Maharashtra Breaking News in Marathi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक

Maharashtra Breaking News in Marathi : आज 31 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक
| Updated on: Apr 01, 2024 | 7:17 AM

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपसाठी महायुतीची बोलणी अजूनही सुरुच आहे. शनिवारी रात्री पुन्हा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या नामनिर्देशन उमेदवारांचे चिन्ह वाटप करण्यात आले.शिट्टी , हेल्मेट, कपाट, कात्री , प्रेशर कुकर अशी चिन्ह अपक्ष उमेदवारांना वाटप करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधात एकवटणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. तसेच लालू प्रसाद यादव , ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, एम के स्टॅलिन, अखिलेश यादवही रॅलीत सहभागी होणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Mar 2024 07:27 PM (IST)

    मुंबईत भाजपची लोकसभा आढावा बैठक सुरु

    मुंबईत भाजपची लोकसभा आढावा बैठक सुरु झाली आहे. लोकसभा प्रभारी खासदार दिनेश शर्मा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडत आहे. या बैठकीला भाजपचे प्रमुख मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

  • 31 Mar 2024 07:00 PM (IST)

    नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पिवळ्या रंगाचे कलिंगड दाखल

    नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पिवळ्या रंगाचे कलिंगड दाखल झालं आहे. हे कलिंगड आरोग्याला पोषक आणि चवीला गोड असल्याचे व्यापारी सांगत आहेत. फक्त तीन महिनेच याची आवक असते. त्यामुळे ग्राहकांची याला मोठी पसंती आहे. लाल कलींगडापेक्षा याचे दर दुप्पट आहेत. लाल कलिंगड 15 ते 19 रुपये किलोने विकला जातो. तर याला 28 ते 30 रुपये किलोला दर आहे. सोलापूर वरून येणाऱ्या या पिवळ्या कलिंगड खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत.

  • 31 Mar 2024 05:58 PM (IST)

    बैठकीत राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र लोकसभा प्रभारी खासदार दिनेश शर्मा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जाणार आहे. 16 क्लस्टर प्रमुख, कोअर कमिटी सदस्य आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा दिनेश शर्मा घेणार आहेत.

  • 31 Mar 2024 05:54 PM (IST)

    त्या 5 लाख पवार विरोधी मतांनी काय करायचं? कार्यकर्त्यांचा शिवतारेंना प्रश्न

    विजयबापू शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधाची तलवार म्यान केली. शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर शिवतारे मवाळ झाले आणि त्यांनी भूमिका बदलली. शिवतारे यांनी बदललेल्या भूमिकेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पत्राद्वारे प्रश्न विचारले आहेत.

    “माझा नेता पलटूराम निघाला” असा आशयाचं कार्यकर्त्यांने लिहिलें पत्र शिवतारे यांनी माघार घेतल्यावर व्हायरल झालं आहे. ‘पुरंदरचा तह म्हणत..” कार्यकर्त्यांनी विजय शिवतारे यांना पत्र लिहिलं आहें

  • 31 Mar 2024 03:49 PM (IST)

    अमोल कोल्हे यांना आढळराव पाटीलांचा टोला

    शिरूर : घड्याळ’ गेलं, वेळ जुळली नाही. पण, वधुवरांच्या सुखाची ‘तुतारी’ वाजली पाहिजे असं म्हणत अमोल कोल्हे यांनी लग्नमंडपातच प्रचाराचे फटाके फोडले. यावर आढळराव पाटीलांनी निशाना साधत मंगलमय कार्यक्रमात वाचाळविरांसारखं बरळणं योग्य नाही असा टोला लगावला.

  • 31 Mar 2024 03:28 PM (IST)

    काटेवाडीकरांनी उभारली विजयाची गुढी, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होताच आनंदोत्सव

    बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काटेवाडीकरांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय. काटेवाडी गावच्या सरपंच यांनी गुढी उभारत सुनेत्रा पवार यांच्या विजयाची गुढी उभारल्याचे सरपंच यांच्याकडून सांगण्यात आलेय.

  • 31 Mar 2024 03:00 PM (IST)

    पियुष गोयल यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा

    केंद्रीय मंत्री उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विलेपार्ले पूर्व येथे मोर्चा काढला.पियुष गोयल यांच्या झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.

  • 31 Mar 2024 02:59 PM (IST)

    महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली सुनीलजी देवधर यांची भेट

    पुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव सुनीलजी देवधर यांच्या निवासस्थानी पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट. देवधर यांनी तोंड गोड करुन मोहोळ यांच केलं स्वागत. सुनील देवधर पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास होते इच्छुक. आज मुरलीधर मोहोळ यांनी घरी जाऊन घेतली भेट

  • 31 Mar 2024 02:07 PM (IST)

    एक पार्टी, एक सरकार देशासाठी धोकादायक, उद्धव ठाकरे यांची टीका

    आधी शंका वाटत होती की हा देश हुकुमशाहीच्या मार्गाने चालला आहे. परंतू आता देश खरोखरच हुकूमशाहीत गेला आहे. एक पार्टी, एक सरकार देशासाठी धोकादायक असल्याची टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

  • 31 Mar 2024 01:36 PM (IST)

    वहिनी आईसमान वाटत असेल तर आईसमोर उभे राहू नका – प्रवीण दरेकरांचा सुळेंना सल्ला

    वहिनी जर आई समान वाटत असेल तर आईसमोर सुप्रिया सुळेंनी उभे राहू नये असा सल्ला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
    भाजप फोडाफोडीचे राजकारण करीत नाही, राज्यात फोडाफोडीचे राजकारण कोण करते हे सगळ्यांना माहीत असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.

  • 31 Mar 2024 01:22 PM (IST)

    अरविंद केजरीवाल वाघ आहेत, त्यांना कोणी हरवू शकत नाही – सुनिता केजरीवाल

    अरविंद केजरीवाल वाघ आहेत, त्यांना कोणी हरवू शकत नाही असे केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी रामलीला मैदानातील रॅलीत म्हटले आहे.मी आज तुमच्याकडे मत मागत नाही. एक नवीन भारत तयार करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करते. ज्यात सगळ्यांना चांगल शिक्षण मिळेल, रुग्णांना योग्य उपचार मिळतील, कुणी अशिक्षित राहणार नाही असेही त्या म्हणाल्या.

  • 31 Mar 2024 11:00 AM (IST)

    आजपासून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा

    कोल्हापूर विमानतळवरुन आजपासून तिरुपतीसाठी विमान उड्डाण घेईल. कोल्हापूर-तिरुपती या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस ही सेवा असेल. मंगळवार, बुधवार आणि रविवारी ही सेवा मिळेल.

  • 31 Mar 2024 10:54 AM (IST)

    धैर्यशील मोहिते कोणत्या गोटात

    भाजपाचे तिकीट न मिळाल्याने नाराज आणी बंडखोरांच्या पवित्र्यात असलेले धैर्यशील मोहिते-पाटलांनी कुर्डूवाडीत काँग्रेस पक्षाच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली.धैर्यशील मोहिते-पाटील हे हाती शरद पवार गटात जाऊन हाती तुतारी घेण्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांच्या या कृतीने सर्वच संभ्रमात पडले.

  • 31 Mar 2024 10:43 AM (IST)

    विद्यार्थ्याला आयकर खात्याची 46 कोटींची नोटीस

    आयकर विभागाने एका विद्यार्थ्याला 46 कोटींची नोटीस पाठवल्याने त्याचे धाबे दणाणले आहे. प्रमोद कुमार दंडोतिया असं या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील ग्वालियरचा रहिवाशी आहे. तो एसएलपी या महाविद्यालयात इंग्रजी भाषेतून पदव्युत्तर पदवी करत आहे.

  • 31 Mar 2024 10:42 AM (IST)

    जलसमाधी मिळालेल्या हेमांडपंथी मंदिराचे दर्शन

    पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील भीमानदीच्या पात्रात १९७५ साली जलसमाधी मिळालेले अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथाचे मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खलावल्याने उघडे पडले आहे,हे मंदिर 45 वर्षे हून अधिक काळ पाण्यात लाटांशी झुज देत आहे सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झालीय..या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला तरी याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात “पलाशतीर्थ” म्हणून आढळून येते .

  • 31 Mar 2024 10:28 AM (IST)

    सुनेत्रा पवार मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर

    सुनेत्रा पवार सलग दुसऱ्या दिवशी बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज मुळशीमधील बावधन परिसरातील विविध सोसायट्यांना भेटी देणार आहेत. कालच बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

  • 31 Mar 2024 10:19 AM (IST)

    ब्रह्मदेव जरी आला तरी माघार नाही

    अमरावतीत अखेर महायुतीला जोरदार झटका बसलाच. बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ब्रह्मदेव जरी समोर आला तरी माघार घेणार नसल्याचे सांगत त्यांनी शड्डू ठोकले आहेत.

  • 31 Mar 2024 10:10 AM (IST)

    सुप्रिया सुळे बारामतीत

    आज सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. उमेदवारी आणि बारामतीतील लढतीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. मी इंडिया आघाडीचे आभार मानते. पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याची मला संधी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघाचे आभार मानते… पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं, अशी विनंती करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 31 Mar 2024 10:01 AM (IST)

    नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीची बैठक

    पालकमंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी राष्ट्रवादीची बैठक होत आहे.

  • 31 Mar 2024 09:56 AM (IST)

    Live Update | दक्षिण काशी पैठण नगरी भक्तांच्या गर्दीने दुमदुमली

    पैठण शहरात संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सव… पैठण शहरात लाखो भाविकांची झाली गर्दी… संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी… संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून पैठण शहरात गर्दी…

  • 31 Mar 2024 09:47 AM (IST)

    Live Update | फोडणी झाली स्वस्त, लसूण दरात घसरण

    नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत नवीन लसूण आवक वाढली असल्याने लसूण दर उतरले आहेत.. घाऊक बाजारात लसूण दर 150 ते 300 रुपयांवरुन आता 50 ते 140 रुपयांवर आले आहेत… त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

  • 31 Mar 2024 09:35 AM (IST)

    Live Update | रामलीला मैदानावर सुनिता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवणार

    रामलीला मैदानावर सुनिता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवणार… ईडीच्या कोठडीतून अरविंद केजरीवाल यांनी दिलाय संदेश… आजच्या रॅलीमध्ये सुनीता केजरीवाल मुख्यमंत्र्यांची बाजू मांडणार…

  • 31 Mar 2024 09:25 AM (IST)

    Live Update | पाटणमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात…

    सातारा येथील पाटणमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात… अनेक ठिकाणी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे… पावसामुळे कलींगड, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे…

  • 31 Mar 2024 09:09 AM (IST)

    Live Update | लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही लढणार – सुप्रिया सुळे

    लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही लढणार… माझं काम पाहून मतदान करा… सुप्रिया सुळे यांचं आवाहन… कुणाला व्यक्तिगत विरोध नाही, वैचारिक विरोध… असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 31 Mar 2024 08:57 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम

    छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरे यांच्या मुलाचे नाव चर्चेत आहे. विलास संदीपान भुमरे यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. महायुतीकडून भागवत कराड, विलास संदीपान भुमरे आणि विनोद पाटील यांची नावं चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम आहे. विलास संदीपान भुमरे यांचे नाव चर्चेत आल्यामुळे तिढा आणखी वाढला आहे. भुमरे यांच्या मुलाचे नाव चर्चेत आल्यामुळे आणखी रस्सीखेच सुरू झाली आहे.

  • 31 Mar 2024 08:45 AM (IST)

    शरद मोहोळ खून प्रकरणातील महत्वाची अपडेट

    शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदत वाढ दिली आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेकडून 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला. या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली.

  • 31 Mar 2024 08:30 AM (IST)

    कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत

    कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस तिरुपती विमानसेवा मिळणार आहे. स्टार एअरकडून 50 असूनक्षमतेच्या जाणार सेवा विमानाने दिली आहे. मंगळवार, बुधवार आणि रविवार या तीन दिवशी कोल्हापुरातून सकाळी अकरा वाजता टेक ऑफ तर तिरुपतीहून १२ वाजून 35 मिनिटांनी टेकऑफ होणार आहे. या आधी इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर तिरुपती विमान सेवा सुरू होती. मात्र अपुऱ्या प्रवासी क्षमतेच कारण देत गेल्या  तिरुपती विमानसेवा दोन ते तीन महिन्यापासून बंद होती.

  • 31 Mar 2024 08:15 AM (IST)

    मारहाण प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा

    मराठा समाजाच्या बैठकीतील मारहाण प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  2 दिवसांपूर्वी विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण झाली होती.  उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत मारहाण झाली होती. मारहणीत जखमी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

  • 31 Mar 2024 07:55 AM (IST)

    पुणे रेल्वे विभागाचे बुकींग जूनपर्यंत फुल्ल

    पुण्यातून देशाच्या अनेक ठिकाणी जाणारे रेल्वेचे तिकीट पुढील दोन महिन्यांसाठी फुल्ल झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्याचे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुणे रेल्वे भागातून अनेक जादा रेल्वे गाड्यांचा नियोजन करण्यात येणार आहे.

  • 31 Mar 2024 07:44 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार प्रचाराचा शुभारंभ

    उत्तर प्रदेशमधील मेरठमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 सालीही मोदींनी मेरठ शहरातूनच प्रचाराची सुरुवात केली होती. या सभेत RLD नेते जयंत चौधरीही सहभागी होणार आहेत.

  • 31 Mar 2024 07:28 AM (IST)

    PMPLच्या उत्पन्नात मोठी वाढ

    पुणे येथील PMPLच्या उत्पन्नात 2023-24 या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. PMPL चे उत्पन्न 611 कोटींच्या वर गेले आहे. यंदाच्या वर्षी पीएमपीएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तिकीट विक्रीतून पीएमपीएलने कमावले 611 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.

  • 31 Mar 2024 07:18 AM (IST)

    नवी दिल्लीत विरोधकांची आज रॅली

    राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधात एकवटणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता ही रॅली होणार आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.