Maharashtra News LIVE Update | मर्द असाल तर समोरुन या, मागून खंजीर चालवू नका, तलवार आमच्याकडेही आहे : संजय राऊत

| Updated on: Oct 17, 2021 | 12:23 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मर्द असाल तर समोरुन या, मागून खंजीर चालवू नका, तलवार आमच्याकडेही आहे : संजय राऊत
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Oct 2021 07:52 PM (IST)

    मर्द असाल तर समोरुन या, मागून खंजीर चालवू नका, तलवार आमच्याकडेही आहे : संजय राऊत

    संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :

    ज्यांच्या मुळे मोहन भाईंना जीव द्यावा लागला त्या रावणाचा अंत करू शिवसेनेचा झेंडा कलाबेन , अभिनव च्या हातात ही निवडणूक नाही तर सत्य असत्य पाप पुण्याची लढाई मी डेलकर कुटूंबियांचे अश्रू पाहिले केंद्रीय रेलवे मंत्री आले आहेत त्यांचे रूळ आम्ही 30 तारखेला उखडून टाकू डेलकर यांचे अश्रू तुम्हाला खतम करून टाकतील तुमचे हिंदुत्व खोटे आहे, तुम्ही एका महिलेचे पत्नीचे अश्रुं खोटे आहेत सांगता रावणाचा अंत होतो रामाचा नाही सर्व अग्निपरीक्षा देऊ आम्ही जिंकायला उभे आहोत मोहन भाई जरी फोटोत आहेत तरी ते अमच्यातच आहे मोदी अश्रू काढतात ते खोटे आहेत ? दादरा नगर हवेली ची जनता तुम्हाला 30 तारखेला रडवणार शिवसेनेचा झेंडाही आहे दांडा पण आहे कमी पडलो तर महाराष्ट्रतून आणू ! प्रफुल्ल खोडा कुठे आहेत ? कोणत्या हॉस्पिटलमध्ये ? तुमचा फैसला करू 30 तारखेला बाळासाहेब आमचे नेते होते आम्ही कुणाला घाबरत नाही प्रफुल्ल भाई आता तुम्हाला घाबरावे लागेल मोहन भाईमध्ये लढण्याची ऊर्जा होती. आपल्या माणसं बद्दल प्रेम होते. तो स्वतःला संपवतो तर विचार करा त्यांना किती छळलं असेल मोहन भाईंचे बलिदान व्यर्थ नाही जाणार..एक मोहन भाई गेले पण लाखो मोहन तयार करून गेले प्रशासकाने दिलेले जखम भरण्यासाठी आलो आहे मी उद्धवजींना विनंती केली की तुम्हीही इथे प्रचाराला या हा पूर्ण प्रदेश भगवा होईल त्याची जबाबदारी अभिनववर सोपवली आहे मर्द असाल तर समोरून या मागून खंजीर चालवू नका, तलवार आमच्याकडेही आहे या प्रादेशातल्या अहंकाराला संपवायचे आहे मोहन भाईंचा स्वभाव शिवसैनिक सारखा होता, त्यांना सांगितले की तुम्ही शिवसेनेत हवे होता जे मोहन भाईंचे गुन्हेगार अहेत त्यांना सांगतो जास्त उडू नका महाराष्ट्रात एसआयटीचे काम सुरू आहे, कोणी नाही सुटणार, त्यांच्या गुन्हेगारांसाठी फाशीचा फास बनतोच तारखेला कलाबेन यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय कोणी रोखू नाही शकणार, इथून शिवसेना गुजरात आणि देशात जाईल… ही लढाई आहे सत्य सत्याची, न्याय अन्यायाची

    ही लढाई एक आई, मुलगा, पत्नी आणि आपल्या सगळ्यांची

    नेहमी विजय सत्याचा होतो प्रचंड विजय हीच खरी श्रद्धांजली असेल मोहन भाईंना आणि धडा असेल त्या क्रूर तानाशाहचा ! डेलकर कुटुंबाकडे डोळे काढून पाहिले तर पूर्ण शिवसेना म्हणेल आम्हीही आहोत मोहन डेलकर आमची कलाबेन दिल्लीत येणार जय महाराष्ट्र, जय सिल्वासा !

  • 16 Oct 2021 07:44 PM (IST)

    हिंगोलीत काही भागात जोरदार पावसाला सुरुवात

    हिंगोली- जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसला सुरुवात

    काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसला सुरुवात

    कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत

  • 16 Oct 2021 07:16 PM (IST)

    आमचं शेंडी, जानवाचं हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व जगजाहीर : उद्धव ठाकरे

    मुंबईत वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम, प्रबोधनकारांच्या लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन :

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

    मला काय बोलायचं ते मी काल बोललो लोकशाहीत मत हे महत्त्वाचं माझा पक्षच 'पितृ'पक्ष, माझ्या वडिलांनी तो निर्माण केला माझे आजोबा नास्तिक नव्हते. ते देवीची पुजा करायचे. त्यांनी ढोंगावर लात मारली. टीका केल्यानंतर घरावर कचरा टाकण्यासारके प्रकार त्यांनी सोसले बाळासाहेबांच्या आईची इच्छा होती की, माझ्या वडिलांनी सरकारी नोकरी करावी आज त्या आजीला काय वाटत असेल कोणी कुठे जन्म घ्यायचा हे घडणारं कुणीतरी घडवत असतं आपण शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय. तिथेही प्रबोधनकार हवे आहेत. आमचं हिंदुत्व जगजाहीर आहे. शेंडी, जानवाचं हिंदुत्व नाही काही दिवसांपूर्वी नगरला धर्मांतराची सभा होती. बाळासाहेबांनी जाहीर सभेत एकाला हिंदू धर्मात घेतलं होतं त्यावेळी बाळासाहेबांनी खूप छान भाषण केलं होतं कर्मकांड करण्यापेक्षा भारत माता की जय बोल, तू हिंदू झालास, असं बाळासाहेब बोलले होते प्रत्येकाला धर्म आहे, पण प्रत्येकजण आधी माणूस म्हणून जन्माला येतो. धर्माचा अभिमान जरुर करा, तो अभिमान घरात ठेवा. घराबाहेर पडताना माझा देश हा धर्म ठेवा.

  • 16 Oct 2021 07:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 84 नवे कोरोनाबाधित, 179 जणांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात ८४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १७९ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२. -१७१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३०६९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०७८. - एकूण मृत्यू -९०६२. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९२९२९. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४३६०.

  • 16 Oct 2021 06:17 PM (IST)

    मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधींची भेट घेतली

    मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी घेतली राहुल गांधींची भेट

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची भेट

    28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर येण्याचे निमंत्रण

    राहुल गांधी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता

  • 16 Oct 2021 06:09 PM (IST)

    'साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती', फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवर टोला

    "द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती", अशी टीका फडणवीस यांनी केली.

  • 16 Oct 2021 05:30 PM (IST)

    डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती नाजूक, एम्स रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु

    नवी दिल्ली :

    डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती नाजूक

    सिंग यांना पुन्हा ताप आल्याची माहिती

    एम्सकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर नाही

    89 वर्षीय सिंग सध्या एम्स रुग्णालयातील आयसीयूमध्ये

  • 16 Oct 2021 04:25 PM (IST)

    लोकप्रतिनिधींचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय : उदयनराजे भोसले

    सातारा :

    खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    लोकप्रतिनिधींचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय

    यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे

    हे लोकशाहीला मारक आहे

    काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात

    त्यांना निवडून आणतात, त्यांच्यामार्फत दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न होतोय

    असंच चालू राहील तर जंगलराज येईल

    लोकप्रतिनिधींनी ओळखावं, उद्या तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते

  • 16 Oct 2021 03:55 PM (IST)

    सर्वसामान्य जनतेबाबत केंद्र सरकारला आस्था नाही : शरद पवार

    शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    -बऱ्याच वर्षांनंतर पिंपरी चिंचवड मध्ये आलोय

    -यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं, याठिकाच्या नागरिकांनी सहा वेळा मला लोकसभेत पाठवलं, त्यावेळी जानं-येनं जास्त होतं. मात्र जबाबदाऱ्या बदलल्या. त्यामुळे येनं-जानं कमी झालं

    -आजची परिस्थिती खूप बदलली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वाढलेत, मात्र केंद्र सरकारला काही फिकीर नाही

    -पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका, आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी केंद्र सरकारने किंमती कमी केल्या नाहीत

    -पेट्रोल हे उत्पन्नाचे साधन असा दृष्टिकोन केंद्र सरकारचा आहे

    -यापूर्वी मनमोहन सिंग सरकारच्या काळात दरवाढ झाली तर 10 दिवस संसद बंद पाडली, आता मात्र दररोज दरवाढ होत आहे

    -कोळशाच्या किमती कमी करण्याचा आग्रह राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलाय,राज्य सरकार कडे 3 हजार कोटी थकबाकी असल्याचं केंद्रीय मंत्री सांगत आहेत आणि त्यामुळे कोळसा संकट निर्माण झालाय असं सांगत आहेत, पण केवळ 10 ते 12 दिवस उशीर झाला तर आरोप करतात आणि त्यासाठी राज्य सरकार ला दोषी धोरण बरोबर नाही

    -केंद्राकडे राज्याची जीएसटी थकबाकी आहे मात्र त्यावर कोण बोलायला तयार नाही

    -आजचे केंद्र सरकार भाजप सोडून इतर सरकार वर आरोप करते,किंवा त्यांना सहानुभूतीने विचार करत नाही

    -केंद्र सरकार कडून विविध यंत्रणाच वापर मोठया प्रमाणात करत,विरोधल संस्था यांचावर कारवाई साठी करत आहेत

    -या पूर्वी सी बी आय ला राज्यात कारवाई करायची असेल तर राज्य सरकार ची परवानगी लागायची, मात्र आता बाहेर च्या राज्यात गुन्हा घडलाय आणि त्याचे धागेदोरे महाराष्ट्र राज्यात आहेत असं सांगत कारवाई केली जात आहे...!

    -परमवीर सिंग यांच्या तक्रारींवर आम्ही अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला...! पण ज्या परमवीर सिंग यांनी तक्रार केली, त्यावर अनेक गुन्हे दाखल झाले ते फरार आहेत, त्या बाबत केंद्रकाडे विचारणा केली मदत करा पण तिथे ही मदत केली जात नाही.-ज्या पोलीस आयुक्त यांनी आरोप केलाय त्याचा तपास लागत नाही

    -जे सरकार केंद्र सरकारच्या विचाराचे नाही त्यांना अस्थिर करण्यासाठी यंत्रणांचा वापर होत आहे.

    -सीबीआय, ed,incomtax आशा अनेक यंत्रणाच गैरवापर करत आहेत,जिथं त्याच्या विचाराचं सरकार नाही तिथं कारवाई करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा

    -ed नावाची यंत्रणा के असेल ती माहिती नव्हती ती मला आताआता समजायला लागली

  • 16 Oct 2021 03:48 PM (IST)

    जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीत चर्चा फिस्कटली

    जळगाव :

    जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीत चर्चा फिस्कटली

    काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही

    कोणत्याही निर्णयाविना बैठक आटोपली

    काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची मांडली भूमिका

    उद्या पुन्हा बैठक होणार असल्याची भाजप, शिवसेना नेत्यांची माहिती

    पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन हे माध्यमांशी न बोलताच पडले बाहेर

    बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, बैठकीत फक्त चहापान आणि नाश्ता झाल्याची काँग्रेस नेत्यांची माहिती

  • 16 Oct 2021 03:46 PM (IST)

    युपीतील दलित मतदारांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही : रामदास आठवले

    रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    - उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त १८ किंवा ८-१० जागा मिळाल्या, भाजपसोबत युती करण्याची तयारी

    - युपीमध्ये एक लाख लोकांचं संमेलन घेणार

    - उत्तर प्रदेशात ब्राम्हण संमेलन घेणार

    - युपीतील दलित मतदारांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही

    - केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र, काही शंका आल्यास त्या तपास यंत्रणा चौकशी करतात

    - आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा टाकून छापा टाकतो

    - उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहणार, आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस राहणार

    - सेना भाजपात समन्वय करायला मी तयार आहे. पण यांना समन्वय करायचा नाही, तर मी काय करु

    - अनेक शिवसैनीक नाराज आहे

    - आगामी महानगरपालिका निवडणूकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत निवडणूक लढणार

  • 16 Oct 2021 03:28 PM (IST)

    वाशिममध्ये सोयाबीन पिकाचे 30 पोते घेऊन जाणारे टॅक्टर विहिरीत पलटी

    वाशिम :

    वाशिम तालुक्यातील आसोला इथल्या शेतात सोयाबीन पिकाचे 30 पोते घेऊन जाणारे टॅक्टर विहिरीत पलटी

    चालकाच टॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

    यामध्ये मारोती इंगोले या शेतकऱ्याचे 30 पोते सोयाबीन पाण्यात गेल्यानं झालं लाखोंचं नुकसान

    सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी नाही

  • 16 Oct 2021 02:22 PM (IST)

    मुंबईच्या सायन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, प्रचंड वाहतूक कोंडी

    सायन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे सायन आणि धारावीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे

    इस्टर्न एक्सप्रेस वे वरून टाऊनच्या दिशेने जाणारी वाहने खोळंबली आहे

  • 16 Oct 2021 01:11 PM (IST)

     डोंबिवली पश्चिमेतील एकविरा पेट्रोल पंप वर सॅम्पल बकेट मध्ये लागली आग

    डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

    डोंबिवली पश्चिमेतील एकविरा पेट्रोल पंप वर सॅम्पल बकेट मध्ये लागली आग

    फायर ब्रिगेडने विझवली आग

    मोठी दुर्घटना टळली

    गजबजलेल्या परिसरात आहे पेट्रोल पंप

  • 16 Oct 2021 12:33 PM (IST)

    शिवसेनेनं वाहनचालकांना वाटले झंडू बाम आणि मास्क, बदलापुरात खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन

    शिवसेनेनं वाहनचालकांना वाटले झंडू बाम आणि मास्क
    बदलापुरात खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन
    अनेकदा निधी मंजूर होऊनही रस्त्याचं काम का नाही?
    शिवसेनेचा नगरपालिका आणि लोकप्रतिनिधींना सवाल
  • 16 Oct 2021 12:21 PM (IST)

    आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आज पाशाकुंशा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट

    आळंदी,पुणे

    -आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आज पाशाकुंशा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट

    -विविध रंगाच्या देशी-विदेशी फुलांच्या माळाची आकर्षक सजावट करण्यात आलीय

  • 16 Oct 2021 11:58 AM (IST)

    कागलच्या शाहू नंतर आता शिरोळचा दत्त सहकारी साखर कारखाना ही देणार एक रकमी एफआरपी

    कोल्हापूर

    कागलच्या शाहू नंतर आता शिरोळचा दत्त सहकारी साखर कारखाना ही देणार एक रकमी एफआरपी

    कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची घोषणा

    कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात केली घोषणा

    दत्त सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादकांना 2 हजार 920 रुपये एफआरपी एक रकमी देणार

    महापुरातील बुडीत उसाच्या तोडणी ला देखील प्राधान्य देणार

    गणपतराव पाटील यांची माहिती

  • 16 Oct 2021 11:08 AM (IST)

    फ्लेचर पटेल कोण याचा खुलासा एनसीबीने करावा - नवाब मलिक

    नवाब मलिकांची पत्रकार परिषद -

    फ्लेचर पटेल कोण याचा खुलासा एनसीबीने करावा

    ही सगळी कारवाई ठरवून केली का

    लेडी डॉन कोण आहे, कोणतं रॅकेट मुंबईत सुरु आहे

    समीर वानखेडेंसोबत फ्लेचरचे फोटो कसे

    ३ प्रकरणांमध्ये फ्लेचर पटेल पंच

    २ ऑक्टोबरपर्यंत पंचांना ओळखत नाही, असं एनसीबी कसं सांगू शकते

  • 16 Oct 2021 09:52 AM (IST)

    आरोग्य विभागाच्या परीक्षांमधला गोंधळ संपता संपेना

    आरोग्य विभागाच्या परीक्षांमधला गोंधळ संपता संपेना !

    24 आणि 31 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची होतीये परीक्षा,

    मात्र आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज उमेदवारांनी भरले असल्यानं सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी,

    दोन परीक्षांच अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांला एका परीक्षेला मुकावं लागणार,

    जिल्हा बदलून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र,

    तर पिनकोडही चुकीचं आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार,

    तांत्रिक गोंधळामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली होती...

  • 16 Oct 2021 09:51 AM (IST)

    मुंबईत पेट्रोलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ, पेट्रोलची किंमत 111.43 पैसे

    - मुंबईत पेट्रोलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ ….

    - मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 111.43 पैसे इतकी आहे.

    - डिझेलचा दर प्रति लिटर 102.15 पैसे आहे, ..

    - पेट्रोल 34 पैशांनी महागलंय...

    - डिजेल 37 पैशांनी महागलंय…

    - पावर पेट्रोल 115.34 पैसे आहे…

    - पेट्रोल हे 130 रुपये प्रती लिटर पर्यंत जाऊ शकतं असं बोललं जातंय....

    - महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडतंय…

    - पेट्रोलचे दर वाढल्याने राज्यात भाजीपाला आणि दूध महाग होणार असल्याचं बोललं जातंय..

  • 16 Oct 2021 09:51 AM (IST)

    गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असताना आज डिझेलनेही शतक पार केलं

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली असताना आज डिझेलनेही शतक पार केलं.

    पुण्यातील इंधनाचे दर

    पेट्रोल - 110.92 प्रतिलिटर

    पॉवर पेट्रोल -114.60

    डिझेल - 100.08 प्रतिलिटर

    सीएनजी - 62.10 प्रतिकिलो

  • 16 Oct 2021 09:50 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात 929 ठिकाणी वीज चोरी उघड

    सोलापूर - जिल्ह्यात 929 ठिकाणी वीज चोरी उघड

    90 लाख रुपयांचा अनाअधिकृत वापर झाल्याचे झाले स्पष्ट

    वितरण व वाणीज्य  हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून वीज चोरीविरुद्ध सुरू आहे मोहीम

    वीज चोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या विरुद्ध विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येणार

  • 16 Oct 2021 09:22 AM (IST)

    सरकार पडेल तेव्हा कळणारही नाही - देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस

    सरकार पाडून दाखवाच्या गर्जना काय करताय

    सरकार पड़ेल तेव्हा कळणारही नाही

    सध्या आम्ंहाला त्यात इन्टरेस्ट नाही, आम्ंहाला लोकांच्या प्रश्नांमध्ये इन्टरेस्ट आहे

    तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्य़ा सोडवून दाखवा

    एकदा चालून दाखवा, काम करुन दाखवा

  • 16 Oct 2021 09:18 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं - फडणवीस

    - मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं

    - बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले

    - ते आम्ही होऊ देणार नाही

  • 16 Oct 2021 09:16 AM (IST)

    हे सर्वात भ्रष्ट सरकार आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं स्वप्न दाखवून यांनी पाठ दाखवली - फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    - हे सर्वात भ्रष्ट सरकार आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं स्वप्न दाखवून यांनी पाठ दाखवली

    - राज्यात मोठी दलाली चाचललीय, आयटी च्या रेडमध्ये लक्षात आलंय की काही मंत्र्यांनी वसूलीचं सॅाफ्टवेअर तयार केलंय

    - पंतप्रधान एजंसीजच्या वापरा विरोधात आहे, ते एजंसीजच्या गैरवापर करत नाही

    - एजंसीजच्या गैरवापर केला असता तर अर्धमंत्रीमंडळ जेलमध्ये असतं

    - भ्रष्टाचार खनून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाही

    - कालच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचं फ्रस्टेशन दिसत होते

  • 16 Oct 2021 09:10 AM (IST)

    कालच्या शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना गरळ ओकताना पाहिलं - फडणवीस

    देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद

    एकेकाळी शिवसेना मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं

    हा भाडेपणाचा मुखवटा उतरवा

    हे बेईमानीने सत्तेत आलेलं सरकार आहे

    कालच्या शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना गरळ ओकताना पाहिलं

    मुख्यमंत्रीपदी असल्याचं ठाकरे विसरले

    राणे आणि राज ठाकरेंना पक्षाबाहेर का जावं लागलं

  • 16 Oct 2021 08:33 AM (IST)

    विधान परिषदेच्या  निवडणूकीसाठी अद्याप निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम आला नाही

    सोलापूर - विधान परिषदेच्या  निवडणूकीसाठी अद्याप निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम आला नाही

    मात्र नूतन सदस्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू

    विधानपरिषदेवर निवडून आले प्रशांत परिचारक यांची डिसेंबरअखेर संपत आहे मुदत

    जिल्ह्यात राहणार साधारणता बारा मतदान केंद्रे

    नगरपालिकांचे 229 नगरसेवक, महानगरपालिकेचे 104, पंचायत समितीचे सभापती 11 सभापती, जिल्हा परिषदेचे 65 सदस्य राहणार मतदार

  • 16 Oct 2021 07:47 AM (IST)

    बार्शीतील रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना लसीची केली सक्ती 

    सोलापूर - बार्शीतील रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना लसीची केली सक्ती

    लस न घेतल्यास शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाणार नसल्याचा काढला तोंडी फतवा

    या निर्णयामुळे बहुतांश लाभार्थी घेत आहेत लस

  • 16 Oct 2021 07:46 AM (IST)

    म्युकरमायकोसिस आजारामुळे सोलापूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू

    सोलापूर - म्युकरमायकोसिस आजारामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू

    आतापर्यंत 103 जणांचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू

    जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आजाराचे दहा रुग्ण घेत आहेत विविध हॉस्पिटलमध्ये उपचार

    आत्तापर्यंत 696 रुग्ण आढळून आले, त्यातील 583 जणांनी केली आहे आजारावर मात

  • 16 Oct 2021 07:46 AM (IST)

    ‘लग्नास दबाव आणणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही’, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

    - ‘लग्नास दबाव आणणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही’

    - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

    - अकोला जिल्ह्यातील नरखेड येथील २०१९ च्या प्रकरणात निर्वाहाची

    - अभिजीत चितोडे आत्महत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्वाळा

    - प्रेयसीच्या कुटूंबीयांनी लग्नाला दबाव आणला म्हणून आत्महत्या केल्याचा होता आरोप

    - प्रेयसी आणि कुटुंबीयांवरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश

  • 16 Oct 2021 07:45 AM (IST)

    किट्स न मिळाल्याने नागपूर जिल्ह्यातील ‘सिरो’ सर्व्हेचं काम रखडलं

    - किट्स न मिळाल्याने नागपूर जिल्ह्यातील ‘सिरो’ सर्व्हेचं काम रखडलं

    - सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतरच किट्स न मिळाल्याने लागला ब्रेक

    - किती नागरीकांमध्ये ॲंटीबॅाडी ‘सिरो’ तयार झाल्या? हे तपसण्यासाठी ‘सिरो’ सर्व्हे गरजेचा

    - किट्स मिळाल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण सुरु होणार असल्याची माहिती

  • 16 Oct 2021 07:45 AM (IST)

    नाशकात पोलीस परवानगी न घेताच फटाके स्टॉलसाठी महापालिकेची घाई

    नाशिक - पोलीस परवानगी न घेताच फटाके स्टॉलसाठी महापालिकेची घाई

    पोलीस,विद्युत आणि अग्निशमन विभागाची परवानगी यंदा स्टॉल धारकांच्या माथी

    6 विभागातील 23 ठिकाणी 333 स्टॉल साठी होणार लिलाव

    मात्र लिलावपूर्वी सर्व विभागांची परवानगी काढण्याची जबाबदारी यंदा स्टॉल धारकांवर

    स्टॉल धारकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याने स्टॉल धारकांकडून नाराजी

  • 16 Oct 2021 07:43 AM (IST)

    मंडलिक खून प्रकरण, राजपूत बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

    नाशिक - मंडलिक खून प्रकरण

    राजपूत बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी

    काल पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघा भावांची न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

    जागा बळकावण्या वरून झाली होती मंडलिक यांची हत्या..

    मुख्य आरोपी राजपूत बंधू होते फरार..

  • 16 Oct 2021 07:42 AM (IST)

    नाशकात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने आणि वाहन खरेदी जोरात

    नाशिक - नाशिककरांचा दसरा झाला जोरात

    दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने आणि वाहन खरेदी जोरात

    450 कारची दसऱ्याच्या मुहूर्तावर डिलिव्हरी

    तर दोन वर्षातील सर्वाधिक सोने खरेदी झाली दसऱ्याच्या मुहूर्तावर

    अन लॉक नंतर नाशिककरांचे खरेदीत सीमोल्लंघन

  • 16 Oct 2021 07:40 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि उमरेडमध्ये उभारणार ॲाक्सीजन प्रकल्प

    - नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि उमरेडमध्ये उभारणार ॲाक्सीजन प्रकल्प

    - राज्य सरकारची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती

    - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून उभारणार ॲाक्सीजन प्रकल्प

    - ग्रामीण रुग्णांलयात ॲाक्सीजन पुरवठ्यासाठी होणार मदत

  • 16 Oct 2021 07:04 AM (IST)

    पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मध्ये दोन गर्दुल्यांमध्ये हाणामारी, एकाने केला दुसऱ्यावर ब्लेडने जीवघेणा  हल्ला

    कसारा

    कसारा रेल्वे स्टेशन येथे पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मध्ये दोन गर्दुल्यांमध्ये हाणामारी, एकाने केला दुसऱ्यावर ब्लेडने जीवघेणा  हल्ला.

    कसारा स्थानकात सायंकाळी 6 च्या सुमारास पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मध्ये  एका गर्दुल्यावर दुसऱ्या गर्दुल्यावर  ब्लेड चे वर करून केला जीव घेणा हल्ला.

    हल्ल्यात जखमी झालेल्या जखमीचे नाव सोनू असून त्याला उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले आहे.

    हे दोन्ही गर्दुल्या रेल्वे गाडी मध्ये गुटखा विकणे, प्रवाशांचे  पॉकिट मारणे या सारखे धंदे करायचे अशी रेल्वे संगटने कडून माहिती मिळाली आहे.

    रेल्वे मध्ये गाणी गाणाऱ्या मुलींच्या वरून हे भांडण झाल्याच्या संशया वरून रेल्वे पोलिसांनी घेतले दोन  गाणी गाणाऱ्या मुलींना ताब्यात

  • 16 Oct 2021 06:40 AM (IST)

    कल्याणमध्ये कबड्डीपट्टूमध्ये राडा, दोन नामांकित कबड्डी खेळाडूंना मारहाण

    कल्याणमध्ये कबड्डीपट्टूमध्ये राडा
    दोन नामांकित कबड्डी खेळाडूंना मारहाण
  • 16 Oct 2021 06:39 AM (IST)

    चीनकडून नवी अंतराळ मोहीम, 3 अंतराळ वीरांना घेऊन चीनचे रॉकेट अंतराळात झेपावले

    चीनकडून नवी अंतराळ मोहीम

    3 अंतराळ वीरांना घेऊन चीनचे रॉकेट अंतराळात झेपावले

    अंतराळ वीरांमध्ये एका महिलेचा समावेश

    6 महिने अंतराळ अभ्यास करून  पृथ्वीवर परतणार

    चीनसाठी महत्वाची होती अंतराळ मोहीम

  • 16 Oct 2021 06:39 AM (IST)

    छत्तीसगड घटनेवर काँग्रेस भाजप मध्ये जोरदार घमासान

    छत्तीसगड घटनेवर काँग्रेस भाजप मध्ये  जोरदार घमासान

    गाडीमधील 2 जणांना छत्तीसगड पोलिसांनी केली अटक

    बबलू विश्वकर्मा आणि शिशुपाल साहू या दोघांना अटक

    गाडीमध्ये अमली पदार्थ असल्याचा काँग्रेसचा दावा

    गाडीमधील दोन्ही व्यक्ती मध्यप्रदेश मधील भाजपचे कार्यकर्ते - काँग्रेसचा आरोप

    मिरवणुकीत गाडी कशी घुसली - चौकशी करा भाजपची मागणी

    गाडीमधील 2 जणांना छत्तीसगड पोलिसांनी केली अटक

    बबलू विश्वकर्मा आणि शिशुपाल साहू या दोघांना अटक

    गाडीमध्ये अमली पदार्थ असल्याचा काँग्रेसचा दावा

    गाडीमधील दोन्ही व्यक्ती मध्यप्रदेश मधील भाजपचे कार्यकर्ते - काँग्रेसचा आरोप

    मिरवणुकीत गाडी कशी घुसली - चौकशी करा भाजपची मागणी

Published On - Oct 16,2021 6:22 AM

Follow us
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.