिणा मार्गावर रथोत्सवसाठी देखील कोरोनाचे नियम पाळुन परवानगीची मागणी केली आहे.....

    शासन परवानगी देईल त्या पालखी सोहळा आणि वारकरी यांचे स्वागत मंदिर समिती करणार... वारी कशा स्वरुपात होणार याचा निर्णय शासन घेणार....

    मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माहिती...

  • 03 Jun 2021 11:44 AM (IST)

    आषाढी यात्रा संदर्भात आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक, राज्यातील वारकऱ्यांचं लक्ष

    यंदाच्या आषाढी यात्री होते की नाही याबाबत अजून ही शासंकता आहे...

    वारकरी पायी वारीवरती ठाम आहेत. या संदर्भात आज दुपारी 12 वाजता पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक...

    बैठकीत यात्रेसंदर्भात चर्चा करून राज्य सरकारला वारी संदर्भात अहवाल सादर केला जाणार...

    या बैठकीकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे...

  • 03 Jun 2021 11:32 AM (IST)

    चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनाथ मुलांना साहित्य वाटप

    -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनाथ मुलांना साहित्य वाटप

    - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन

    -लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 7 वी पुण्यतिथीनिमित्त, राज्यभरात कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमांचं आयोजन

  • 03 Jun 2021 11:27 AM (IST)

    कोरोनामुळे ठाणे महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट, पण आयुक्तांच्या बंगल्याच्या कोट्यवधीचा खर्च, मनसेचा आरोप

    कोरोनामुळे ठाणे महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर कोट्यवधीचा खर्च करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.

    जवळपास २ कोटीच्या आसपास खर्च केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यातच स्वामिंग पूल साठी मोठा खर्च केल्याचे पाचंगे यांनी आरोप केले आहे आयुक्त विजय सिंघल यांनी पदभार स्विकारला.तेव्हा आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणासाठी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल ५० लाखांची निविदा प्रक्रिया राबवुन आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीचा घाट घालण्यात आला.

    अडीच-तीन महिन्यात सिंघल यांची बदली झाली. त्यानंतर जून २०२० अखेरीस ठामपा आयुक्तपदी डॉ.विपीन शर्मा विराजमान झाले.डॉ.विपीन शर्मा यांनी पदभार स्विकारला त्यांनतर आता ते या ठिकाणी राहत आहे.

  • 03 Jun 2021 11:26 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या गेटवर राष्ट्रवादीचे सत्ताधारी भाजपविरोधात आंदोलन

    पुणे महानगरपालिकेच्या भाजपाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी नियोजनशुन्य पध्दतीने रस्ते खोदाईच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी आक्रमक,

    - तसेच पुणे नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाला ७वा वेतन आयोग लागू करणेस टाळाटाळ करणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या विरोधात धरणे आंदोलन,

    - महापालिकेच्या गेटवर राष्ट्रवादीचे आंदोलन

  • 03 Jun 2021 11:25 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल, कोविड सेंटरची करणार पाहणी

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. इथल्या कोविड सेंटरची पाहणी करणार आहेत.

  • 03 Jun 2021 10:29 AM (IST)

    भगव्या झेंड्यावर पालथा तांब्या (कलश) कशासाठी...?, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडचं CM ना पत्र

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उभारल्या जाणाऱ्या गुढीवर भगव्या झेंड्यावर पालथा तांब्या (कलश) कशासाठी...?, असा सवाल करण्यात आलाय.

    शिवराज्याभिषेक दिन भगवा ध्वज उभारून साजरा करावा ही अभिनंदनीय बाब आहे, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला शिवरायांचा एकपाती भगवा ध्वज मान्य आहे. परंतु त्यावर 'उलटा कलश मांडण्यास, गाठी व आंब्याची डहाळी याला आमचा विरोध आहे.' कारण शिवचरित्राच्या समकालीन साहित्यात असा कुठेही उल्लेख नाही. हा शिवचरित्र विकृतीकरणाचा प्रयत्न आहे. शासकीय कार्यालयात धार्मिक प्रतिकांना बंदी असताना सर्वधर्मसमभावी शिवछत्रपतींच्या नावाआडून ही धार्मिक प्रतिके लादून शिवछत्रपतींच्या सर्वधर्मसमभावी भूमिकेचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं शासनाने दि. ०१ जून २०२१ च्या या शासननिर्णयात बदल (दुरूस्ती) करून तात्काळ नवीन आदेश काढावा. ह्या चुका आध्यादेश संभाजी ब्रिगेड कदापीही सहन करणार नाही.

  • 03 Jun 2021 10:22 AM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

    ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन

    - जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन,

    - महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भाजपचे आंदोलन

    - महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 03 Jun 2021 10:20 AM (IST)

    नगर शहरातील बाजारपेठा लवकरच सुरू करणार, जिल्हाधिकाऱ्यांचं व्यापाऱ्यांना आश्वासन

    नगर शहरातील बाजारपेठा लवकरच सुरू करणार,

    जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले बैठकीत व्यापाऱ्यांना अश्वासन,

    प्रशासनाने व्यापाऱ्यांनाची बैठक घेऊन केले नियोजन

  • 03 Jun 2021 09:32 AM (IST)

    कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 305 उमेदवारी अर्ज दाखल

    कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 305 उमेदवारी अर्ज दाखल

    छाननीत 22 अर्ज अपात्र दुबार 70 अर्ज वगळून पात्र 213 उमेदवारी अर्ज शिल्लक

  • 03 Jun 2021 09:19 AM (IST)

    बुलडाण्यात कोरोना महामारीतही लाचखोरी जोमात, महसूल विभाग सर्वात पुढे

    जिल्ह्यात कोरोना महामारीतही लाचखोरी जोमात, यामध्ये महसूल विभाग सर्वात पुढे,

    लाचलुचपत विभागाने मागील 5 महिन्यात 8 कारवाया केल्या, असून 9 जणांना गजाआड केलंय,

    तर मागील वर्षी 14 कारवाया झाल्या होत्या, शासकीय कामकाज कमी असल्याने लाचखोर सक्रिय झाले...

  • 03 Jun 2021 08:31 AM (IST)

    गोकुळचे नूतन संचालक आज घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

    गोकुळचे नूतन संचालक आज घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

    गोकुळ दूध संघातील दणदणीत विजयानंतर पहिल्यांदाच होतेय भेट

    पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी च्या माध्यमातून लढली गेली होती गोकुळ दूध संघाची निवडणूक

    महाविकास आघाडी ला 21 पैकी तब्बल 17 जागांवर मिळालय यश

    दूध संघावरील घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं भेटीचे निमंत्रण

    आजच्या भेटीवेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील,खासदार संजय मंडलिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर देखील राहणार उपस्थित

  • 03 Jun 2021 08:30 AM (IST)

    चक्रीवादळग्रस्त भागात दौरा करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल, रायगडपासून पाहणीची सुरुवात

    चक्रीवादळग्रस्त भागात दौरा करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल

    नुकसानग्रस्त भागांची करणार पाहणी रायगड पासून पाहणीची सुरुवात

    रायगड मध्ये सर्वात जास्त नुकसान

    आजपासून पाहणीला सुरुवात

    ५ जूनला रत्नागिरी आणि ६ जूनला सिंधुदुर्ग ला पथक करणार पाहणी

    पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौरा आणि मदतीवर टीका झाल्यानंतर केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल

  • 03 Jun 2021 08:23 AM (IST)

    हनी ट्रॅपचे वाढते गुन्हे पोलिसांसमोर नवं आव्हान, नाशिक ग्रामीण पोलिसांची विशेष मोहीम

    हनी ट्रॅपचे वाढते गुन्हे पोलिसांसमोर नवीन आव्हान

    हनी ट्रेपिंगचे गुन्हे टाळण्यासाठी ग्रामीण पोलिसांची विशेष मोहीम

    अनोळखी महिलांशी चॅटिंग ठरतेय तरुणांसाठी धोकादायक

    हनी ट्रेपिंग विरोधात जनजागृती करून लोकांना सतर्क करणार

    ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची माहिती

  • 03 Jun 2021 08:09 AM (IST)

    पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा कोल्हापुरातील अनेक घरांवर हल्ला, प्रापंचिक साहित्यासह वाहनांची तोडफोड

    पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा घरांवर हल्ला

    हल्ल्यात प्रापंचिक साहित्याचे केलं नुकसान वाहनांचीही तोडफोड

    शहरातील तीन बत्ती चौक परिसरातील घटना

    हल्ल्यात दोन महिलांसह तिघे जखमी

    दहा ते पंधरा हल्लेखोरांनी बॅट,स्टंप, दगड आणि विटांनी केला हल्ला

    घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण

  • 03 Jun 2021 08:06 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीला भोसरी MIDC पोलिसांनी केले जेरबंद

    पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीला भोसरी MIDC पोलिसांनी केले जेरबंद

    -त्यांच्याकडून 16 लाखांच्या एकूण 24 दुचाकी आणि 4 वाहन हस्तगत

    -यामध्ये बुलेटसह इतर महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

    -याप्रकरणी आकाश केरनाथ बधे, विलास बाळशीराम मोरे, अक्षय अभिमान जाधव, ऋषिकेश शांताराम पिंगळे यांना अटक

  • 03 Jun 2021 08:05 AM (IST)

    नाशिक स्मार्ट बस सेवा सुरु होण्याच्या हालचाली पुन्हा एकदा गतिमान

    स्मार्ट बस सेवा सुरू होण्याच्या हालचाली पुन्हा एकदा गतिमान

    कोरोनाची लाट ओसरताच स्मार्ट बसच्या भाडे दरावर शिक्कामोर्तब

    पहिल्या टप्प्यात 146 मार्गांवर धावणार स्मार्ट बस

    प्रत्येक 2 किलोमीटर साठी प्रतिव्यक्ती 10 रुपये दर

    तर 50 किलोमीटर साठी प्रतिव्यक्ती 65 रुपये दर

    कोरोना च्या संभावित तिसऱ्या लाटे पूर्वी बस सेवा सुरू करण्याचा घाट

  • 03 Jun 2021 07:48 AM (IST)

    फलोत्पादन क्षेत्र विकासमध्ये केळी फळासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करा, रक्षा खडसेंची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी

    फलोत्पादन क्षेत्र विकास मध्ये केळी फळासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याची खासदार रक्षा खडसेंची केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे मागणी...

  • 03 Jun 2021 07:13 AM (IST)

    मुंबईतील दादर परिसरात पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी, हजारो लीटर पाणी वाया

    मुंबई :- दादरच्या माहेर हॉलच्या गल्लीतील पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी

    पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

    पाईपलाईन जवळपास संध्याकाळी आठच्या दरम्यान फुटली होती.

    पालिकेकडून त्या पाईपलाईनचा पाण्याचा प्रवाह बंद

    आज सकाळी पाईपलाईन दुरुस्ती करण्याची शक्यता

  • 03 Jun 2021 07:11 AM (IST)

    कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात जोरदार पावासाचा इशारा

    मुंबई : पुढच्या काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात जोरदार पावासाचा इशारा

    वादळी वाऱ्यासह पावासाचा दिला इशारा

    हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

Published On - Jun 03,2021 9:28 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.