Maharashtra News LIVE Update | पुण्यात गंगाधाम येथील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल

| Updated on: Oct 26, 2021 | 12:14 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुण्यात गंगाधाम येथील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Oct 2021 10:38 PM (IST)

    पुण्यात गंगाधाम येथील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल

    पुणे गंगाधाम, आई माता मंदिराजवळ, श्री जी लॉन्स येथे एका गोडाऊनला आग लागली. याआगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली

  • 25 Oct 2021 09:07 PM (IST)

    किरण गोसावी थोड्याच वेळात लखनऊ पोलीसांना शरण येणार, सूत्रांची माहिती

    क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच असलेला आणि पुण्यात तरुणांची नोकरीच्या नावाने फसवणूक करणारा किरण गोसावी थोड्याच वेळात लखनऊ पोलीसांना शरण येणार, पुण्यात या संदर्भातील गुन्हा दाखल, किरण गोसावीने याआधी टीव्ही 9 च्या रिपोर्टरशी बोलताना आपण पोलिसांना शरण जाणार असल्याची फोनवर माहिती दिली होती.

  • 25 Oct 2021 09:00 PM (IST)

    समीर वानखेडे दिल्लीत दाखल, वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार

    आर्यन खान अटक प्रकरणीन समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटींचा गंभीर आरोप

    समीर वानखेडे दिल्लीत दाखल

    वानखेडे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार

  • 25 Oct 2021 08:57 PM (IST)

    एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दिल्लीत दाखल, 25 कोटींच्या व्यवहारासंदर्भात चौकशी होणार

    एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दिल्लीत दाखल, 25 कोटींच्या व्यवहारा संदर्भात चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती, वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम समीर वानखेडेंची चौकशी करणार, प्रकार साईलने केलेल्या आरोपांनंतर समीर वानखेडे दिल्लीत दाखल

  • 25 Oct 2021 08:12 PM (IST)

    दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

    दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली.

  • 25 Oct 2021 07:38 PM (IST)

    आयपीएलमध्ये दोन नव्या टीमची घोषणा, पुढच्या सीझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद संघ असणार

    आयपीएलमध्ये दोन नव्या टीमची घोषणा, आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद संघ असणार

  • 25 Oct 2021 07:32 PM (IST)

    आयपीलमध्ये दोन नव्या संघांची घोषणा

    आयपीलमध्ये दोन नव्या संघांची घोषणा

    बीबीसीआयची घोषणा

  • 25 Oct 2021 07:18 PM (IST)

    नागपूरच्या जरीपटका पोलिसांची मोठी कारवाई, 8 लाख 85 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त

    नागपूर :

    नागपूरच्या जरीपटका पोलिसांची मोठी कारवाई

    8 लाख 85 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटका केला जप्त

    दुधाच्या गाडीतून केली जात होती प्रतिबंधित तंबाखू ची वाहतूक

    अन्न व औषधी प्रशासन विभागाला देण्यात आली माहिती

    पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन घेऊन ज्या ठिकाणी हा तंबाखू जाणार होता त्याचा शोध सुरू केला ...

    मोठं रॅकेट असण्याची शक्यता

  • 25 Oct 2021 06:18 PM (IST)

    किरण गोसावी स्वत:ला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करणार, प्रभाकर साईलचे सर्व आरोप फेटाळले

    किरण गोसावी स्वत:ला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करणार, प्रभाकर साईलने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं गोसावीचं स्पष्टीकरण, शाहरुख खान संबंधित डीलचं मला काहीच माहिती नाही, माझ्यावर केलेले आरोप खोटे, मी कुठल्याही डीलमध्ये सहभागी नव्हतो. मी सरेंडर होणार, गोसावीची प्रतिक्रिया, गोसावीने टीव्ही 9 ला फोनवर प्रतिक्रिया दिली

  • 25 Oct 2021 05:50 PM (IST)

    ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी 15 हजार 500 रुपये दिवाळी बोनस जाहीर

    ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतलेल्या बैठकीत महापालिका कर्मचारी आणि कंत्राटी यांना दिवाळी अगोदर 15 हजार 500 रुपये बोनस करण्यात आला जाहीर

    कोरोना काळात केलेल काम तसेच मंत्री एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे

    महापलीक परिस्थिती या आर्थिक बोजा जरी असला तरी सुद्धा बोनस लवकरात लवकर मिळणार

    12 ते 15 कोटींचा बोजा महापालिकेला पडणार आहे

  • 25 Oct 2021 05:40 PM (IST)

    समीर वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी जुजबी चर्चा झाली : दिलीप वळसे पाटील

    दिलीप वळसे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    प्रभाकर साईल यांनी जे प्रतिज्ञापत्र रजिस्टर केलं आहे ते माझ्या पाहण्यात आलं आहे. त्यांना स्वत:च्या जीवाला धोका असल्याचं जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी संरक्षण मागितलेलं आहे. ते संरक्षण मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे. त्यांना कालपासून संरक्षण दिलं आहे.

    नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन पुढील कारवाई करु.

    एफआयआरसाठी कुणीतरी तक्रार करावी लागते. ती तक्रार दिली तर पोलीस पुढची कारवाई करतील

    या विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी माझी जुजबी चर्चा झाली. फार काही चर्चा झाली नाही. दुसऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी कसं बोलणार? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.

    या संदर्भात मी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता. आता जास्त वापर केला जातोय. सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीवर धरण्याचं काम सुरुय. त्या संदर्भात मी माझी भूमिका मांडलेली आहे

    कोणीही जर पोलीस ठाण्यात गेलं आणि तक्रार केली तर त्या संदर्भात एफआयआर दाखल होते. त्यांनी तक्रार दिली असेल तर एफआयआर दाखल होऊ शकते. ते सहार पोलीस ठाण्यात गेले होते. त्याबाबत मी सविस्तर माहिती घेईन

  • 25 Oct 2021 05:29 PM (IST)

    समीर वानखेडे यांच्या विरोधात प्रभाकर साईल पोलीस ठाण्यात तक्रार करणार

    एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरोधात प्रभाकर साईल पोलीस ठाण्यात आज संध्याकाळी करणार तक्रार, डीसीपी झोन १ इथे पोलिसांची घेणार भेट, सुत्रांची माहीती

    - केपी गोसावी सोबतचे वाॅट्सअॅप चॅट, पुरावे, काॅल डीटेल्स पोलिसांना देणार

    - एनसीबीच्या नावाखाली वसूली होऊन या प्रकरणात आपला वापर झाला, जीवाला धोका असल्याचा प्रभाकर यांचा आरोप

    - काही वेळात एमआरए पोलीस ठाण्यात पोहोचणार प्रभाकर

  • 25 Oct 2021 05:27 PM (IST)

    मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकिटांमध्ये भाववाढ होणार, तिकीट किंमतीमध्ये जवळपास 17 टक्‍क्‍यांची वाढ

    आज मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकिटांमध्ये भाववाढ होणार आहे

    गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तिकीटात दरवाढ झालेली आहे

    एसटीच्या तिकीट किंमतीमध्ये जवळपास 17 टक्‍क्‍यांची भाववाढ झालेली आहे

  • 25 Oct 2021 05:23 PM (IST)

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करणार?

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची शक्यता, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती

  • 25 Oct 2021 05:13 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 55 नवे कोरोनाबाधित, 86 जणांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात ५५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ८६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. -१४३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३८५९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८६१. - एकूण मृत्यू -९०७३. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३९२५. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३५३३.

  • 25 Oct 2021 05:11 PM (IST)

    मुंबई सेशन कोर्टाने समीर वानखेडेंची याचिका फेटाळली

    एनसीबी तर्फे मुंबई सेशन कोर्टमध्ये दाखल करण्यात आला होता अर्ज

    मात्र सेशन कोर्टाच्या न्यायधीशांनी आपल्या आदेशात म्हटलंय की, आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील जामीन अर्ज हाय कोर्टसमोर प्रलंबित आहे

    - या प्रकरणाच्या चौकशीचे मुद्दे जे काही असतील ते मुंबई हाय कोर्टासमोर मांडावेत

    - सेशन कोर्टसाठी ही केस संपली आहे

    एनसीबी सोबतच समीर वानखेडे यांनी एक अर्ज करत त्यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक बदनामी संदर्भात सेशन कोर्टात अर्ज करून दिली होती माहिती

    - nothing on merit म्हणत समीर वनखेडेंची याचिका फेटाळाली

  • 25 Oct 2021 05:09 PM (IST)

    'माझे नाव ज्ञानदेव वानखेडे, दाऊद नावाशी माझा काहीही संबंध नाही', समीर वानखेडेंच्या वडिलांचं स्पष्टीकरण

    समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले की, माझे नाव ज्ञानदेव वानखेडे आहे, दाऊद नावाशी माझा काहीही संबंध नाही, माझ्या शाळेच्या प्रमाणपत्रावर कॉलेजच्या सर्व कागदपत्रांवर ज्ञानदेव वानखेडे असे लिहिलेले आहे, माझे नाव आधी दाऊद नव्हते, आजही नाही आणि दाऊदही नव्हते.

  • 25 Oct 2021 04:08 PM (IST)

    वर्ध्यात तब्बल सहा तासांनंतर बिबट्याचं सुरक्षित रेस्क्यू

    वर्धा :

    - तब्बल सहा तासांनंतर बिबट्याचं सुरक्षित रेस्क्यू

    - वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूस सकाळी आढळला होता बिबट्या

    - बेशुद्धच इंजेक्शन देऊन बिबट्याच रेस्क्यू

    - वनविभागाणं केलं सुरक्षित रेस्क्यू ऑपरेशन

    - सकाळपासून परिसरात बिबट्या शिरल्याने होते भीतीचे वातावरण

    - बिबट्याच रेस्क्यू झाल्याने नागरिकांसह प्रशासनाने घेतला सुटकेचा श्वास

  • 25 Oct 2021 04:07 PM (IST)

    कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही : छगन भुजबळ

    छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : - शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो असं म्हटलो हे मान्य, मात्र कुणालाही पक्षात काम केल्याशिवाय जबाबदारी मिळत नाही - संजय राऊत राऊत यांनाही सामनाचं संपादक काम केल्यानेच केलं आहे - मी जेव्हा शिवसेना मोठी केली तेव्हा ते खासदार देखील नव्हते - नांदगाव मतदारसंघ विसरा असं ते म्हणाले याबाबत मला पवार साहेबांशी बोलावं लागेल - नांदगावमध्ये मी जे काम केलं ते त्यांना माहीत नसावं कारण त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करावं लागतं - त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदारसंघात परत यावे - आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले त्यांनीही १०० प्लस आमदार निवडून आणण्याचं आव्हान केलं

  • 25 Oct 2021 04:02 PM (IST)

    एकनाथ खडसे यांना दिलासा, सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

    एकनाथ खडसे यांना दिलासा सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन केला मंजूर

    पुणे जमीन कथित घोटाळा प्रकरणात खडसे आरोपी

    मात्र सदर प्रकरणात खडसे यांना सत्र न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे

  • 25 Oct 2021 03:55 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकार NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता

    NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अॅक्शन मोडमध्ये.

    बनावट दस्तावेज प्रकरणामध्ये फसवणुकीच्या प्रकरणात राज्य सरकार वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता.

    गृह विभागाच्या उच्च स्तरीय बैठका होत आहेत.

    वानखेडे केंद्रीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी नियम-कायद्यांचा केला जात आहे अभ्यास

    स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समीर वानखेडे यांच्याबाबत सुरू असलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती घेत आहेत

    केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजप यांना या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार एक संदेश देऊ इच्छिते

  • 25 Oct 2021 03:37 PM (IST)

    नाशिकमध्ये 14 महिन्यांच्या मुलीवर वडिलांनी घरीच औषध उपचार केल्याने मृत्यू

    - नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड - 14 महिन्यांच्या रिया शेट्टे या मुलीवर वडिलांनी घरीच औषध उपचार केल्याने मुलीचा मृत्यू - वैद्यकीय उपचारा बाबत कोनतीही माहिती नसताना केले उपचार - नाशिकच्या पंचवटी परिसरातील घटना - मुलीच्या आईच्या तक्रारी वरून वडील हेमंत शेट्टे यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 25 Oct 2021 03:36 PM (IST)

    समीर वानखेडें यांच्यावरील आरोपांप्रकरणी चौकशी समिती नेमली, दिल्लीतील एनसीबी डायरेक्टर जनरल ज्ञानेश्वर सिंह यांची माहिती

    नवी दिल्ली :

    समीर वानखेडे यांच्याबाबत एक अफीडेव्हीट सोशल मीडियावर फिरत होतं, त्यावरून मुख्यालयाला रिपोर्ट आला होता, त्यानुसार आम्ही चौकशी समिती नेमली आहे

    याबाबत अजून कुणालाही समन्स पाठवण्यात आलेला नाही

    या सगळ्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली जाणार

    नवी दिल्लीतील एनसीबी डायरेक्टर जनरल ज्ञानेश्वर सिंह यांची टीव्ही नाईन मराठीला माहिती

  • 25 Oct 2021 03:10 PM (IST)

    नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि 2 सभापतींची निवड बिनविरोध

    नंदूरबार :

    - नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि 2 सभापती बिनविरोध

    - उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे राम रघुवंशी तर सभापती पदी शिवसेनेचे गणेश पराडके आणि काँग्रेसचे अजित नाईक यांची निवड निश्चित

  • 25 Oct 2021 02:51 PM (IST)

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

    सोलापूर : टक्केवारीच्या विषयावरून सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

    जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध यांच्यासह स्वीय सहाय्यकावर कारवाईसाठी गोंधळ

    प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या स्वीय सहायकाने चार कोटी रुपये टक्केवारी  मागितल्याचा कृषी सभापती अनिल मोटे यांचा आरोप

    लाच  मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार असल्याची कृषी सभापती मोटे यांची माहिती

    आपला यात संबंध नसल्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचा खुलासा

    या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचा मुख्य कार्यकारी यांचे सदस्यांना ग्वाही

  • 25 Oct 2021 02:24 PM (IST)

    दगडूशेठ गणपती मंदिरात 'हार्ट स्टार्ट' मशिनची सुविधा

    पुणे :

    दगडूशेठ गणपती मंदिरात 'हार्ट स्टार्ट' मशिनची सुविधा

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पुणे आणि एन.एम.वाडिया इन्स्टिटयूट ऑफ कार्डिओलोजीचा पुढाकार

    दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हार्ट स्टार्ट मशिनची सुविधा उपलब्ध

    एखाद्याची ह्रदयक्रिया बंद पडली असता, हे मशिन ह्रदयाचा रिदम ओळखून ह्रदयाला धक्का किंवा शॉक देऊन ह्रदय पुन्हा पूर्ववत सुरु करु शकते

    परदेशात गर्दीच्या अनेक ठिकाणी हे मशिन उपलब्ध

    दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे याठिकाणी तातडीच्या वेळी रुग्णांना याचा उपयोग होणार

  • 25 Oct 2021 01:05 PM (IST)

    धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही लढाई आहे - फडणवीस

    सुभाष साबणे ने 15 वर्ष माझ्या सोबत काम केलंय, साबणे धडाडीचे काम करणारे नेते

    राजकारणात गैरसमज होत असतात, दरी निर्माण होत असते पन साबणे स्वतंत्र काम करणारा माणूस आहे

    धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही लढाई आहे

    आमच्याकडे पैसा नाही पण तुमचे प्रश्न सोडवा

    पैश्याचाच भरवश्यावर निवडणूक जिंकता आल्या असत्या तर अशोकराव लोकसभेला तुम्ही हारलेच नसते

    लोकांची डोकी फिरली की शॉक द्यावा लागतो तसा शॉक या निवडणुकीत या लोकांना द्या

    2 महिन्यानंतर सरकार येणार यावर मी बोलणार नाही पण योग्य वेळी करू , लोकांना जे हवय ते होईलच

  • 25 Oct 2021 12:59 PM (IST)

    अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षण गेले - फडणवीस

    मूठभर धन दांडग्या लोकांचं सरकार आहे, मालदार सेठ सावकार लोकांचे हे सरकार

    लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करता येतो, या सरकारने एकेका समाजाची अवस्था काय केली, ओबीसी चे आरक्षण काढले

    अशोक चव्हाण च्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षण गेले

    मननेरवारलु समाजाला असाच त्रास आहे

    हे केवळ पैसा फेक तमाशा देख वाल्या लोकांचे सरकार

  • 25 Oct 2021 12:58 PM (IST)

    कोरोना काळात केंद्र सरकारने मोठी मदत दिली पण राज्य सरकारने एका नव्या पैश्याचीही मदत केली नाही - फडणवीस

    सामान्य माणसाची अवस्था वाईट आहे, अतिवृष्ठीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही

    बोलायला बांधावर जातात मोठया घोषणा करतात पण यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत

    पिकविम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळत नाहीत

    हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात

    बायकोने मारले तरी केंद्राने मारलं असे सांगतील

    शेतकऱ्यांचा राज्य सरकारचा हिस्सा भरल्या जात नाही म्हणून पीकविमा मिळत नाही

    उभं पीक जमीनदोस्त होणं म्हणजे तरुण मुलगा गमावल्याचे दुःख

    एका मंत्री चा जावई गांजा विकताना अडकला , पण मंत्री म्हणतो हा हर्बल तंबाखू मग आमचे सदाभाऊ म्हणतायत की हा तंबाखू लावायची परवानगी द्या म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील

    शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पाच वर्षे काळात आम्ही कधीच कापले नाही पण आता बिल थकलं की लाईट कट होतेय

    मतदान होऊ द्या इथेही लाईट कट करायला येतील

    कोरोना काळात केंद्र सरकारने मोठी मदत दिली पण राज्य सरकारने एका नव्या पैश्याचीही मदत केली नाही

  • 25 Oct 2021 12:56 PM (IST)

    फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरू आहे - देवेंद्र फडणवीस

    खर म्हणजे ही पोट निवडणूक आली नसती तर बरं झालं असत , मात्र ही निवडणूक आल्यावर या निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या मतदारांना एक संधी मिळालीय

    राज्यातील दोन वर्षे सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय

    ह्या सरकारने अनेक योजना बंद केल्या त्याचा पाढाच फडवणीसानी वाचून दाखवलाय

    या सरकारने 2 वर्षात राज्यात केवळ भ्रष्टाचार केला

    प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरे दिली , गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे - या सरकारने गरिबाला एकही घर दिलं नाही

    फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरू आहे

    आयकर खात्याच्या धाडीत हजारो कोटी सापडलेत , ते जमा करताना सगळा हिशोब देखील ठेवलाय.

    हे कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही

    मिळेल त्यात खाऊन राहिलेत

  • 25 Oct 2021 11:51 AM (IST)

    ड्रग्ज क्रूझ केस या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सेल गुन्हे शाखा कार्यालयात पोहोचले

    ड्रग्ज क्रूझ केस या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सेल गुन्हे शाखा कार्यालयात पोहोचले

  • 25 Oct 2021 11:50 AM (IST)

    गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा शहर पोलीस ठाण्यात अचानक धडक

    सातारा -

    गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा शहर पोलीस ठाण्यात अचानक धडक

    सातारा शहर पोलीस स्टेशनच्या कामकाजावर पोलीस अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

    सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर व्यक्त केली तीव्र नाराजी

    शहरातून दुचाकीवरून जाऊन अचानक दिली शहर पोलीस ठाण्यात भेट

  • 25 Oct 2021 11:12 AM (IST)

    अमरावतीच्या दानापूर प्रकरणाला वेगळं वळण

    अमरावतीच्या दानापूर प्रकरणाला वेगळं वळण

    ऑल इंडिया पँथर सेनेच्या दीपक केदार यांचे खळबळजनक आरोप

    काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या सांगण्यावरून सोयाबीनची गंजी पेटवल्याचा आरोप

    काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यावरही अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

    वर वर शांतता कमिटीची बैठक घेऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

  • 25 Oct 2021 11:12 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर, 5200 कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटन

    उत्तर प्रदेश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर

    तब्बल 5200 कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटन

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर

    निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

    उत्तर प्रदेश राज्यासाठी 9 मेडिकल कॉलेजची मान्यता

  • 25 Oct 2021 11:11 AM (IST)

    वर्ध्यात सावंगी मेघे रुग्णालय परिसरात घुसला बिबट्या

    वर्धा

    - सावंगी मेघे रुग्णालय परिसरात घुसला बिबट्या

    - रुग्णालय परिसराच्या मागील बाजूस बिबट्या दिसल्याने खळबळ

    - घटनास्थळी पोलिसांसह , वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

    - रुग्णालयाच्या जवळ बिबट्या आढळल्याने खळबळ

    - बिबट्या परिसरातील नालीत घुसल्याने अडचण

    - घटनास्थळी बघ्यांची गर्दी

  • 25 Oct 2021 11:11 AM (IST)

    आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यातील नगरसेवकांची संख्या 183 इतकी होण्याची शक्यता

    पुणे -

    आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यातील नगरसेवकांची संख्या 183 इतकी होण्याची शक्यता

    लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवक संख्या निश्चित होते

    लोकसंख्येच्या निकषानुसार सद्यस्थितीत पालिकेत 166 नगरसेवक

    यात 10 टक्के वाढ म्हणजे ही संख्या 17 इतकी वाढून होऊन 183 इतकी होणार

    मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी येणार असल्याची सूत्रांची माहिती

    हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुण्यासह 30 लाखांवर लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्वच महापालिकातील नगरसेवकांची संख्या 10 टक्‍क्‍यांनी वाढणार

  • 25 Oct 2021 11:10 AM (IST)

    दिवाळीच्या पार्श्वभुमीवर अन्न विभागाची धडक मोहीम

    - दिवाळीच्या पार्श्वभुमीवर अन्न विभागाची धडक मोहीम

    - नागपूर विभागात अन्न विभागाच्या 15 दिवसांत 11 मोठ्या धाडी

    - 68165 किलो खाद्यतेल, प्रतिबंधित सुपारीचा साठा केला जप्त

    - 15 दिवसांत 1 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल अन्न विभागाने केला जप्त

    - दिवाळीत मिठाई आणि खाद्यपदार्थाची भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहिम

    - ‘ग्राहकांनी बेस्ट बिफोर तारीख बघून खाद्यपदार्थ खरेदी करावे’

    - ‘अन्न विभाग नागपूरातील मिठाई विक्रेत्यांची बैठक घेणार’

    - अन्न विभाग सहाय्यक आयुक्त सुरेश अन्नापूरे यांची माहिती

  • 25 Oct 2021 10:36 AM (IST)

    नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक संदीप जोशी यांच्या कडील सुमारे 90 किलो वजनाच्या तिजोरीची चोरी

    नागपूर -

    नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक संदीप जोशी यांच्या कडील सुमारे 90 किलो वजनाच्या तिजोरीची चोरी

    तिजोरीमध्ये 50 लक्ष रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याची माहिती

    सेमीनरी हिल्स मधील मालाबार कॉलनीत गवई यांचा प्रशस्त बंगल्यात घडली घटना

    संदीप गवई पत्नीसह मुंबईला गेले असताना घडली घटना

    गिट्टीखदान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवून पोलीस तपास सुरू

  • 25 Oct 2021 10:35 AM (IST)

    मावळात गुलाबी थंडीची चाहूल लागली, धुक्याची चादर बघायला मिळाली

    पुणे

    -मावळात गुलाबी थंडीची चाहूल लागली

    -आज ही मावळात धुक्याची चादर बघायला मिळाली

    -मॉर्निग वॉक ला फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी या थंडगार धुक्याचा आनंद घेतला..या महिन्यात तीन वेळा धुक्याची चादर मावळवासीयांना पहायला मिळाली..

  • 25 Oct 2021 09:47 AM (IST)

    औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरू

    औरंगाबाद -

    औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरू

    एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

    29 आणि 30 तारखेला ओवैसी येणार औरंगाबाद दौऱ्यावर

    एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दिली ट्विट करून माहिती

    दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात ओवैसी घेणार पक्ष बांधणीचा आढावा

    औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी ठरवणार दिशा

  • 25 Oct 2021 09:13 AM (IST)

    सोलापुरात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज होणार

    सोलापूर -

    सोलापुरात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज होणार

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक

    बैठकीला जिल्ह्यातील आमदार उपस्थित

    दुपारी तीन वाजता नियोजन भवनात आज होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक

    रखडलेली अनेक विकास कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता

  • 25 Oct 2021 09:12 AM (IST)

    नाशिक शहरात दाट धुक्याची चादर, गुलाबी थंडीची चाहूल

    नाशिक -

    नाशिक शहरात दाट धुक्याची चादर, गुलाबी थंडीची चाहूल

    शहरात अनेक भागात पहाटेपासून पसरली होती दाट धुक्याची चादर

    गोदावरी नदी किनारी दाट धुके

    ग्रामीण भागातही काही ठिकाणी पसरले दाट धुके

    दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील मका, हरबऱ्यासह द्राक्ष आणि कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती

    शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

  • 25 Oct 2021 09:11 AM (IST)

    नागपुरात नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, 50 तोळे सोन्यासह तिजोरीच पळविली

    नागपुरात नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी

    50 तोळे सोन्यासह तिजोरीच पळविली

    नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी चोरी

    चोरट्यांनी 70 किलोची तिजोरी पळविली

    गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या संदीप गवई यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी घडली घटना

    पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरु

  • 25 Oct 2021 09:10 AM (IST)

    पीएमपीएमएलचे उत्पन्न पोहोचले लाखांवरुन कोटींवर

    - पीएमपीएमएलचे उत्पन्न पोहोचले लाखांवरुन कोटींवर

    - लॉकडाऊननंतर ऑक्‍टोबर महिन्यात दररोज 30 ते 40 लाखांपर्यंत उत्पन्न होते,

    - यामध्ये चांगलीच वाढ झाली असून दररोजचे उत्पन्न सध्या एक कोटींपेक्षा अधिक होत आहे,

    -पीएमपीएमएलच्या 1450 ते 1460 बसेस सध्या धावत आहेत.

  • 25 Oct 2021 09:09 AM (IST)

    मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी तसेच बिबट्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने समितीची स्थापना

    पुणे :

    मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी तसेच बिबट्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने समितीची स्थापना

    जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 130 हून अधिक बिबट्यांचा मृत्यू

    बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू नाशिक आणि पुणे जिल्ह्यात

    बिबट्यांचे अपघाताती मृत्यू रोखण्यासाठी वन विभागाकडून राबवल्या जातायेत विविध प्रकारच्या उपाययोजना

    वाहनांची धडक लागून होणारे बिबट्यांचे अपघात रोखण्यासाठी पालखी मार्गावर 'इको ब्रिज'ची निर्मिती

    इको ब्रिजचा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार

  • 25 Oct 2021 09:09 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज रत्नागिरी दौऱ्यावर

    रत्नागिरी -

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज रत्नागिरी दौऱ्यावर

    रत्नागिरी विमानतळावर काहीच वेळात आगमन

    डिसमॅलटिंग कास्टिंजम लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेनशयल्स ऑफ हिंदुत्व या विषयावरील चर्चासत्रात होणार सहभागी

    9.30 वाजता गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात होणार कार्यक्रम

  • 25 Oct 2021 08:00 AM (IST)

    मुंबईत रविवारी करोनाच्या 408 नव्या रुग्णांची नोंद झाली

    मुंबईत रविवारी करोनाच्या 408 नव्या रुग्णांची नोंद झाली.

    मागील रविवारी मुंबईत एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता.

    त्यानंतर मात्र दिवसाला चार ते सहा मृत्यू होत आहेत. रविवारीही सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५३१ रुग्ण बरे झाले आहेत.

    ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात रुग्णवाढीचा दर ६ टक्कय़ांवरून ७ टक्कय़ांवर गेला होता. मात्र आता काही दिवसांपासून हा दर कमी होऊन ५ टक्कय़ांवर आला आहे.

    रविवारी मुंबईत ४१ हजार ११० चाचण्या झाल्या आणि ४०८ रुग्ण आढळले.

  • 25 Oct 2021 07:59 AM (IST)

    विकतच्या लसींसाठी पुणेकरांनी मोजलेत 141 कोटी

    पुणे -

    - विकतच्या लसींसाठी पुणेकरांनी मोजलेत 141 कोटी,

    - शहरात लसीकरणात 50 लाखापेक्षा जास्त डोसचा टप्पा पूर्ण,

    - यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफतची लस मिळाली आहे,

    - तर 35 टक्के पुणेकरांनी विकतची लस घेऊन स्वतःचे संरक्षण केले,

    - यासाठी तब्बल 1 अब्ज 41 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपयांचा खर्च.

  • 25 Oct 2021 07:58 AM (IST)

    सोलापुरात शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने 57 लाख 10 रुपयांची दिली मदत

    सोलापूर -

    शेतीपिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने 57 लाख 10 रुपयांची दिली मदत

    दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश

    चालू वर्षाच्या एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान

    अवकाळी पावसाने 40.30 हेक्टरवरील बागायती पिकांचे

    तर 286.90 हेक्टरवरील फळपिकांचे झाले होते नुकसान

    नुकसानीची रक्कम तहसीलदारांच्या खात्यावर जमा

  • 25 Oct 2021 07:58 AM (IST)

    नाशकात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोने स्वस्त

    नाशिक -

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोने स्वस्त

    गेल्या दिवाळीच्या तुलनेत 3500 रुपयांनी भाव कमी

    गेल्या दिवाळीत याच दिवशी सोनं 51000 प्रति तोळा..

    आज मात्र 47000 प्रति तोळा भाव..

    मात्र सोन्याचे दर येत्या दिवसात झपाट्याने वाढण्याचा सराफ व्यावसायिकांचा अंदाज

  • 25 Oct 2021 07:57 AM (IST)

    उड्डाणपुलाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती आज नागपुरात

    नागपूरातील कळमना उड्डाणपुल कोसळळ्याचं प्रकरण

    - उड्डाणपुलाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती आज नागपुरात

    - दिल्लीतील तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती करणार चौकशी

    - चौकशी समितीकडून कंसलटंट कंपनी, NHAI च्या अधिकाऱ्यांना विचारपूस करण्याची शक्यता

    - घटनेची जबाबदारी असलेल्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता

  • 25 Oct 2021 07:06 AM (IST)

    नाशकात विना हेल्मेट पेट्रोल देणाऱ्या 3 पंपाना नोटीस

    नाशिक - विना हेल्मेट पेट्रोल देणाऱ्या 3 पंपाना नोटीस

    पोलीस आयुक्तांच्या कारवाईने पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणले

    नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिमेला पेट्रोल पंप चालक खो देत असल्याच्या तक्रारी

    पंपाचा परवाना रद्द का करू नये ? असा जाब विचारणारी अशी नोटीस

    शहरातील प्रत्येक पंपावर सुरू आहे नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम

    आणखीही काही पेट्रोल पंपाना नोटीस मिळण्याची शक्यता

  • 25 Oct 2021 07:00 AM (IST)

    भारत पाकिस्तान सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा पोलिसांनी उधळला डाव

    - भारत पाकिस्तान सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा पोलिसांनी उधळला डाव

    - पोलिसांनी तब्बल १९ ठिकाणी नागपूर शहरातील बुकिंवर केली छापेमारी

    - डझनभर बुकी पोलीसांचा ताब्यात घेतल्याची माहिती

    - पोलीसांच्या धाकाने अनेक बुकिंवा घेतली शहराबाहेर धाव

    - यवतमाळ जिल्ह्यातील कुख्यात बुकिंही विदर्भातील विविध जिल्ह्यात सक्रिय झाल्याची माहिती

  • 25 Oct 2021 06:54 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर

    उत्तर प्रदेश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर

    5200 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मोदी करणार

    आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राकडून उत्तर प्रदेश साठी मोठ्या योजना

    आज दुपारी वाराणसीमध्ये मध्ये होणाऱ्या सभेलाही पंतप्रधान मोदी संबोधित करणार

    आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचाही पंतप्रधान मोदी शुभारंभ करणार

  • 25 Oct 2021 06:50 AM (IST)

    नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अयोध्या दौर्‍यावर

    नवी दिल्ली

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अयोध्या दौर्‍यावर

    केजरीवाल उद्या घेणार रामलल्लाचे दर्शन

    उत्तराखंड आणि गोव्याप्रमाणे पाणी शिक्षण वीज याबाबत केजरीवाल काय घोषणा करणार ?

    उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आप पक्षाकडून जोरदार तयारी

    अरविंद केजरीवाल दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर

  • 25 Oct 2021 06:49 AM (IST)

    मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, वाद्रें-कुर्ला संकुल परिसर सर्वाधिक प्रदुषित

    मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली

    वाद्रें-कुर्ला संकुल परिसर सर्वाधिक प्रदुषित

    प्रदुषणाची पातळी 200 एक्युआयच्या जवळ

    दिवाळी दरम्यान फटाक्यांमुळे प्रदुषणाती पातळी वाढण्याची भीती

    कुलाबा-वरळी-बोरिवली - चेंबुर - मलाड - अंधेरी- आणि नवी मुंबईतील हवा गुणवत्ता

    निर्देशांकस 100 च्या खाली समाधानकारक नोंदवला गेला

  • 25 Oct 2021 06:49 AM (IST)

    राष्ट्रीयकृती बँकांच्या खासगीकरणासाठी विधेयक मांडणार

    दिल्ली

    राष्ट्रीयकृती बँकांच्या खासगीकरणासाठी विधेयक मांडणार

    केद्रं सरकार संसदेच्या हिवाळी आधिवेशनात दोन आर्थिक क्षेत्र विधेयक सादर करणार

    केद्रींय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणासाठी

    कायदा करण्याची केली होती घोषणा

Published On - Oct 25,2021 6:31 AM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.