AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळी 6 वाजेनंतरची 17 लाख मतं कुठून आली? ईव्हीएमच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात सडेतोड उत्तर 

"मारकडवाडीत काय काय चाललं? मला कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आश्चर्य वाटलं. पवार हे बॅलन्स नेते आहेत. काँग्रेसने अनेकवेळा ईव्हीएमवर आरोप केले. पण पवार कधीच बोलले नाहीत", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

संध्याकाळी 6 वाजेनंतरची 17 लाख मतं कुठून आली? ईव्हीएमच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात सडेतोड उत्तर 
देवेंद्र फडणवीस
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 19, 2024 | 3:15 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश आलं आहे. पण या यशानंतर विरोधकांकडून ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय. संध्याकाळी 6 वाजेनंतर अचानक मतदानाची आकडेवारी कशी वाढली? असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. ईव्हीएमबाबतच्या या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात प्रत्युत्तर दिलं. विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांकडून केल्या जात असेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

“सहा वाजेनंतरचं मतदान १७ लाख आहे. ५ ते ६ वाजेचं मतदान गृहित धरलं नाही आणि ७५ लाख मतदान आलं कुठून? रोज विचारलं तर कसं चालेल? कुठून आलं नाही. जनतेनेच आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही जिंकून आलो”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

मारकडवाडीच्या आरोपांवर फडणवीस काय म्हणाले?

“मारकडवाडीत काय काय चाललं? मला कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आश्चर्य वाटलं. पवार हे बॅलन्स नेते आहेत. काँग्रेसने अनेकवेळा ईव्हीएमवर आरोप केले. पण पवार कधीच बोलले नाहीत. यावेळी पवार बोलले. म्हणाले, छोटी राज्य काँग्रेसला आणि मोठी राज्य भाजपला. मला सांगा, पश्चिम बंगाल छोटं राज्य आहे? ममता दीदी आणि ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या, असा सल्ला दिला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

‘ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही’

“मारकडवाडीत २०१४ची निवडणूक झाली. विजयसिंह मोहिते पाटलांना ५३३ मते आहेत. सदाभाऊ खोत यांना ६६४ मते आहेत. लोकसभेत, २०१९ची लोकसभेची निवडणूक पाहा. रणजितसिंह निंबाळकर ९५६ मते आणि संजय मामा शिंदे यांना ३०० मते आहेत. सर्वच आकडेवारी माझ्याकडे आहे. राम सातपुते सारखा सामान्य कार्यकर्ता पाच वर्ष राबतो. एकट्या मारकडवाडीत २२ कोटींची कामे करतो. त्याला जास्त मते मिळाल्यावर तुम्ही लोकांना धमकावता. ही धमकी होती. हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. बॅलेटचं वोटिंग घ्यायचं. त्यात मतदान पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे. ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

‘राज्यात २०१२ नंतर व्हिव्हीपॅट आहे’

“पहिल्यांदा लक्षात ठेवा. या देशात २०१२ पर्यंत ईव्हीएम होतं. त्यानंतर ईव्हीएम नाही. २०१२ नंतर व्हिव्हीपॅट आहे. व्हिव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. आपण मतदान केल्यावर आपल्याला चिन्ह दिसतं. ते चिन्ह बॅलेट बॉक्समध्ये जातं. ईव्हीएमच्या मोजणीत व्हीव्हीपॅटचं मतदानही मोजलं जातं. ते जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. आपण एकप्रकारे बॅलटवरच मतदान करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.