Maharashtra News LIVE Update | धुळे-मुंबई-आग्रा महामार्गवर भीषण अपघात, 7 ते 8 वाहने एकमेकांवर धडकले

| Updated on: Oct 27, 2021 | 11:42 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | धुळे-मुंबई-आग्रा महामार्गवर भीषण अपघात, 7 ते 8 वाहने एकमेकांवर धडकले
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Oct 2021 10:44 PM (IST)

    धुळे-मुंबई-आग्रा महामार्गवर भीषण अपघात, 7 ते 8 वाहने एकमेकांवर धडकले

    धुळे-मुंबई-आग्रा महामार्गवर भीषण अपघात, 7 ते 8 वाहने एकमेकांवर धडकले, 4 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता, पोलीस घटनास्थळी दाखल, बीजासण घाटात झाला अपघात

  • 27 Oct 2021 09:50 PM (IST)

    यास्मिन वानखेडे यांची ओशिवरा पोलीस ठाण्यात मंत्री नवाब मलिकांविरोधात लेखी तक्रार

    मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते नबाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.

    यास्मिन वानखेडे यांनी केंद्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगालाही पत्र लिहले आहे.

    त्यांनी आपल्या कुटुंबाचं सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल मंत्री नबाब मलिक यांच्यावर 354D (stalking), 499(Defamation), सहित अन्य कलमाखाली गुन्हा नोंद करण्यासाठी लेखीपत्र 22 ऑक्टोबर रोजी दिलं आहे.

  • 27 Oct 2021 09:48 PM (IST)

    बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभागाचा छापा

    बुलडाणा :

    बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभागाचा छापा

    पोलिसांचा बँकेबाहेर बंदोबस्त

    बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या बंगल्यावरही आयकरचे अधिकारी दाखल,

    तपासणीत काय बाहेर येणार याची उत्सुकता

    तर नेहमीप्रमाणे तपासणी असल्याचे आयकर अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

  • 27 Oct 2021 09:02 PM (IST)

    आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अविन शाहू यांचा काहीही संबंध नव्हता, वकिलांचा दावा

    अविन शाहूंच्या वकिलांची प्रतिक्रिया :

    आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अविन शाहू यांचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे.

    फक्त गांजा मिळाल्याचा आरोप होता, खाण्याच्या बाबतीत काही मिळाले नाही, वॉट्सअॅप चाट मिळाले नाहीत, कोणत्याही पेडलरशी संपर्क नाही

    कंझमशन रोल होता, पण यामुळे जेलमध्ये ठेवणे उचित नव्हते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयात आम्ही मांडले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन दिला असल्याचे अविन शाहू यांच्या महिला वाकीलाने सांगितले आहे.

  • 27 Oct 2021 08:00 PM (IST)

    आर्यन प्रकरणात आता हॅकर मनिष भंगाळेची एन्ट्री, पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी पाच लाखांची ऑफर दिल्याचा दावा

    आर्यन प्रकरणात आता हॅकर मनिष भंगाळेची एन्ट्री, पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी पाच लाखांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा मनिष भंगाळेने केला आहे. यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यास त्याने सांगितलं आहे.

    मनिष भंगाळेने टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली, ते नेमंक काय म्हणाले?

    माझ्या इथे जळगावला 6 ऑक्टोबरला दोन जण आले होते. आलोक जैन आणि शैलेश चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. त्याने काही नंबर सांगितलं. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होतं. त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते. तसेच त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सअॅपचॅट आहे. ते मॉडीफाय करुन टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मोबाईलमध्ये जी फाईल या संदर्भातील होती ती आर्यन खान व्हॉट्सअॅप चॅट या नावाने होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितला. तसेच यासाठी पाच लाख देऊ असं सांगितलं. तसेच मुंबईत भरपूर काम देऊ. मोठमोठे केंद्रीय मंत्री आमच्या संपर्का आहेत. तुमची लाईफ बनून जाईल, असं सांगितलं. हा सगळा प्रकार मला विचित्र वाटला. त्यांनी मला दहा हजार रुपये दिले. मी ते घेऊन निघून आलो. मी त्यांचे नंबर ट्रू कॉलरला चेक केलं तर सॅम डिसूजा म्हणून दिसलं. याबाबत मी मुंबई पोलिसांना, केंद्रीय गृहमंत्रालय तसेच महाराष्ट्र गृहमंत्रालयाला पाठवलंय.

  • 27 Oct 2021 07:55 PM (IST)

    एमपीएससीकडून अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी,

    एमपीएससी आयोगानं अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा केल्या जाहीर,

    4 सप्टेंबरला झाली होती एमपीएससी संयुक्त पुर्व परीक्षा,

    तीन महिने आधी मुख्य परीक्षेच्या एमपीएससीनं तारखा केल्या जाहीर,

    PSI, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या पदांसाठीची होणार मुख्य परीक्षा,

    22 जानेवारी 2022 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार गट ब च्या मुख्य परीक्षा,

    एमपीएससीनं वेळापत्रक केलं प्रसिद्ध

  • 27 Oct 2021 06:49 PM (IST)

    के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी चौकशीसाठी सामोरं यावं : ज्ञानेश्वर सिंह

    एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    आज पाच सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली. आम्ही इथल्या युनिटला विनंती केली होती की, जे मुख्य पंच आहेत प्रभाकर साईल आणि के. पी. गोसावी यांना नोटीस पाठवली जावी. त्यांनी मीडियात जे काही तथ्य सांगितले आहेत ते समितीपुढे मांडावे. पण आमच्या प्रयत्नानंतरही त्यांना नोटीस पाठवता आलेली नाही. मी मीडियाच्या माध्यमातून के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी. आम्ही आज समीर वानखेडे यांचा जवळपास साडेचार तास जबाब नोंदवला. येत्या काळात त्यांची आणखी काही मदत घेतली जाईल. या तपासाला पुढे चालू राहू द्यावं.

    गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावे. आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळा होता. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जातोय. त्यामुळे त्यांना नोटीस पोहोचली नाही. त्यांनी उद्या-परवा या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन आपली बाजू मांडावी.

  • 27 Oct 2021 06:44 PM (IST)

    राज्यात मातोश्री ग्रामसमृध्दी शेत-पाणंद रस्ते योजना राबविणार, मंत्रिमंडळ बैठकीतील पाच महत्त्वाचे मुद्दे

    मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात :

    • कोविडमुळे इमारती किंवा जमिनीचे भांडवली मूल्य 2021-22 मध्ये सुधारीत न करण्याचा निर्णय. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलमात सुधारणा करणार (नगर विकास विभाग)

    • सांगली जिल्ह्यातील वाकुडे उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)

    • मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेतील अतिरिक्त तुकडांना २० टक्के वाढीव अनुदान देण्याचा निर्णय. (शालेय शिक्षण विभाग)

    • मुंबई शहर व उपनगरात १२ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या वीज पुरवठा खंडीत घटनेबाबत वीज कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल. (ऊर्जा विभाग)

    • महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. (नगर विकास विभाग)

    • राज्यात मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना राबविणार. ( रोहयो विभाग )

  • 27 Oct 2021 06:42 PM (IST)

    राज्यमंत्री बच्चू कडू यांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्पर्धा परीक्षांसदर्भात पत्र

    राज्यमंत्री बच्चू कडू यांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना स्पर्धा परीक्षांसदर्भात पत्र

    सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची केली मागणी,

    राज्य शासकीय सेवेतील सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, अराजपत्रित गट ब व इतर गटांची पदं ही एमपीएससी मार्फत भरा,

    आरोग्य विभागातील परीक्षेच्या गोंधळानंतर सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार मागणी,

    मागणीचं पत्र दिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना

  • 27 Oct 2021 06:41 PM (IST)

    एनसीबीच्या कारवाईत पंच राहिलेल्या फ्लेचर पटेल यांचीही चौकशी होणार

    फ्लेचर पटेल यांनाही दिल्लीहून आलेले एनसीबीचे अधिकारी चौकशीला बोलावणार असल्याची सुत्रांची माहीती

    फ्लेचर पटेल हे तीनवेळा एनसीबीच्या कारवायांमध्ये पंच राहील्याने नवाब मलिक यांनी त्याच्याही उपस्थितीवर सवाल केले होते

    जवळच्या लोकांनाच समीर वानखेडे पंच बनवत असल्याचा मलिकांचा आरोप होता

    समीर वानखेडे यांचे फ्लेचर पटेल यांच्याशी मैत्रीपूर्वक संबंध आहेत. समीर वानखेडे यांना डाॅ. शबाना कुरेशीकडून एक 7 वर्षाचा मुलगा आहे, ज्याला अनेकदा फ्लेचर पटेल यांनी बाईकवरून फिरवलंय, आजही फ्लेचर पटेल शबाना कुरेशीच्या संपर्कात

    पंच राहण्यासाठी फ्लेचरवर कोणत्या प्रकारचा दबाव होता का?, या अनुशंघाने एनसीबी करणार तपास

  • 27 Oct 2021 06:38 PM (IST)

    मुंबई शहर आणि उपनगरात वीजपुरवठा खंडीत झाल्या प्रकरणी उपाययोजना संदर्भातील अहवाल सादर

    ऊर्जा विभागाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर

    मुंबई शहर आणि उपनगरात वीजपुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उपाययोजना संदर्भातील अहवाल सादर

    पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार

    अतिसंवेदशील भागात २५ द्रोण कॅमेरा निगराणी करणार

    आतापर्यंत १५० सीसीटिव्ही कॅमेरे आहेत त्यात आणखी १३९ कमेरे वाढवण्यात आले आहेत

    ऊर्जा विभागाची कंट्रोल रूम तयार केली जाणार

    मेंटनस संदर्भात नवीन एसोपी तयार करणार

  • 27 Oct 2021 03:33 PM (IST)

    'जलयुक्तला सरकारची क्लिनचिट नाहीच'

    काल २७ आक्टोबर, २०२१ रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी सचिवांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे सदर बातमी प्रसृत करण्यात आलेली आहे. परंतु, CAG ने उपस्थित केलेल्या मुद्दयांवर सचिवांनी आपली साक्ष नोंदविलेली आहे व ही आकडेवारी योजनेची आमलबजाणी करणा-या यंत्रणेने स्वतः दिलेली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपा आमदार  सुधीर मुनगंटीवार आहेत.

    या अभियानाची सविस्तर चौकशी करण्यासाठी शासनाने SIT नेमलेल होती. त्याप्रमाणे सुमारे ७१% कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सदर SIT च्या अहवालाप्रमाणे शासनाने सर्व जिल्हाधिका-यांना चौकशीचे आदेश यापुर्वीच दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी SIT च्या निकषाप्रमाणे चौकशी  अहवाल सादर केलेला नाही . ही सर्व चौकशी चालू असतांना शासनाने जलयुक्त शिवार अभियानाला क्लिनचिट देण्याचा प्रश्न येत नाही .

  • 27 Oct 2021 03:17 PM (IST)

    माझ्याही जीवाला धोका, एनसीबीच्या एका कारवाईत साक्षीदार असलेल्या शेखर कांबळेचा दावा

    नवी मुंबई :

    - शेखर कांबळे कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोहोचला

    - पोलीस ठाण्यात नोंदवणार जबाब

    - आपल्या जीवाला धोका आहे, असा शेखरचा आरोप

    - आपल्याला सुरक्षा रक्षक द्यावेत अशी मागणी

    - एनसीबीच्या प्रकरणात पंच असल्याने आपल्याही कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा पंच शेखर कांबळेचा आरोप

    - पोलिसांकडून शेखरचा जबाब नोंदवणं सुरु

  • 27 Oct 2021 02:37 PM (IST)

    तरुणाईपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात तरी कसे? : पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    तरुणाईपर्यंत अंमली पदार्थ पोहोचतात तरी कसे?

    मध्यप्रदेशात खूप छान प्रतिसाद आहे. मुंडे सांहेबांची कन्या म्हणून राज्यात जेव्हा सन्मान मिळाला तसाच सन्मान मिळाला. तिथली संघटना खूप चांगली आहे.

  • 27 Oct 2021 02:27 PM (IST)

    समीर वानखेडेंचा जबाब नोंदवला जातोय, साक्षीदारांचीदेखील चौकशी होणार : एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह

    आम्ही मुंबईत आलो आहोत. या कार्यालयातून काही कागदपत्रे एकत्र करण्यात आले आहेत. साक्षीदारला बोलवण्यात आलं आहे. या चौकशीबाबत सध्या रिअलटाईम माहिती आपल्याला देणं कठीण आहे. कारण एक संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणाशी संबंधित सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. समीर वानखेडेंचा जबाब नोंदवला जातोय. चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर आम्ही ज्या निष्कर्षावर येऊ ती माहिती आपल्याला दिली जाईल, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.

  • 27 Oct 2021 02:22 PM (IST)

    जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं थाळी आणि घंटानाद आंदोलन

    जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून आपल्या मागण्यांसाठी थाळी आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी या कर्मचाऱ्यांच्या वतीने 11 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मागण्यांमध्ये सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थ श्रेणीची रिक्त पदे सरळसेवेने तात्काळ भरण्यात यावी, अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट करण्यात यावी, 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले

  • 27 Oct 2021 02:12 PM (IST)

    के. पी. गोसावी अद्यापही देतोय पुणे पोलिसांना गुंगारा

    के. पी. गोसावी अद्यापही देतोय पुणे पोलिसांना गुंगारा

    गोसावीचा मोबाईल काल संध्याकाळ पासून बंद

    त्याच्या शोधासाठी आणखी एक पथक वाढवलं

    पुणे पोलिसांचे काळापासून एक पथक लखनऊ मध्ये तर दुसरे पथक फत्तेपुरसिक्री मध्ये घेत आहे गोसावीचा शोध

  • 27 Oct 2021 01:29 PM (IST)

    sameer wankhade is muslim : समीर वानखेडे मुस्लिमच, निकाह लावणाऱ्या मौलवींचा दावा

    मौलाना मुज्जमिल अहमद नेमकं काय म्हणाले?

    समीर आणि शबाना हे दोन्ही मुस्लीम असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं काझीनं निकाह लावला. जर दोन्हीपैकी एकजण मुस्लीम नसते तर त्यांचा निकाह झाला नसता. समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखे़डे हे मुस्लीम होते त्यामुळे त्यांचा निकाह झाला. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे. समीरच्या लग्नावेळी सर्वजण मुस्लीम असल्याचं सांगण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नावेळचा फोटो दाखवला असता तो देखील खरा असल्याचं मौलाना म्हणाले.

  • 27 Oct 2021 01:25 PM (IST)

    is sameer wankhede a mulim : समीर वानखेडे मुस्लिम आहेत का?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे.

  • 27 Oct 2021 01:24 PM (IST)

    Dr Shabana Qureshi : डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न आणि काही वर्षानंतर घटस्फोट, वानखेडे काय म्हणाले?

    मी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं आणि 2016 मध्ये आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केलं” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

  • 27 Oct 2021 01:23 PM (IST)

    Shabana Qureshi : समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव शबाना कुरेशी

    अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी लग्न करण्याअगोदर समीर वानखेडे यांनी मुस्लि असलेल्या शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केला होता. तशी माहिती त्यांनी दिलीय. मात्र काही वर्षानंतर दोघांच्याही परस्पर संमतीने आम्ही घटस्फोट घेतला, असंही त्यांनी सांगितलं.

  • 27 Oct 2021 01:20 PM (IST)

    sameer wankhede mother name : समीर वानखेडे यांच्या आईचं नाव काय?

    राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या लग्नाविषयी ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक माझ्या कुटुंबाची खाजगी माहिती सोशल मीडियावर पब्लिश करत असून आमची बदनामी होत आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी प्रेस नोट जारी करत केला आहे.

    “नवाब मलिक माझ्या कुटुंबाची खाजगी माहिती सोशल मीडियावर पब्लिश करत आहेत. माझे वडील स्टेट एक्साईज विभागात सिनिअर पीआय होते. ते 2007 मध्ये रिटायर्ड झाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हिंदू आहेत तर आई जहिदा मुस्लिम होती. आमचे धर्मनिरपेक्ष कुटुंब असून मला त्याचा अभिमान आहे. मी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं आणि 2016 मध्ये आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केलं” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

  • 27 Oct 2021 01:14 PM (IST)

    sameer wankhede 1st wife : समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोसोबतचा फोटो नवाब मलिक यांच्याकडून ट्विट

    समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोसोबतचा फोटो नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विट केलाय.

    या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना यांच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे

    स्वीट कपल म्हणत मलिकांकडून समीर शबाना यांचा फोटो ट्विट

  • 27 Oct 2021 12:46 PM (IST)

    समीर वानखेडेंचे वडील मुस्लिम होते - मौलाना मुज्जमिल अहमद

    मौलाना मुज्जमिल अहमद -

    समीर वानखेडेंचे वडील मुस्लिम होते

    सर्व मुस्लिम असल्याशिवाय निकाह होत नाही, सर्व मुस्लिम असतील तरच निकाह होतो

    जे लिहिलं आहे ते बरोबर आहे

    समीरने तलाक घेतला होता

    निकाहदरम्यान गवाह देखील मुस्लिम हवा असतो

    समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याने निकाह झाला होता

    समीर वानखेडे यांनी त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद लिहिलं होतं

    ज्यांनी समीर वानखेडे यांचा निकाह लावला होता त्या मौलाना मुज्जमिल अहमद यांनी ही माहिती टीव्ही-९ ला दिली आहे

  • 27 Oct 2021 12:40 PM (IST)

    चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्का-बुक्की आणि शाब्दिक चकमक

    चंद्रपूर : भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्का-बुक्की आणि शाब्दिक चकमक...

    चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातल्या शिवनेरी बालोद्यान या बगिच्यात तयार केलेल्या हॉल ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्यायला केला विरोध,

    बगिच्याला शिवनेरी नाव असतांना हॉल ला सावरकरांचे नाव नको अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची होती भूमिका,

    माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते हॉल चे उदघाटन सुरू असताना झाला वाद,

    काँग्रेस कार्यकर्त्यांची हंसराज अहिर यांनी समजूत काढल्यावर शमला वाद

  • 27 Oct 2021 12:12 PM (IST)

    पंच कसाही फोडता येतो - ज्ञानदेव वानखेडे

    ज्ञानदेव वानखेडे -

    पंचाचा आरोप खोटा

    पंच कसाही फोडता येतो

    त्याने कोऱ्या कागदावर सह्या कशा केल्या, प्रभाकर साईल हे काही लहान नाहीत, ते जाणता आहेत

    १५ दिवसांनंतर त्याने हे सर्व कसं काय काढलं?

    मी मलिकांविरोधात कोर्टात जाणार, दाद मागणार

  • 27 Oct 2021 12:07 PM (IST)

    ड्रग्जशी त्याचा कामाशी जातीचा, धर्माचा काय संबंध आहे हे मला कळत नाही - ज्ञानदेव वानखेडे

    ज्ञानदेव वानखेडे -

    गेल्या १०-१५ दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरुये

    माझ्याकडे सर्व सर्टिफिकेट आहेत

    ड्रग्जशी त्याचा कामाशी जातीचा, धर्माचा काय संबंध आहे हे मला कळत नाही

    नवाब मलिकांना काय म्हणायचं आहे, त्यांच्या मनात काय आहे कळत नाही

    मी सर्व प्रमाणपत्र आपल्यापुढे मांडले आहेत

    कुठल्या आकासापोटी हे करताहेत माहित नाही

    मंत्री असून ते असं का करताय हे काहीही समजत नाहीये

    हे आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मागे लागले आहेत

    आम्ही एक धर्मनिरपेक्ष कुटुंब आहोत मी एका मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं

    आईच्या सांगण्यावरुन त्याने मुस्लिम मुलीशी लग्न केलं

    स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार त्यांच्या लग्नाची नोंदणी झाली आहे

  • 27 Oct 2021 12:03 PM (IST)

    ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र दाखवलं

    समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे टीव्ही ९ मराठीवर लाईव्ह

    ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र दाखवलं

  • 27 Oct 2021 10:34 AM (IST)

    समीर वानखेडे स्वत: दुपारी 12 वाजता नवाब मलिकांच्या प्रश्नांना उत्तर देणार

    अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत,

    त्यावर आता समीर वानखेडे हे स्वत: दुपारी 12 वाजता उत्तर देणार आहेत

  • 27 Oct 2021 10:27 AM (IST)

    सॅम डिसुझा त्या व्हिडीओमध्ये नाही - नवाब मलिक

    नवाब मलिक -

    सॅम डिसुझा त्या व्हिडीओमध्ये नाही

    सॅम डिसुझा किरण गोसावीचा मित्र

    त्याने पैसे कलेक्ट केले होते

  • 27 Oct 2021 10:17 AM (IST)

    पार्टीतील दाढीवाला आंतरराष्ट्रीय माफिया, तो समीर वानखेडेंचा मित्र - नवाब मलिक

    नवाब मलिक -

    पार्टीतील दाढीवाला आंतरराष्ट्रीय माफिया, तो समीर वानखेडेंचा मित्र

    त्यांनी तो मित्र कोण, हे जाहीर करावं.

    नाहीतर मी सार्वजनिक करेनच आणि या देशाचं संविधान त्याला शिक्षा करेन, मी नाही

    जर त्यांनी ही सगळी नावं जाहीर केली नाही तर मी व्हिडीओ सगळ्यांसमोर आणणार

  • 27 Oct 2021 10:12 AM (IST)

    मी दाखवलेला दाखला जर खोटा असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन - नवाब मलिक

    माझा लढा हा धर्माविरोधात नाही तर त्यांनी कशा चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलीये

    खोटा जातीचा दाखला घेऊन त्यांनी नोकरी मिळवली, हा माझा स्पष्ट आरोप आहे

    एक अनुसूचित वर्गातील व्यक्ती झोपडीत राहून युपीएससीची तयारी करत होता, त्याची नोकरी समीर वानखेडेने हिसकावून घेतली आहे

    जर एका समीरला असा फर्जीवाडा करुन नोकरी मिळत असेल तर 15 कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का? नवाब मलिक यांचा सवाल

    मी दाखवलेला दाखला जर खोटा असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन

    जात प्रमाणपत्र पडताळणी याची चौकशी करावी

  • 27 Oct 2021 10:11 AM (IST)

    क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल - नवाब मलिक

    नवाब मलिक -

    प्रभाकरने व्हिडीओद्वारे सगळा घटनाक्रम समोर आणलाय

    या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे

    क्रूझ पार्टीची पोलिसांकडून परवानगी घेतली नाही

    क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही मागवा

    त्याची प्रेमिका बंदूकीसह क्रूझवर होती

    एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे

    क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल

    समीर वानखेडे यांच्या मालदीव दौऱ्याची चौकशी व्हावी

  • 27 Oct 2021 10:05 AM (IST)

    वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर यांचा सीडीआर तपासावा नवाब मलिक यांची एनसीबीकडे मागणी

    वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर यांचा सीडीआर तपासावा नवाब मलिक यांची एनसीबीकडे मागणी

    क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय माफियांचा समावेश

    तो कोण आहे हे एनसीबीला माहिती आहे

    आता एनसीबीने पावलं उचलावीत

  • 27 Oct 2021 10:05 AM (IST)

    निनावी पत्राची दखल घ्यायलाच हवी - नवाब मलिक

    नवाब मलिक पत्रकार परिषद -

    मला काल एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या निनावी पत्र मिळालं, पहिल्यांदा म्हटले याची दखल घेऊ, नंतर मी हे पत्र एनसीबी डीजींना पत्र पाठवलं. आरोपांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे, कारण आरोप खूपच गंभीर आहेत.

    मला वाटतं एवढी मोठी इनव्हिस्टिगेश एजन्सी आहे, आमच्यापुढेही जाऊन चार पावलं काम करेल, अशी अपेक्षा

    निनावी पत्राची दखल घ्यायलाच हवी, ज्या विषयावरुन मी आरोप करतोय, त्याकडेही एनसीबीने दुर्लक्ष करु नये

  • 27 Oct 2021 09:31 AM (IST)

    बारामती-इंदापूर रस्त्यावर इनोव्हा आणि ट्रॅक्टरची धडक, ट्रॅक्टर चालकाचा चिरडून मृत्यू

    बारामती : बारामती-इंदापूर रस्त्यावर इनोव्हा आणि ट्रॅक्टरची धडक..

    - अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चिरडून मृत्यू..

    - इंदापूर-बारामती रस्त्यावरील जाचकवस्तीनजिक ओढ्यावरील पूलावर झाला अपघात..

    - अपघातात ट्रॅक्टरची दोन्ही चाके तुटली..

    - अरुंद पूलामुळे सातत्याने होताहेत अपघात

  • 27 Oct 2021 09:04 AM (IST)

    दिवाळीमुळे बारामतीच्या बाजारपेठेत गर्दी वाढली

    बारामती

    - दिवाळीमुळे बारामतीच्या बाजारपेठेत गर्दी वाढली..

    - कोरोनाचा कहर कमी झाल्याने बाजारपेठेत गर्दी..

    - अनेकांकडून होतेय कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन..

    - विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोरोना संसर्गाचा धोका..

    - गर्दी नियंत्रणात आणण्यासह कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज

  • 27 Oct 2021 09:03 AM (IST)

    बारामतीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

    बारामती :

    - बारामतीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल..

    - बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला कमी..

    - कोरोना रुग्णांचे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी..

    - आरोग्य यंत्रणेने राबवली होती गावोगावी तपासणी मोहिम..

    - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरीकांना दिलासा..

    - नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन..

    - गर्दी टाळल्यास बारामती तालुका होणार कोरोनामुक्त..

  • 27 Oct 2021 08:58 AM (IST)

    विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत उपोषणावर

    विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत उपोषण,

    वेतनवाढ, भत्ते, बोनस आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक,

    नागपूरात सकाळी 10 वाजता कर्मचारी करणार बेमुदत उपोषणाला सुरुवात,

    ऐन दिवाळीत उपोषणाचे हत्यार उपसल्यानं प्रवाश्यांचे होणार हाल?

  • 27 Oct 2021 08:42 AM (IST)

    रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार

    रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार

    निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्वपक्षीयांचे प्रयत्न असफल

    निवडणूक बिनविरोध करण्यास सर्वपक्षीयांचा विरोध

    21 पैकी 12 जागांवर निवडणूक; तर 9 उमेदवार बिनविरोध

    निवडणूक बिनविरोध करण्यास भाजप नेते निलेश राणेंनी केलेला विरोध

  • 27 Oct 2021 08:39 AM (IST)

    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळेचे निर्बंध शिथिल

    सातारा -

    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळेचे निर्बंध झाले शिथिल

    हॉटेल रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मिळाली परवानगी

    इतर सर्व आस्थापना सुरू ठेवण्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत मिळाली परवानगी

    सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले आदेश

  • 27 Oct 2021 08:39 AM (IST)

    तोंडोळी सामूहिक बलात्कार प्रकरण, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून आणखी तीन आरोपींना अटक

    औरंगाबाद -

    तोंडोळी सामूहिक बलात्कार प्रकरण

    औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून आणखी तीन आरोपींना अटक

    दोन आरोपींना वैजापूर येथून तर एका आरोपीला मुंबईत अटक

    उसाच्या फाडत लावलेल्या आरोपीला वेषांतर करून केले अटक

    तर एका आरोपीचा तीन किलोमीटर पाठलाग करत आवळल्या मुसक्या

    तोंडोळी गावातील शेतवस्तीवर मजूर महिलांवर केला होता सामूहिक बलात्कार

  • 27 Oct 2021 08:09 AM (IST)

    भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या संरक्षण मंत्री

    भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या संरक्षण मंत्री

    भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

    कॅनडा देशात नवे मंत्रिमंडळ जाहीर

    पंतप्रधान जस्टिन तृडो यांनी जाहीर केलं मंत्रिमंडळ

    नव्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या कॅनडाच्या नागरिक अनिता आनंद यांची संरक्षण मंत्री पदी निवड

  • 27 Oct 2021 07:33 AM (IST)

    नाशिक-सिन्नर तोल प्रशासनाला 2 कोटी 18 लाखांचा दंड, महामार्गाचे काम वेळेत न केल्याने दणका

    नाशिक -

    नाशिक-सिन्नर तोल प्रशासनाला दंड

    तब्बल 2 कोटी 18 लाखांचा दंड

    महामार्गाचे काम वेळेत न केल्याने दणका

    खासदार हेमंत गोडसे यांच्या तक्रारीवरून कारवाई

    राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून चेतक इंटरप्रायसेस च्या टोल प्रशासनाला दंड

  • 27 Oct 2021 07:32 AM (IST)

    सोलापुरात पालखी मार्ग भूसंपादनावरुन शेतकरी न्यायालयाच्या वाटेवर

    सोलापूर -

    पालखी मार्ग भूसंपादनावरुन शेतकरी न्यायालयाच्या वाटेवर

    आळंदी- मोहोळ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील भूसंपादन प्रकरणावरून दोन वर्षापासून प्रशासन व शेतकरी यांचा वाद

    लवादाचा निकाल लागल्याशिवाय रस्ता करून देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी घेतला होता निर्णय

    मात्र लवादात  योग्य न्याय मिळाला नसल्यामुळे न्यायालयात दाद मागण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

  • 27 Oct 2021 07:30 AM (IST)

    औरंगाबाद शहरात 15 दिवसांची जमावबंदी लागू

    औरंगाबाद -

    औरंगाबाद शहरात 15 दिवसांची जमावबंदी लागू

    पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या आदेशाने जमावबंदी लागू

    औरंगाबाद शहराच्या हद्दीत 15 दिवसांची जमावबंदी

    27 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार जमावबंदी

    सणासुदीच्या काळात जनजीवन सुरळीत राहण्यासाठी लावली जमावबंदी

    जमावबंदी काळात आंदोलने, मोर्चे, शस्त्र बाळगणे, लोक एकत्र करण्यावर पूर्णपणे बंदी

  • 27 Oct 2021 07:08 AM (IST)

    कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार

    कोल्हापूर

    कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार

    नगरसेवकांची संख्या 81 वरून 95 वर जाण्याचा अंदाज

    त्रीसदस्यीय प्रभाग रचने नंतर आता लोकसंख्येवर आधारित सदस्य संख्या वाढवण्याचा नगर विभागाचा प्रस्ताव

    प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राजकीय समीकरण ही बदलणार

  • 27 Oct 2021 07:07 AM (IST)

    खासगी वाहतूकदारांच्या भाडेदराबाबत विरोधात तक्रार नोंदवता येणार

    पुणे -

    - खासगी वाहतूकदारांच्या भाडेदराबाबत विरोधात तक्रार नोंदवता येणार,

    - खासगी प्रवासी बसेसमधून प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी,

    - मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी वायुवेग पथकांना आदेश,

    - उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती.

  • 27 Oct 2021 06:59 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थगित

    - नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थगित

    - पंचायत समिती सभापतीची निवडणूकंही स्थगित

    - नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मागीतले मार्गदर्शन

    - पोटणीवडणूकीनंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पं.स. सभापतींची निवड करायची होती

    - जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केली निवडणुक काल केली स्थगित

  • 27 Oct 2021 06:59 AM (IST)

    समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर नवाब मलिक ठाम

    समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर नवाब मलिक ठाम.

    वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडेन.

    मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांनाही दिले खुले आव्हान.

    कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत.

    वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले असून हे आरोप खोटे ठरल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी घोषणाच आता मलिक यांनी केली आहे…

  • 27 Oct 2021 06:49 AM (IST)

    हडपसर परिसरात बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

    - हडपसर परिसरात बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

    - सिरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे गोसावी वस्तीत आढळला होता बिबट्या

    - 24 तासाच्या आत वनविभागाला बिबट्याला सुरक्षित पकडण्यात यश

    - मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याने केला होता हल्ला

    - पायाला आणि गालाला पंजे लागल्यानं तरुण जखमी

  • 27 Oct 2021 06:45 AM (IST)

    अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांची धडक कारवाई 

    - अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांची धडक कारवाई

    - सहा तासांत पोलिसांनी तब्बल ६६ आरोपींना घेतलं ताब्यात
    - एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
    - नागपूरात अमली पदार्थाची तस्करी वाढल्याने, गुन्ह्यातंही वाढ
    - नागपूर पोलीस आयुक्तांच्या आदेशानं पोलीसांची धडक कारवाई
    - पाच जणांना अमली पदार्थ बाळगताना, तर ६१ जणांना अमली पदार्थ सेवन केल्यामुळे घेतलं ताब्यात
    - आधी क्रिकेट बुकी आणि अमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई
    - नागपूर पोलीसांची दोन दिवसांत दोन धडक कारवाई
  • 27 Oct 2021 06:41 AM (IST)

    प्रभाकर सईल यांचा आरोपांसंदर्भात मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला

    प्रभाकर सईल यांचा आरोपांसंदर्भात मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला

    रात्री २:४५ वाजतापर्यंत पोलिसांनी प्रभाकर सईलचा जबाब नोंदवला

Published On - Oct 27,2021 6:39 AM

Follow us
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.