Maharashtra Breaking Marathi News Live | खोटं आणि हिंसा कशी करावी हे शाखेत शिकवलं जात; हुसेन दलवाई

| Updated on: Jun 11, 2023 | 7:05 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | खोटं आणि हिंसा कशी करावी हे शाखेत शिकवलं जात; हुसेन दलवाई
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 30 मे ते 30 जून या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘विशेष जनसंपर्क अभियान’ राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून भिवंडीत अनेक कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. तर नांदेड येथील भाजपच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संबोधित करणार. भाजप- शिंदे गटातील मोठा वाद बाहेर. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची राजीनामा देण्याची धमकी. राज्यात पुणे, परभणीत मान्सून पूर्व पावसाचं आगमन. अनेक ठिकाणी पाणीच पाणी. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jun 2023 10:43 PM (IST)

    खोटं आणि हिंसा कशी करावी हे शाखेत शिकवलं जात; हुसेन दलवाई

    चिपळूण : चिपळूणमधील काँग्रेस कार्यालय उद्घाटनप्रसंगी हुसेन दलवाई यांनी टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर फक्त चार गोष्टी शिकवल्या जातात म्हणत आरएसएसकडून हिंसेचे समर्थन केले जाते अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. खोटं कसं बोलावं, हिंसा कशी करावी आणि द्वेष कसा करावा याचं प्रशिक्षणही शाखेत शिकवलं जातं अशी टीका हुसेन दलवाई यांनी भाजप आणि आरएसएसवर केली आहे.

    आरएसएसच्या कार्यालयात राष्ट्रवाद शिकवला जातो तसेच मनुस्मृतीही शिकवली जाते असा घणाघात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला आहे.

  • 10 Jun 2023 09:47 PM (IST)

    मुंबईत ५० कोटींचे ड्रग्स पकडले

    मुंबई : एनसीबीने डोंगरी परिसरात मोठी कारवाई करत 50 कोटींचे ड्रग्स पकडले आहे. एनसीबीचे मागच्या काही दिवसात केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जातीय. डोंगरी परिसरात ड्रग्स संदर्भातल्या अनेक मोठ्या कारवाया मुंबई पोलीस आणि एनसीबीकडून केल्या जातात. मात्र एनसीबीने काल केलेली ही कारवाई पाहता या कारवाईनंतर काही कनेक्शन्स उघड होण्याची शक्यता आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत 45 ते 50 कोटी किमतीचे 20 किलो एमडी ड्रग्स, 1 कोटी 10 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आलेत.

    एनसीबीकडून या प्रकरणात एकूण तिघांना अटक केलीय. त्यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपी महिला या प्रकरणात मास्टरमाईड असल्याचं बोललं जातंय. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घवाटे यांच्या नेतृत्वात डोंगरीतली ही मोठी कारवाई करण्यात आलीय.

  • 10 Jun 2023 09:22 PM (IST)

    कांदा व्यापाऱ्यांचे तीन कांदा शेड भूईसपाट

    लासलगावसह परिसरात संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दोन कांदा व्यापाऱ्यांचे तीन कांदा शेड भुईसपाट झाले. हे शेड पडले असून, कांद्यासह शेडचे अंदाजे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी शेतात काढून पडलेल्या कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा, लिंगा, देगाव, वाडी रायताळ परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली. रिसोडच्या लिंगा येथील ज्ञानबाराव देशमुख या शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यामुळे शेतातील टीनशेड आणि सोलर पॅनल जमिनदोस्त होऊन उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

  • 10 Jun 2023 09:13 PM (IST)

    साताऱ्यात १०० जणांचे हरवलेले मोबाईल फोन पोलिसांनी केले परत

    सातारा जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन गहाळ झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हरविलेल्या मोबाईलची तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली.

    विविध कंपन्यांचे वीस लाख दहा हजार रुपये किमतीचे एकूण100 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

  • 10 Jun 2023 08:59 PM (IST)

    "भाजपचा 'हाच' छुपा मनसुबा होता", अमित शाह यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर

    मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथील सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शाह यांच्या त्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    "आज नांदेडमध्ये बोलताना अमित शहा म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे ठरले होते आणि तीच आमची इच्छा होती. जर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायची भाजपाची इच्छा होती तर मग फडणवीसंना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी भाजपाने का बसवले? भाजपाची अशी कोणती मजबुरी होती? की ज्यामुळे भाजपाने फडणवीसांचे सगळे कष्ट(?) विसरून शिंदेंना आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी पाचारण केले. भाजपाने फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले याचाच अर्थ असा की भाजपाचा फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यापेक्षा सुद्धा शिवसेना संपवणे हाच छुपा मनसुबा होता", असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

  • 10 Jun 2023 08:50 PM (IST)

    पुणे पोलीस अलर्ट, शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय

    पुणे : पुणे पोलिसांकडून शरद पवारांच्या दौर्‍यावेळी बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवारांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात असणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याशिवाय पवारांच्या खाजगी सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10 Jun 2023 08:45 PM (IST)

    आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर दौंडज खिंडीत एसटी बस-पिकअपचा भीषण अपघात

    पुणे : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर दौंडज खिंडीत एसटी बस आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

  • 10 Jun 2023 08:30 PM (IST)

    नंदुरबारमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस, खोकसा नदीला पूर

    नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. नवापूर तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊल पडला. विशेष म्हणजे खोकसा नदीला मान्सूनपूर्व पावसाने पूर आला. पावसामुळे मान्सूनपूर्वी करण्यात आलेल्या पेरणीच्या पिकांना चांगला फायदा होणार तर वादळवाड्यामुळे फळांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी विद्युत तारा पडल्याने वीजपुरवठा खंडीत झालाय.

  • 10 Jun 2023 08:00 PM (IST)

    Ajit Pawar | "मला महाराष्ट्रात राजकारणात..", अजित पवार काय म्हणाले?

    पुणे | "मला महाराष्ट्रात राजकारणात रस आहे, असं विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय. माझ्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. मी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतोय. सुप्रिया सुळे यांनी कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय हा कमिटीत झाला. विमान उशिरा आल्यामुळे हे सर्व झालं. मी अजिबात नाराज नाही",असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

    राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

  • 10 Jun 2023 07:41 PM (IST)

    Amit Shah Live | अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

    नांदेड | अमित शाह यांनी नांदेडमधील जाहीर सभेतून हल्लाबोल केलाय.  "उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला", अशा शब्दात शाह यांनी ठाकरेंवर घणाघात केला. तसेच  शाह यांनी ठाकरे यांना काही प्रश्न विचारले.

    •  समान नागरी कायदा बनायला हवा की नको?
    • ट्रिपल तलाक विरुद्ध कायदा हवा होता की नाही?
    • राम मंदिर बनायला हवं होतं की नाही?
    • मुस्लीम आरक्षण नको असं भाजपचं मत, ठाकरे यांना काय वाटतं?

    असे 4 प्रश्न अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना नांदेडच्या जाहीर सभेतून विचारले आहेत. आता या प्रश्नांना ठाकरे गटाकडून काय उत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

  • 10 Jun 2023 07:34 PM (IST)

    Amit Shah Live | कलम 370 हटवल्यानंतर कुणाची दगड फेकण्याची हिंमत नाही : अमित शाह

    नांदेड | " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवलं. कलम 370 हटवल्यानंतर कुणाची दगड फेकण्याची हिंमत झाली नाही" , असं अमित शाह नांदेडमधील जाहीर सभेत म्हणाले.

  • 10 Jun 2023 07:29 PM (IST)

    Amit Shah Live | अमित शाह यांचा यूपीए सरकारवर हल्लाबोल

    नांदेड | अमित शाह यांनी नांदेडमधील जाहीर सभेतून यूपीए आणि पर्यायाने विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय.  "सैनिकांवर हल्ले होत असताना मनमोहन सिंह चकार शब्द बोलले नाहीत. यूपीए सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार होतं", असं अमित शाह यांनी म्हटलंय.

  • 10 Jun 2023 07:25 PM (IST)

    Amit Shah Live | यूपीएचं सरकार हे सर्वात भ्रष्ट होतं : अमित शाह

    नांदेड |  "मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी महाराष्ट्रातील जनतेचे आणि नांदेडकरांचे आभार मानायला आलो आहे.  मोदीजींची 9 वर्ष ही विकासाची, गरीब कल्याणाची, भारताला सुरक्षित करण्याची आहेत. तसेच विकास काय असतो हे मोदींनी 9 वर्षात हे दाखवून दिलं. तसेच यूपीएचं सरकार हे सर्वात भ्रष्ट होतं", असं म्हणत अमित शाह यांनी  काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. ते नांदेदमध्ये बोलत होते.

  • 10 Jun 2023 07:20 PM (IST)

    Amit Shah Live | महाराष्ट्राला 1 नंबर बनवण्यात देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान : अमित शाह

    महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागंच्या विजयाचा संकल्प आहे, असं केंद्रीय गृहमंत्री यांनी नांदेडमधील सभेत म्हटलंय.  महाराष्ट्राला 1 नंबर बनवण्यात देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान आहे, असं म्हणत शाह यांनी फडणवीस यांचं कौतुक केलंय.

  • 10 Jun 2023 07:15 PM (IST)

    Devendra Fadnavis Nanded Live | राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार : देवेंद्र फडणवीस

    नांदेड | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमधून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "अशोक चव्हाण यांची मजल ही 2जी, 3जी आणि सोनियाजी पर्यंतच", असं म्हणत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलीय.

  • 10 Jun 2023 07:10 PM (IST)

    Devendra Fadnavis Live | महाराष्ट्रातील जनता मोदींच्यांच पाठीशी : देवेंद्र फडणवीस

    नांदेड | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.  तसंच महाराष्ट्रातील जनता ही नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी असल्याचं म्हटलं. फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली.  या जाहीर सभेतून फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या विकास कामाचा पाढा वाचून दाखवला.

  • 10 Jun 2023 06:58 PM (IST)

    अजित पवार दिल्लीहून पुण्यात दाखल होणार, नाराजीवर करणार भाष्य? 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. यामुळे अजित पवार हे नाराज झाल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. आता थोड्याच वेळात अजित पवार दिल्लीहून पुण्यात दाखल होणार आहेत. अजित पवार यावर आता काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याची नजर आहे. कारण सतत चर्चा आहे की, अजित पवार हे नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात अजित पवार हे सहभागी होणार आहेत.

  • 10 Jun 2023 06:52 PM (IST)

    पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस प्रशासन झाले सज्ज

    पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पालखी सोहळा बंदोबस्तासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह 6000 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. 12 आणि 13 जूनला संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे येथे मुक्कामी असणार आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तलयाकडून पालखीसाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी मार्ग, विसावा, मुक्कामाचे ठिकाण असणार CCTV च्या नियंत्रणात. पुणे शहरातील वाहतुकीचे बदल पुणे पोलिसांच्या वेबसाईट वर पहायला मिळणार आहेत.

  • 10 Jun 2023 06:47 PM (IST)

    ज्वेलर्समध्ये गोळीबार करून धाडसी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

    बालिंगा येथे घडलेल्या प्रकारानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण हे बघायला मिळाले होते. बालिंगा येथील ज्वेलर्समध्ये गोळीबार करून धाडसी चोरी करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघाया मिळाले. आता या प्रकरणात दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. 2 आरोपींकडून तब्बल 29 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  चोरट्यांनी 2 कोटी 6 लाख 84 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्याकडून 36 तासात चोरीचा छडा लावण्यात यश मिळाले आहे.

  • 10 Jun 2023 06:40 PM (IST)

    चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेला कॉन्स्टेबलने वाचवले

    गुजरातच्या वडोदरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडलीये. वडोदरा रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून पडलेल्या एका महिला प्रवाशाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेचे प्राण वाचवले आहेत. ही घटना 9 जून रोजी वडोदरा रेल्वे स्थानकावर घडली आहे, ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

  • 10 Jun 2023 06:37 PM (IST)

    गडचिरोलीत राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक

    गडचिरोलीत राष्ट्रवादी महिला कार्यकारणी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल समाज प्रसारमाध्यमावर जीव मारण्याची धमकी व आक्षेपार्थ विधान करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, या मागणी करीता महिला आघाडीचे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

  • 10 Jun 2023 06:24 PM (IST)

    अंबरनाथमधील एमआयडीसीतील ब्लू जेट कंपनीला आग

    अंबरनाथमध्ये एक मोठी घटना घडली आहे. अंबरनाथच्या वडोळ एमआयडीसीतील ब्लू जेट कंपनीला मोठी आग लागलीये. धक्कादायक बाब म्हणजे या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय. चार कामगार जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. कंपनीतील रिऍक्टरमध्ये अजूनही स्फोट होत असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटांमुळे पिवळ्या रंगाचा गॅस सर्वत्र पसरला असून या गॅसमुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • 10 Jun 2023 06:20 PM (IST)

    बच्चू कडू यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी

    आमदार बच्चू कडू यांनी नुकताच अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनची पाहणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सातत्याने त्यांच्याकडे तक्रारी येत होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात काही वार्डमध्ये एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. आता पुढे काय भूमिका आमदार बच्चू कडू हे घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

  • 10 Jun 2023 06:13 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक

    पुण्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. इतकेच नाही तर थेट जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केलीये. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची पुणे जिल्हा भाजप महिला आघाडीकडून मागणी केली जात आहे.

  • 10 Jun 2023 05:57 PM (IST)

    9 वर्षांत देशावर 155 लाख कोटींचे कर्ज

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत सर्वाधिक कर्जबाजारी झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. गेल्या 14 पंतप्रधानांना जे जमले नाही, ते मोदींनी 9 वर्षांत करुन दाखविल्याचा चिमटा काँग्रेसने घेतला. स्वातंत्र्यानंतर 14 पंतप्रधानांनी एकूण 55 लाखांचे कर्ज घेतले होते. तर मोदी सरकारच्या काळात कर्जाचा आकडा 155 लाख कोटींवर गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

  • 10 Jun 2023 05:42 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये दाखल

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप देशभर विविध कार्यक्रम आयोजीत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृहमंत्री शाह नांदेड दौऱ्यावर आले आहेत. 10,11 जून रोजी विविध चार राज्यात ते जाहीर सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा नांदेडमध्ये होत आहे. ही सभा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड मतदार संघात होत आहे, हे विशेष.

  • 10 Jun 2023 05:35 PM (IST)

    हावडा येथील डोमजूर येथील केमिकल फॅक्टरीत आग

    पश्चिम बंगालमधील हावडा येथील डोमजूरजवळ एका केमिकल फॅक्टरीत आग लागली. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

  • 10 Jun 2023 05:34 PM (IST)

    धार्मिक वाद जनता स्वीकारणार नाही

    राज्यात कोल्हापूर, अहमदनगर आणि इतर शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली. या घडामोडींवर शरद पवार यांना विचारणा केली असता, धार्मिक वाद जनता स्वीकारणार नाही. राज्यातील जनताच शिंदे-फडणवीस सरकारला धडा शिकवेल असे मत त्यांनी मांडले. या सरकारमधील काही नेत्यांची वक्तव्य वाद भडकवणारी असल्याचा आरोप ही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

  • 10 Jun 2023 05:28 PM (IST)

    अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले

    अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताला अर्थ नाही, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुप्रिया सुळे यांची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. गेल्या एक महिन्यापासून याविषयीची चर्चा पक्षातील सहकाऱ्यांमध्ये सुरु होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.

  • 10 Jun 2023 05:25 PM (IST)

    माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास, धमकीचा योग्य तपास होईल

    'तुमचा दाभोलकर करु ' या धमकीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. धमकीचा योग्य तपास होईल, असे पवार यांनी सांगितले. त्यांनी याविषयावर अधिक भाष्य करणे टाळले. काल ही धमकी देण्यात आली होती. शरद पवार, संजय राऊत, सुनील राऊत यांना धमकी देण्यात आली होती.

  • 10 Jun 2023 05:21 PM (IST)

    अजित पवार नाराज नाहीत

    अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी आहे. अजित पवार नाराज नाहीत. त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक सहकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी नसल्याने, लोकांच्या आग्रहाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. सुप्रिया सुळे या लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या लोकसभेतील अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. तसेच दिल्लीजवळच्या राज्यांमध्ये त्याचा फायदा होईल.

  • 10 Jun 2023 05:17 PM (IST)

    अध्यक्षपदाची जागा अजून रिक्त नाही

    राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आतापासूनच कोणाच्या नावाचा विचार केलेला नाही. अध्यक्ष पद अजून रिक्त झालेला नाही. अध्यक्ष पद रिक्त झाल्यावर त्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक सहकाऱ्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार नाराज असल्याबाबतच्या वृत्तात तथ्य नसल्याचा दावा पवार यांनी केला.

  • 10 Jun 2023 05:13 PM (IST)

    नवीन जबाबदारी देऊन संघटना मजबूत करणार

    पक्षातील सदस्यांवर नवीन जबाबदारी देऊन संघटना मजबूत करण्यात येणार आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच नवीन पदाची घोषणा करण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा विचार आधीपासूनच होता, असे पवार यांनी स्पष्ट केले.

  • 10 Jun 2023 05:09 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती

    लोकसभेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांशी समन्वय साधणार. त्यांना या निवडणुकीसाठी सोबत घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ज्याठिकाणी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी इतर पक्षाशी चर्चा करणार आहे. 23 जून रोजी पाटण्यात त्यासाठी समविचारी पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

  • 10 Jun 2023 05:06 PM (IST)

    सुप्रिया सुळे इतर राज्यातील जबाबदारी हाताळतील

    शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात दोन नवे कार्यकारी अध्यक्ष जाहीर केले. सुप्रिया सुळे लोकसभेत पक्षाची बाजू मांडतील. यासोबतच त्यात इतर राज्यातील जबाबदारी पण हाताळतील. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

  • 10 Jun 2023 05:03 PM (IST)

    शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली

    शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी पक्षात दोन नवीन पदाची निर्मिती केल्याची माहिती दिली. पक्षाचं काम इतर राज्यात वाढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 10 Jun 2023 04:55 PM (IST)

    मविआ आणि औरंगजेबचा डीएनए एकच असावा- चित्रा वाघ

    महाविकास आघाडी आणि औरंगजेब यांचा डीएनए एकच असावा, असं चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानेच राज्यात अराजकता पसरली असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. आव्हाड नाही तर गिधाड अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस असंही चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.

  • 10 Jun 2023 04:46 PM (IST)

    नाशिक पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या दोन महिला पदाधिकारी भिडल्या

    नाशिकमध्ये पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या दोन महिला पदाधिकारी भिडल्या. पोलीस ठाण्यातच या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे यांच्यात बाचाबाची झाली. शोभा मगर यांनी शिवीगाळ केल्याचा ताठे यांचा आरोप आहे.

  • 10 Jun 2023 04:39 PM (IST)

    अंबरनाथच्या वडोळ एमआयडीसीत रासायनिक कंपनीला मोठी आग

    अंबरनाथच्या वडोळ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग ब्लू जेट कंपनीला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण बदलापूर महामार्गावर या आगीमुळे धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 10 Jun 2023 04:34 PM (IST)

    नाटो युक्रेनला प्रगत तंत्रज्ञान आणि शस्त्रे असलेले रणगाडे देणार नाही

    भविष्यात युक्रेनला देण्यात येणाऱ्या रणगाड्यांबाबत नाटोने मोठा निर्णय घेतला आहे. रणगाड्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रे नसतील. हे तंत्रज्ञान रशियापर्यंत पोहोचण्याची भीती नाटोला आहे. हा कठीण निर्णय होता, मात्र पाश्चात्य देशांचे तंत्रज्ञान रशियाच्या हातात जाणार नाही, असे नाटो प्रमुखांनी म्हटले आहे.

  • 10 Jun 2023 04:24 PM (IST)

    अन्याय झाला असेल तर संबंधित व्यक्ती बोलेल - संजय राऊत

    "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडी आहेत. कोणावर काय अन्याय झाला ही ती व्यक्ती बोलेल ना, बाहेरच्यांनी का बोलावं. त्यांनी त्यांचं वकीलपत्र कोणाला दिले हे मला माहिती नाही. ते समर्थ आहेत. अजित पवार हे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. दोन्ही पदं खूप महत्त्वाची आहेत.", असं संजय राऊत यांनी सांगितलं.

  • 10 Jun 2023 04:14 PM (IST)

    अजित पवार यांना शह देण्यासाठी सुप्रिया सुळे यांना पद - प्रवीण दरेकर

    अजित पवार हे देशाचे नेते नाहीत. अजित दादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत. सुप्रियाताई खासदार आहेत आणि संसदेत आहेत. त्यांना देश पातळीवरील जबाबदारी दिली हे समजू शकतो. पण अजितदादांना शह देण्यासाठी त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारीही देण्यात आली आहे, असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

  • 10 Jun 2023 04:10 PM (IST)

    तुळजाभवानी मातेला 354 मौल्यवान हिरे अर्पण

    तुळजाभवानी मातेला भक्तांनी 354 मौल्यवान हिरे अर्पण केले आहेत. भक्तांनी अर्पण केलेल्या सोने- चांदी आदी दागिन्यांची सध्या मोजणी सुरू आहे. तुळजााभवानी मातेच्या सिंहासन दान पेटीतील सोने आणि चांदीची मोजली जात असताना भक्तांनी अर्पण केलेले हिरे सुद्धा सापडले आहेत. हिऱ्याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. करोडो रुपयांच्या किमतीचा अंदाज त्यामुळे येणार आहे. तब्बल 200 किलो सोने व 4 हजार किलो चांदीची मोजणी सुरु आहे.

  • 10 Jun 2023 04:06 PM (IST)

    अजित पवार यांना डावलल्याची भावना नाही - सुनेत्रा पवार

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदाचा पदभार दिला असल्याने अजित पवार यांना डावलल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चांवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं आहे. अजितदादांना डावलल्याची भावना नाही, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे.

  • 10 Jun 2023 03:34 PM (IST)

    संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालन्यात आगमन

    जळगाव येथील मुक्ताईनगर मधील संत मुक्ताईच्या पालखीचे आज मराठवाड्यामध्ये आगमन झालं. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर ही पालखी येताच दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली. विठु नामाच्या गजरात दिंड्यानी आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. 315 वर्षाची परंपरा असलेली संत मुक्ताईची पालखी देखील, २ जून पासून मुक्ताईनगर मधून रवाना झाली आहे. जवळपास 25 मुक्कामानंतर ही पालखी शेकडो किलोमीटरचे अंतर पार करत पंढरपूरला पोहोचणार आहे.

  • 10 Jun 2023 03:15 PM (IST)

    दंगलीच्या प्रकरणात पाकिस्तानचा हात आहे का ? शोध घ्या - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

    नांदेड - राज्यात सुरू असलेल्या दंगलीची चौकशी करावी, यात राज्य सरकारचा हात असण्याची शक्यता वाटत नाही. उलट औरंगजेब प्रकरणात पाकिस्तानचा जात आहे का ?, याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आम्हाला शांतता हवीये, त्यामुळेच जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 नंतर शांतता आहे, मात्र पाकिस्तान कुरापती करीत अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत आहे. मुस्लीमांनी सदैव आतंकवादाला विरोध करीत आले आहेत, सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही असेही ते म्हणाले.

    भालेराव या तरुणाची हत्या ; अशा घटना अशोभनीय

    नांदेड येथे भालेराव या तरुणाची लग्नाच्या वरातीत झालेली हत्या हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. नांदेड जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे, त्या गावात पहिल्यांदा आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाल्याने सवर्ण युवकांना राग होता. लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथे गिरिराज या युवकाची 3 हजार च्या वादातून हत्या झाली अशा घटना राज्यासाठी हिताच्या नाहीत. या गावातील भालेराव याच्या कुटुंबाचे दुसऱ्या गावात पुनर्वसन करावे अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 10 Jun 2023 03:01 PM (IST)

    आम्ही सर्व एकत्र आहोत - जयंत पाटील

    पक्ष वाढवण्यासाठी आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. पक्षात कोणतेही कौटुंबिक वाद नाहीत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

  • 10 Jun 2023 02:56 PM (IST)

    आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत - जयंत पाटील

    अजित पवारांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला आहे. शंकेला कुठेही जागा नाही. अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

    पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत , असेही पाटील यांनी नमूद केले.

  • 10 Jun 2023 02:44 PM (IST)

    मणिपूर शांतता समितीची स्थापना

    केंद्र सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमध्ये शांतता समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री, राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना शांतता समितीचे सदस्य म्हणून ठेवण्यात आले आहे.

    निवृत्त नोकरशहा, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय समूहांचे प्रतिनिधी यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.

  • 10 Jun 2023 02:31 PM (IST)

    अवैध दारू तस्करांवर कारवाई करणाऱ्या भरारी पथकावर दारू तस्करांचा हल्ला

    नवापूर येथे अवैध दारू तस्करांवर कारवाई करणाऱ्या मुंबई येथील भरारी पथकावर दारू तस्करांनी हल्ला केला आहे. कारवाईसाठी आलेल्या पथकाच्या इनोव्हा गाडीला स्कार्पिओने धडक देऊन कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    नवापूर पोलीस स्टेशन येथे वैभव गावित यांच्यासह दहा ते बारा जणांवर शासकीय कामात अडथळा आणि जीवेत ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात दारू तस्करी केली जात असल्याचे समोर येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 10 Jun 2023 02:19 PM (IST)

    सर्वांना विश्वासात घेऊन पवार साहेबांनी घोषणा केली आहे - रोहित पवार

    सर्व नेत्यांना विश्वासाात घेऊन पवार साहेबांनी ही घोषणा केली आहे. मी सुप्रिया ताई व प्रफुल पटेल यांचे अभिनंदन करतो. ते शरद पवारांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवतील, अशी खात्री आहे.

    आम्ही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे रोहित पवार म्हणाले.

  • 10 Jun 2023 02:03 PM (IST)

    निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय- छगन भुजबळ

    आगामी निवडणूका बघता पक्षाला अधीक मनुष्यबळाची गरज आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे काम विभागले जातील अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी दिली आहे. निवडणूका लक्षात घेता जास्तीत जास्त झपाट्याने काम व्हावं यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले.

  • 10 Jun 2023 02:03 PM (IST)

    पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध - सुप्रिया सुळे

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

  • 10 Jun 2023 01:53 PM (IST)

    कार्यकारी अध्यक्ष पदामुळे कामाचा भार वाटला जाईल- जितेंद्र आव्हाड

    शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. कार्यकारी अध्यक्ष पद दिल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे कामाचा भार वाटून घेतील असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 10 Jun 2023 01:43 PM (IST)

    माध्यमांशी न बोलताच अजित पवार निघून गेले

    राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षाची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी दिल्लीतून केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर माध्यमांनी अजित पवार यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता तेथून निघून गेले.

  • 10 Jun 2023 01:31 PM (IST)

    प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष

    शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रवादीमध्ये कार्यकारी अध्यक्ष हे पद नव्हते. या आधी शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील कार्यकारी अध्यक्षाच्या चर्चा दबक्या आवाजात होत होती, मात्र आज शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

  • 10 Jun 2023 01:20 PM (IST)

    राज्यातील निवडणूकांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर- शरद पवार 

    आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेने कंबर कसली आहे. राज्यातील निवडणूकांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली असल्याचे शरद पवार यांनी सांगीतले. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या 25 वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे मोठे निर्णय घेतले आहे.

  • 10 Jun 2023 01:13 PM (IST)

    भाजपकडून सत्तेचा गैरवापर- शरद पवार 

    राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. या निमीत्त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीतून कार्यकर्त्यांना संबोधीत करत आहेत. आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अल्पसंख्यकांमध्ये सत्ताधारी दहशत निर्माण करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तर दुसरीकडे भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचेही ते म्हणाले. जनतेला दिलेलं आश्वासन पुर्ण करण्यात भाजप अपयशी ठरल्याची टिका यावेळी शरद पवार यांनी केली.

  • 10 Jun 2023 12:59 PM (IST)

    अनेक राज्यांनी भाजपला नाकारलं आहे - शरद पवार

    शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला आहे. आतापर्यंताच्या सहकार्यासाठी सर्वांचं आभार देखील शरद पवार यांनी मानले आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी दिल्लीत वक्तव्य केलं आहे. पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते दिल्लीत कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत...

    भाजप त्यांच्याकडील अधिकारांचा गैरवापर करत आहे. आज देशात शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. आज देशात नव्या पिढी समोर बेरोजगारीची मोठी समस्या आहे. 9 वर्षांपूर्वी भाजपकडे सत्ता आली, पण त्यांनी केलेले दावे पूर्ण झाले नाहीत, आज देशातील वातावरण बदलत आहे. अनेक राज्यांनी भाजपला नाकारलं आहे.. असं वक्तव्य देखली शरद पवार यांनी केलं आहे.

  • 10 Jun 2023 12:52 PM (IST)

    मीरा रोड | सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी चित्रा वाघ डीसीपी कार्यालयात दाखल

    मिरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी भाजपनेत्या चित्रा वाघ मीरा रोडच्या डीसीपी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. मिरा भाईंदरचे डीसीपी जयवंत बसवले यांच्याशी भेटून सरस्वती वैद्य हत्याप्रकरणी माहिती घेत आहे. सध्या सर्वत्र सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी तुफान चर्चा रंगत आहे..

  • 10 Jun 2023 12:44 PM (IST)

    नितेश राणे यांच्या गाडी समोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची नारेबाजी

    भाजप आमदार नितेश राणे यांच्या गाडी समोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची नारेबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं आहे. नितेश राणे अमरावती दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसून आलं...

  • 10 Jun 2023 12:35 PM (IST)

    सौरभ पिंपळकर याने धमकी दिली नाही - चंद्रशेखर बावनकुळे

    सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असून त्याने धमकी दिली नाही.. असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर, 'तुमचा दाभोलकर करू ही धमकी नाही तर काय?' असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

    शरद पवार यांना आलेल्या धमकीमुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सौरभ पिंपळकर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून धमकी आल्यामुळे चर्चांना उधाण

  • 10 Jun 2023 12:27 PM (IST)

    सोलापूर | शेतकरी दिवस-रात्र राबतो मात्र त्याच्या कांद्याला भाव मिळत नाही - कांदा उत्पादक शेतकरी

    सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती. नाशिकच्या लासलगाव कांदा खरेदी केंद्राच्या बरोबरीने सोलापूर जिल्ह्यात कांद्याची आवक होते. त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्येही मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. म्हणून लासलगावच्या धरतीवर सोलापूर जिल्ह्यातही नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, लातूर, बीड, उस्मानाबाद आदी भागातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. शेतकरी दिवस-रात्र राबतो मात्र त्याच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने तो हदबल होतो. जर नाफेड मार्फत कांदा खरेदी झाला तर शेतकऱ्यांना किमान दिलासा मिळेल. सरकारने अद्याप कांद्याच्या अनुदानाची रक्कम दिलेली नाही. ती सरकारने तात्काळ द्यावी.

    एकीकडे सरकार निर्णयाच्या बाबतीत गतिमान असल्याचं सांगतं, मात्र कांदा उत्पादकांच्या बाबतीत सरकार गतिमानतेने निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ कांदा उत्पादकांबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 10 Jun 2023 12:21 PM (IST)

    शिंदेंच्या सेनेला मदत न करण्याता भाजपचा ठराव; भाजप - शिंदेंच्या सेनेतला वाद चव्हाट्यावर

    कल्याणमध्ये शिंदेंच्या सेनेला न करण्याचा भाजपचा ठराव झाला असल्याचं समोर येत आहे. भाजप - शिंदेंच्या सेनेतला वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र समोर दिसत आहे. वादामुळे श्रीकांत शिंदेंची राजीनाम्याची तयारी देखील दाखवली आहे. युतीत विघ्न होत असल्यास पदाचा राजीनामा देण्यारी तयारी असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.

  • 10 Jun 2023 12:15 PM (IST)

    समाजात वाद कसा राहील याचा प्रयत्न केला जातोय - रोहित पवार

    दंगल झाल्यानंतर सामान्य नागरिकांचं नुकसान होतं. ही दंगल घडली का घडवून आणण्यात आली हे पाहालं लागेल. कारण घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचले होते. त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवला नाही. समाजात वाद निर्माण कसा राहील याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य देखील रोहित पवार यांनी केलं आहे.

  • 10 Jun 2023 12:11 PM (IST)

    दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम; राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन

    राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय राज्यातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. २५ व्या वर्धापन दिनानिमित्त जल्लोषात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत...

  • 10 Jun 2023 12:05 PM (IST)

    धुळ्यात सकल हिंदू संघटनेचा महामोर्चा; छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात

    धुळ्यात सकल हिंदू संघटनेच्या महामोर्चाची सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे. मोर्चाच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

    राम मंदिरात आरती करुन महामोर्चाला सुरुवात झाली आहे. श्रीराम मंदिरात मूर्ती विटंबनेविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.

  • 10 Jun 2023 12:02 PM (IST)

    धुळ्यात सकल हिंदू महामोर्चाला सुरवात

    छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात

    मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  • 10 Jun 2023 12:00 PM (IST)

    रत्नागिरीतल्या राजकारणात नवीन चेहऱ्याची एन्ट्री

    शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीत उद्धव ठाकरे गट युवा सेनेचा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आमदार राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवींची राजकारणात एन्ट्री झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात दुर्गेश साळवींचे बॅनर्स ठिकाणी झळकवल्याचे पहायला मिळतात. रत्नागिरी राजापूर लांजा या शहरांमध्ये ठिकठिकाणी दुर्गेश साळवी, त्यांचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकलेत. राजापूरचे आमदार राजन साळवींसोबत आता दुर्गेश साळवी राजकारणात सक्रीय झालेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना शुभेछांचे बॅनर्स झळकलेत. उद्धव ठाकरे गटाकडून युवांना संधी देत कोकणातल्या राजकारणात वेगळी खेळी केली जातेय का?.

  • 10 Jun 2023 11:54 AM (IST)

    जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा झाला हायटेक

    पालखी रथाला जीआरएस लावल्यानंतर आता संपूर्ण वारी सोहळा QR कोड स्कॅन करत ती पाहता येणार आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब, Linkdin याचा QR कोड स्कॅन केल्यावर संपूर्ण वारी सोहळा पहायला मिळणार आहे. ज्या भाविकांना वारीमध्ये येता येत नाही, त्या भाविकांसाठी ही सोय संत तुकाराम महाराज संस्थानकडून करण्यात आली असल्याची संजय महाराज मोरे यांनी माहिती दिली.

  • 10 Jun 2023 11:52 AM (IST)

    अशोक चव्हाण यांनी पैसा आणि संपत्ती बाजूला ठेऊन यावं, त्यांची डिपॅाझीट जप्त करेल

    अशोक चव्हाण यांना नांदेडच्या जनतेनं दोन वेळा जागा दाखवली आहे. हा बालेकिल्ला आता भाजपचा आहे. अशोक चव्हाण यांचा दोन वेळा पराभव झाला आहे. आजच्या सभेचा नांदेडसह मराठवाड्यातील लोकसभेच्या जागांवर परिणाम होणार. मोदी @९ अभियानाअंर्तग ही सभा असली तरीही अमित शहा यांच्या भाषणाचा सर्वांवर प्रभार पडतो, असे खासदार प्रताप चिखलीकर यांनी म्हटलं आहे.

  • 10 Jun 2023 11:50 AM (IST)

    दूध दरवाढीच्या मागणीसाठी निमगाव केतकीत रास्ता रोको

    बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या सुरु आहे. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरला. गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला शासनाचा हमीभाव मिळावा. खाजगी दूध संघावर शासनाचे नियंत्रण राहिले पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे प्रहार जनशक्ती आणि शेतकरी सांगताना यांच्याकडून रास्ता रोको करण्यात आलं आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्हा विकास अधिकारी विकास डोईफोडे यांनी निवेदन स्विकारले आहे.

  • 10 Jun 2023 11:48 AM (IST)

    रविंद्र धंगेकरांची तुफान फटकेबाजी

    चंद्रकांत दादा आज तुम्ही माझ्या मतदारसंघात आला आहात. ताईंनी तुम्हाला काही मागितलंय पण मी तुम्हाला काही मागणार नाही. कारणं तुमचं लक्ष आमच्या मतदारसंघावर आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझं लक्ष तुमच्यावरही आहे, अस म्हणताच स्टेजवर हशा पिकला. दादा तुमचं आयुष्य निरोगी तर आहेच. तरीही एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांकडून स्टेजवरचं शुभेच्छा. रुपाली चाकणकरांकडून शाल, पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • 10 Jun 2023 11:45 AM (IST)

    काही लोकांना धडकी भरलीय, कारण अमित शहा गृहमंत्री आहेत - प्रविण दरेकर

    आमच्या आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाची सभा आहे. आज मराठवाडा आणि नांदेडमध्ये सभा होत आहे. आम्ही सोकशाही मानणारे लोक. आम्ही जनतेसाठी काय केलं हे सांगण्यासाठी ही जाहिर सभा. ही पहिली सभा आहे. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागून आहे. आजची सभा विक्रमी सभा होईल. अशोक चव्हाण क्षीण झाले आहेत. ते कमजोर आहेत की ताकदवान याचा त्यांनी विचार करावा. गेल्या वेळेस अशोक चव्हाण यांना धुळ चारली. नांदेड आता भाजपचा बालेकिल्ला झालाय. या सभेनंतर नांदेडमध्ये काग्रेसचा पालापाचोळा होईल. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना ताकद देणारी सभा असेल. या सभेनंतर मराठवाड्यात जबरदस्त वातावरण निर्माण होईल. त्याचा फायदा निवडणुकीत होईल.

  • 10 Jun 2023 11:41 AM (IST)

    चंद्रकांत खैरे संपलेला माणूस - संजय शिरसाट

    शरद पवारांनी ठाकरेंना 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. ऐनवेळी पवारांनी ऑफर दिल्याने ठाकरेंनी युती तोडली. श्रीकांत शिंदेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे, युतीत वाद नको. आम्ही आमच्या पक्षाचं काम करत राहणार.

  • 10 Jun 2023 11:35 AM (IST)

    भाजपनं चूक मान्य केली पाहिजे - अजित पवार

    शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपन चूक मान्य केली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तुमचा दाभोळकर करु ही धमकी नाही तर काय? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. यानिमित्त दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अजित पवार दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

  • 10 Jun 2023 11:31 AM (IST)

    औरंगजेबाच्या समाधीचा संरक्षित स्मारक दर्जा काढा

    औरंगजेबाच्या समाधीचा संरक्षित स्मारक दर्जा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत दानवे यांनी भाजपाकडे मागणी केली आहे. औरंगजेबाच्या खुलताबाद येथील समाधीला संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे. संरक्षित स्मारकाच्या दर्जा काढून टाकण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला दिले आहे.

  • 10 Jun 2023 11:29 AM (IST)

    रुपाली चाकणकर यांचा चित्रा वाघ यांना खोचक टोला

    चित्रा वाघ यांच्यावर बोलण्यापेक्षा इतर महत्वाचे प्रश्न आहेत. राज्यात काही जिल्ह्यात भरोसा सेल कागदावरच आहेत. गृहमंत्र्यांनी लक्ष घालून भरोसा सेल कार्यरत करावेत, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी केली आहे.

  • 10 Jun 2023 11:25 AM (IST)

    अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेमध्ये वादाची ठिणगी पडली - महेश तपासे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार क्षेत्रात भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. भारतीय जनता पार्टी कधी कोणाचा मित्र होऊ शकत नाही. तीस वर्षाची मैत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना धोका दिला. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलानेही त्यांची साथ सोडली. आता महाविकास आघाडी पडण्यासाठी शिंदे साहेबांचा उपयोग भाजपने केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांना बोलायला लागले की मी राजीनामा देईन. याचा अर्थ भांडण विकोपाला गेलेले आहे. स्थानिक भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर हे श्रीकांत शिंदेला मदत करायला तयार नाही. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात 288 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रमुख नेमलेले आहेत. शिंदे गट यांचे 23 लोकसभा व दावा करतील मात्र त्यांच्याही मतदारसंघात निवडणूक प्रमुख आहे.

    कल्याणमध्येही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे दोरे झालेले आहेत. यामुळे शिंदे यांना डीवचण्याचं काम श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मागे घेण्याचे काम किंवा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवणे असे पर्याय त्यांच्यासमोर ठेवतील. भाजप शिवसेना शिंदे गटा समोर अट ठेवतील तुम्हाला निवडणुका लढवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवावे. शिंदेचे स्वतंत्र अस्तित्व भारतीय जनता पार्टी आटोक्यात आणणार. भारतीय जनता पार्टीच्या सर्वेत त्यांच्या लक्षात आलं. 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीला येतील त्यात कल्याणचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेवर वारंवार केंद्रीय मंत्री येतात. काल जो वाद समोर आला याचा अर्थ असा आहे की काहीतरी गडबडलेला आहे हे मुख्यमंत्रीच्या पुत्राच्या संदर्भात होऊ शकतो तर बाकीचे खासदार आणि आमदार त्यांचं काय होईल.

  • 10 Jun 2023 11:15 AM (IST)

    सांगली पोलीस अॅक्शन मोडवर

    कोल्हापूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. सांगलीमध्ये कोणीही कायदा मोडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. आज पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली स्वतः रस्त्यावर उतरून त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर, संजयनगर आणि मिरज शहर आदी परिसरामध्ये पोलिसांचे संचलन करण्यात आलं. यावेळी अनेक संवेदनशील भागामध्ये जाऊन पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ बसवराज तेली यांनी दिला.

  • 10 Jun 2023 11:13 AM (IST)

    सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

    सिंधुदुर्गात माणगाव खोऱ्यासह सावंतवाडीतील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पहाटे पहाटे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यासह काही भागात पाऊस पडला, तर सावंतवाडी शहरानजीक असलेल्या काही गावात सकाळीच पावसाने हजेरी लावली. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा या मान्सूनपूर्व पावसाने उल्हासित झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 16 तारखेपासून तळकोकणात मान्सून दाखल होईल. बळीराजाला आता 16 तारखेची अर्थात मान्सूनची प्रतीक्षा आहे.

  • 10 Jun 2023 11:12 AM (IST)

    भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले, रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाही

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रेल्वे याड रेल्वे डीपी जवळ नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे आठ डबे रुळावरुन घसरले. काल रात्री ही घटना घडली. भुसावळ रेल्वे स्थानक यार्डात कॅबिन क्र. 10 जवळ ही घटना घडली. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मालगाडीचे डबे रुळावरून बाजू करण्याचं काम सुरू आहे. या मालगाडीचे कंटेनर भरलेले होते.

  • 10 Jun 2023 11:10 AM (IST)

    धुळ्यात आमच्या श्रद्धास्थानांची विटंबना झाली - सुभाष भामरे

    धुळ्यात आमच्या श्रद्धास्थानांची विटंबना झाली. आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला गृहीत धरू नये. पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपींना मोक्का लावावा. सरकार करत असलेल्या विकासाच्या कामांवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी केला आहे. विरोधकांना आरोप करण्याशिवाय काम नाही. आजच्या मोर्चात शांततेने सहभागी व्हावे, असे आवाहनही भामरे यांनी केले आहे.

  • 10 Jun 2023 10:58 AM (IST)

    विजय निश्चित असणाऱ्या मतदारसंघांची काँग्रेसकडून चाचपणी- अशोक चव्हाण

    नांदेडमध्ये भाजप कमजोर म्हणून अमित शहांचा दौरा. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती मविआ साठी पोषक आहे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. विजय निश्चित असणाऱ्या मतदारसंघांची काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे. भाई जगताप आणि वर्षा गायकवाड दोघांचंही काम चांगलं. मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाली, मला खात्री आहे त्यामुळे एकोपा वाढेल.

  • 10 Jun 2023 10:43 AM (IST)

    दिशा सालीयनची हत्या झाली त्याबद्दल कधी सामनात अग्रलेख लिहला का? - नितेश राणे

    अमरावतीत नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांनी सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली. सामना मधून आम्हाला औरंग्या कोण हे शोधण्याचा सल्ला दिला आहे. हे कोण विचारत आहे तर उद्धव ठाकरे यांचा कामगार. 2013 ला दंगल भडकवण्यासाठी उध्दव ठाकरे ने बैठक घेतली होती. संजय राऊतला सांगेल मालकाला सांगा दंगल भडकवण्याचे काम करू नये. महाराष्ट्रमध्ये काही ज्या दंगल घडत आहे त्याबद्दल उध्दव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. दिशा सालीयनची हत्या झाली तेव्हा तुमच्या मालकाचं नाव आलं त्याबद्दल कधी सामनात अग्रलेख लिहला का ती भारताची मुलगी नव्हती का? आज पवार यांना आलेल्या धमकीची चौकशी सुरू आहे. मविआचे सरकार असताना मोदी ,आणि फडणवीस यांना उलट सुलट बोललं जातं होत तेव्हा किती कार्यकर्त्यांवर कारवाई केली? सामनाच्या अग्रलेखावर नितेश राणेंची प्रतिक्रिया.

  • 10 Jun 2023 10:37 AM (IST)

    सांगली: हातगाडी विक्रेत्याचा निर्घृण खून

    कुपवाड शहरातील यशवंतनगर भागामध्ये एका हातगाडी विक्रेत्याचा निर्घृण खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुभम माने असे खून झालेल्या हात विक्रेत्याचे नाव असून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. शुभम याच्या छातीवर व डोक्यावर धारदार हत्याराने एकूण सात वार करत हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

  • 10 Jun 2023 10:27 AM (IST)

    सांगलीत पोलीस दल अलर्ट मोडवर, कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

    कोल्हापूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल अलर्ट मोडवर आहे. सांगलीमध्ये कोणीही कायदा मोडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. आज पोलीस सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली स्वतः रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर, संजयनगर आणि मिरज शहर आदी परिसरामध्ये पोलिसांचे संचलन करण्यात आलं. यावेळी अनेक संवेदनशील भागामध्ये जाऊन पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय.

  • 10 Jun 2023 10:18 AM (IST)

    राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन, 19 वर्षे पक्ष सत्तेत- सुप्रिया सुळे

    राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन. दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम. 25 वर्षात 19 वर्षे पक्ष सत्तेत. दिल्लीसह आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन.

  • 10 Jun 2023 10:12 AM (IST)

    विधानसभा अध्यक्षांनी कायद्याला धरून निर्णय द्यावा- संजय राऊत

    भविष्यात भाजपला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपसमोर ठाकरे गटाचं आव्हान असल्यामुळेच अमित शहांचे २ वेळा दौरे झाले. शिंदे पुत्राचे उद्धव ठाकरेंनी विनाकारण लाड केले. विधानसभा अध्यक्षांनी कायद्याला धरून निर्णय द्यावा, संजय राऊत यांचा नार्वेकरांना टोला.

  • 10 Jun 2023 10:09 AM (IST)

    कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासमोर भाजपचं आव्हान- संजय राऊत

    शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करायचा प्रयत्न सुरु आहे. अमित शहांनी शिवसेना फोडलीये. एकनाथ शिंदेंची ताकद ४-५ आमदारांच्या पलीकडे नव्हती. एकनाथ शिंदेंवर ईडी चा दबाव होता. दिलेलं वचन अमित शहांनी तोडलं. आम्ही २५ वर्षे हे नातं निभावलं. २०१४ साली भाजपनं युती तोडली. भाजपने शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करायचा प्रयत्न केलाय. शिवसेना- भाजपचा हा वाद चव्हाट्यावर येणारच होता. शिंदेंनी नाही, अमित शहांनी शिवसेना फोडलीये. कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासमोर भाजपचं आव्हान.

  • 10 Jun 2023 10:03 AM (IST)

    शिवसेना कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न - संजय राऊत

    शिवसेना फोडून महाराष्ट्र कमकुवत करण्याचे भाजपचे स्वप्न होते. ईडी, सीबीआय यांचा वापर करुन अमित शाह यांच्या माध्यमातून पक्ष फोडण्यात आला. मुंबईचा ताबा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजकरण केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यांवर ईडीचा दबाव आला, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 10 Jun 2023 09:58 AM (IST)

    महामार्गावर ट्रक खोल दरीत कोसळला

    नगर-पाथर्डी महामार्गावरील पुन्हा अपघात झाला आहे. करंजी घाटातील अवघड वळणावर एक ट्रक खोल दरीत कोसळला आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने अपघातात ट्रकचा क्लिनर बचावला आहे. करंजी घाटातील माणिकपीर बाबाच्या अवघड वळणावर अपघात झाला आहे. हा ट्रक नगरहून खताच्या गोण्या घेवून जात होता.

  • 10 Jun 2023 09:53 AM (IST)

    ठाणे शहर खड्डेमुक्त होणार

    मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानांतर्गत खड्डे मुक्त ठाणे करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. यामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची आणि डांबरीकरणाची कामे जोरदार सुरू आहे. एकूण 605 कोटी रुपयांची विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे. पावसाळ्या पूर्वी ही कामे व्हावी, यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आढावा बैठक घेतली. तसेच रस्त्याच्या कामांचा दर्जा राहण्यासाठी मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांनी जोर लावला आहे.

  • 10 Jun 2023 09:46 AM (IST)

    इंदापूर अर्बन बँकेवर हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व

    इंदापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत १७ जागांसाठी पाटील यांच्या पॅनेलचेच १७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असून त्याची औपचारिक घोषणा होण बाकी आहे

  • 10 Jun 2023 09:36 AM (IST)

    पोलिसांना घर रिकामे करण्यासाठी नोटीस

    पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर धर्मसंकट उभे राहिले आहे. डीबी मार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या ११६ कुटुंबियांना तातडीनं घरं खाली करण्याची नोटीस देण्यात आल्या आहेत. स्ट्रक्चरल ॲाडिटममध्ये इमारत धोकादायक असल्याचं कारण देत नोटीस पाठवली आहे. मुलांच्या शाळा सुरु होण्यास अवघे काही दिवस आहेत आणि पावसाळाही सुरु होणार आहे, यामुळे घर कसे बदलावे, असा प्रश्न मुंबई पोलिसांसमोर आहे.

  • 10 Jun 2023 09:29 AM (IST)

    रत्नागिरीत भीषण अपघात

    रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर पहाटे भीषण अपघात झाला. क्रूझर गाडी चालकाला डुलकी लागल्याने गाडी टोल नाक्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकली आणि गाडी पलटी झाली. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात 13 जण जखमी झाले आहे. गाडी निपाणीहुन पंढरपूरला जात होती.

  • 10 Jun 2023 09:21 AM (IST)

    मिरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील रोज नवनवे खुलासे

    सरस्वती वैद्य मृतदेहाच्या विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मनोज साने गुगलच्या आधार घेतला होता. सरस्वती वैद्य अनाथ नसून तीन बहिणी असल्याचे समोर आले. सरस्वतीला एकूण पाच बहिणी आहेत. तिची आई लहानपणीच वारली आहे. वडील सोडून गेले होते. बोरिवलीमध्ये आरोपी मनोज साने यांच्याशी सरस्वती वैद्यची रेशनच्या दुकानात ओळख झाली होती. मनोज साने याने सरस्वतीशी मंदिरात लग्न केले होते.

  • 10 Jun 2023 09:16 AM (IST)

    नाशिक मनपा अव्वल

    गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये सेकंड होम घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी देण्यासाठी बांधकाम परवानग्या ऑनलाईन देण्याच्या प्रणालीत नाशिक महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे. तब्बल 9169 ऑनलाईन बांधकाम परवानग्या देऊन नाशिक महापालिकेने ठाणे, पुणे, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महापालिकांना मागे टाकले आहे.. नाशिकच्या जवळ असलेले ओझर विमानतळ, समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्ग यामुळे नाशिकचे महत्त्व वाढत आहे. बांधकाम परवानग्या सुरळीत मिळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात आलीय. या ऑटो डीसीआर आणि बीपीएमएस सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर करत नाशिक महापालिका राज्यात अव्वल ठरलीय.

  • 10 Jun 2023 08:53 AM (IST)

    मृत्यूचा आकडा रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती

    चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांतील वाढता मृत्यूचा आकडा रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खासगी संस्थांमध्ये येणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भात सूचनाही आरटीओंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी जिल्ह्यातील ९५ खासगी संस्थांना नोटीस पाठवून कार्यालयासमोरील सीसीटीव्ही फुटेज मागितले आहेत. त्यामुळे आता बिनधास्त विनाहेल्मेट फिरणाऱ्यांची चांगलीच फजिती होणार आहे.

  • 10 Jun 2023 08:43 AM (IST)

    कन्व्हेन्शन सेंटर वरून ठाकरे गट आक्रमक

    कन्व्हेन्शन सेंटर वरून ठाकरे गट आक्रमक

    कोल्हापुरात होणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटर वरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कन्व्हेन्शन सेंटरची जागा बदलावी ठाकरे गटाची मागणी आहे. जागा बदलण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट पाण्यात उतरून करणार आंदोलन करणार आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. नव कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव परिसरात साकारणार आहे. तलाव परिसरातील जैवविविधतेला धोका असल्याने जागा बदलण्याची ठाकरे गटाची मागणी आहे.

  • 10 Jun 2023 08:40 AM (IST)

    इंदापूर अर्बन बँकेवर हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम

    इंदापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत १७ जागांसाठी पाटील यांच्या पॅनेलचे १७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असून त्याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. स्थापनेपासूनच पाटील यांनी बॅंकेवर वर्चस्व कायम राखले आहे.

  • 10 Jun 2023 08:38 AM (IST)

    कोल्हापूरात शेतकरी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

    ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्यासह प्रोत्साहन पर अनुदानासाठी राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये येण्याच्या आगोदर दोन गोष्टींवर निर्णय घ्या. अन्यथा शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजारो शेतकरी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. ऊस दर नियंत्रण समिती नसल्यामुळे ऊस उत्पादकांना अंतिम बिल मिळत नसल्याचा शेट्टी यांनी आरोप केला आहे. तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षे झाले, तरी प्रोत्साहन पर अनुदान का नाही असा प्रश्न देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

  • 10 Jun 2023 08:32 AM (IST)

    या जिल्ह्यात एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार

    अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनचे वॉर्ड हाऊसफुल्ल झाले आहेत. एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अनेक रुग्णांवर जमिनीवर गादी टाकून उपचार घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक चित्र लोकांना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयात जागा आणि बेड उपलब्ध नसल्याने आरोग्य प्रशासन सुध्दा हतबल झाले आहे. जिल्हाभरातील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु, रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना कशी योग्य आरोग्य सेवा पुरवावी, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे आहे.

  • 10 Jun 2023 08:21 AM (IST)

    अश्व दगडुशेठ गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील अश्व दगडुशेठ गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत. अंकलीच्या शितोळे सरकारचे हिरा आणि मोती हे दोन अश्व वारीत माऊलींची सेवा करतात. दोन्ही अश्व मंदिरात दर्शनासाठी आणले होते, त्यावेळी भाविकांनी अश्वाच दर्शन सुध्दा घेतलं. दगडूशेठ गणपती मंदिरात अश्व आल्यानंतर वातावरण भक्तीमय झालं होतं.

  • 10 Jun 2023 08:17 AM (IST)

    युजीसी घेणार बोगस पीएचडी पदवी देणाऱ्या विद्यापीठाचा शोध

    बोगस पीएचडी पदवी देणाऱ्या विद्यापीठाचा शोध घेण्यासाठी युजीसीनं उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. देशातील निवडक विद्यापीठाची पडताळणी केली जाणार आहे. पीएचडी पदवी कशी देण्यात येते ? एका वर्षात किती पदव्या देण्यात आल्या ? त्याच मोजमाप काय ? यावर समिती विचार करणार आहे. त्याचबरोबर बोगस पीएचडी पदवीवर आळा घालण्यासाठी युजीसीकडून उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठं दोषी आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचे युजीसीचे चेअरमन जगदीश कुमार यांनी सांगितले आहे.

  • 10 Jun 2023 08:13 AM (IST)

    'आमची सत्ता आल्यानंतर आम्ही पुन्हा संसदेचं उद्घाटन करू' - प्रकाश आंबेडकर

    देशातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला तुम्ही डावलू शकत नाही. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार सत्तेतून गेल्यानंतर, जेव्हा आमचं सरकार येईल. तेव्हा भारतीय संसदेचं आम्ही पुन्हा उद्घाटन करू, अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे वंचित बहुजन आघाडीकडून हक्क परिषद घेण्यात आली होती. यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

  • 10 Jun 2023 08:05 AM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात सोलापुरात तक्रार दाखल

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात सोलापुरात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सोलापुरातील विजापूर नका पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शरद पवारांना धमकी देणारा आणि त्याच्या मास्टरमाइंडला तात्काळ अटक झाली पाहिजे, तसे न झाल्यास सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

  • 10 Jun 2023 07:52 AM (IST)

    सोलापुरातील नरखेड गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी उभारल्या गुढ्या

    केंद्रीय मंत्री नारायण राणे काल मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी जवळपास 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील बहुतांश घरावर गुढी उभारण्यात आली होती. नारायण राणे आपल्या छोट्याशा गावात आल्याने गावकऱ्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील केली होती. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानमित्ताने राणे नरखेड गावात आला होते.

  • 10 Jun 2023 07:32 AM (IST)

    मोठा निर्णय ! पंढरपुरात आषाढी एकादशीला व्हीआयपी दर्शन बंद राहणार

    आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भक्त पंढरपूरात येतात. विठ्ठलमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात. व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा रांग थांबवली जाते. मात्र आता वारकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. आता आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना एक दिवस दिलासा मिळणार आहे.

  • 10 Jun 2023 07:31 AM (IST)

    मुंबई घामाघूम, विजेच्या मागणीत अचानक प्रचंड वाढ

    मुंबईतील तापमानाचा पारा 34 अंशांवर गेला असून हवेतील आर्द्रताही वाढली आहे. घामाघूम झालेल्या मुंबईकरांनी एसी, पंखे, कुलर टॉप स्पीडवर ठेवल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. काल तब्बल 4129 मेगावॅट एवढी रेकॉर्डब्रेक विजेची मागणी नोंदली आहे.

    मुंबई शहर आणि उपनगरात जवळपास 50 लाख वीज ग्राहक असून त्यांना बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. मे महिन्यात कमाल 3800 मेगावॅटपर्यंत असलेली मुंबईची विजेची मागणी जूनमध्ये विक्रमी पातळीवर गेली आहे. 1 मे रोजी 3958 मेगावॅट तर 1 जून रोजी 3971 मेगावॅट एवढी विजेची विक्रमी मागणी नोंदली होती. त्यानंतर पावसाचे दिवस सुरू झाल्याने विजेच्या मागणीत घट होईल असे दिसत होते, पण मान्सूनचे आगमन लांबल्याने विजेची मागणी उच्चांकी दिशेने जात आहे.

    काल दुपारी 3.30 ते 30.45 या वेळेत 4 हजार 129 मेगावॅट एवढी आतापर्यंतची सर्वाधिक मागणी नोंदली आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरने 11 हजार 65 मेगावॅट, अदानीच्या डहाणू वीज पेंद्रातून 499 मेगावॅट, महावितरणने भांडुप, मुलुंड परिसरात सुमारे 134 मेगावॅट तर पॉवर एक्स्चेंजमधून तब्बल 2331 मेगावॅट वीज घेतली आहे.

  • 10 Jun 2023 07:28 AM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज देहूत पालखी सोहळ्याला हजेरी लावणार

    आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यानिमित्ताने आज दुपारी 2 वाजता पूजेला सुरुवात होईल. तर 4 वाजता पालखीचं प्रस्थान होईल. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आणि शेकडो वारकरी या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

  • 10 Jun 2023 07:25 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी

    पुण्याच्या वेल्हा तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व जोरदार पावसाने पासली बालवड़ गावाच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. कमी वेळात जास्त पाऊस झाल्यानं या भागातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. हा डोंगराळ भाग आहे. या मार्गावरच्या पुलावरील मोऱ्या लहान आहेत. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यावर पाणी पुलावरून वाहत असल्यानं याची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलीय.

  • 10 Jun 2023 07:19 AM (IST)

    मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण, अमित शाह नांदेडमध्ये संबोधित करणार

    केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडमध्येही तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहेब येथे भाजपने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संबोधित करणार आहेत.

Published On - Jun 10,2023 7:14 AM

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.